AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Andheri Vidhan Sabha by Election : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून मुरजी पटेलांना उमेदवारी देण्याची तयारी, सुत्रांची माहिती

अंधेरी पूर्वमधून भाजपकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वीच या मतदार संघातील शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं निधन झालं आहे. त्यामुळे या जागेवर पोटनिवडणूक लागणार आहे.

Andheri Vidhan Sabha by Election : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून मुरजी पटेलांना उमेदवारी देण्याची तयारी, सुत्रांची माहिती
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून मुरजी पटेलांना उमेदवारी देण्याची तयारीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 16, 2022 | 7:40 PM

मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीची (Vidhan Parishad Election) रणधुमाळी सुरू असतानाच आता आणखी एका निवडणुकीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. भाजकडून अंधरी पूर्व विधानसभा मंतदारसंघातून पोटनिवडणुकीसाठी (Andheri East Vidhan Sabha by Election) उमेदवारी देण्याची तयारी पूर्ण झाली आहे, अंधेरी पूर्वमधून भाजपकडून मुरजी पटेल (Murji Patel) यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वीच या मतदार संघातील शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं निधन झालं आहे. त्यामुळे या जागेवर पोटनिवडणूक लागणार आहे. या निवडणुकीची जबाबदारी सध्या भाजपने आशिष शेलार यांच्याकडे दिल्याचीही माहिती सुत्रांनी दिली आहे. गेल्या वेळी पराभव पत्करलेली भाजप ही पोटनिवडणूक जिंकण्याचा पुरेपूर प्रयत्न करताना दिसून येणार आहे. त्यामुळे यावेळी तरी हा मतदारसंघ भाजपच्या पारड्यात पडणार का? याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

मुरजी पटेल यांची राजकीय कारकीर्द

  1. 2012 मध्ये काँग्रेस मधून मुरजी पटेल यांची पत्नी  केशरबेन मुरजी पटेल नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत.
  2. 2015-2016 मध्ये मुरजी पटेल सोबत पत्नी केशरबेन मुरजी पटेल यांनी भाजपात प्रवेश केला आहे.
  3. 2017 ला मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपच्या वॉर्ड 81 मधून मुरजी पटेल नगरसेवक म्हणून निवडून आलेत, तर वॉर्ड नंबर 76 मधून त्यांची पत्नी केशरबेन मुरजी पटेल याही निवडून आल्या आहेत.
  4. 2018 मध्ये खोट्या जात प्रमाणपत्रामुळे दोघांचेही नगरसेवक पद रद्द झालं होतं.
  5. 2019 विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती झाल्यामुळे शिवसेनेचे उमेदवार रमेश लटके यांना अंधेरी पूर्व विधानसभा मधून तिकीट देण्यात आलं.
  6. त्यामुळे नाराज मुरजी पटेल 2019 विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून उभे राहिले. या निवडणुकीत मुरजी पटेल यांना 45808 मतं मिळाली तर शिसेवना आमदार रमेश लटके यांना 62,772 मतं मिळाली. 2019 विधानसभा निवडणुकीत 16,964 मतांनी रमेश लटके विजयी झाले.
  7. 2020 मध्ये मुरजी पटेल यांना भाजपातून उत्तर पश्चिम जिल्याचे महामंत्री पद देण्यात आले आहे. आणि आता त्यांना निवडणुकीत उतरवण्याची तयारी भाजपकडून करण्यात आली आहे.
  8. मुरजी पटेल यांची फडणवीसांच्या जवळचे नेते अशी ओळख आहे. त्यामुळेच त्यांची या ठिकाणी वर्णी लागणार असल्याचेही बोलले जात आहे.
  9. शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला खिंडार पडणाऱ्या चेहऱ्याचा भाजपकडून या ठिकाणी विचार सुरू होता. मुरजी पटेल यांना राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे.
  10. येत्या काही दिवसातच या जागेवर निवडणुकीच्या घोषणा होईल, शिवसेनेकडून मा मात्र या जागेसाठी अद्याप कुठल्याही नावाची चर्चा नाही.
शेतकऱ्यांचा माल संपला अन् बाजारात दरवाढीला सुरुवात
शेतकऱ्यांचा माल संपला अन् बाजारात दरवाढीला सुरुवात.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय देशमुखांची गृहमंत्रालयाला मोठी मागणी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय देशमुखांची गृहमंत्रालयाला मोठी मागणी.
'तुमच्या देशाचे बजेट आमच्या लष्करी बजेट इतकेही नाही' - असदुद्दीन ओवैसी
'तुमच्या देशाचे बजेट आमच्या लष्करी बजेट इतकेही नाही' - असदुद्दीन ओवैसी.
20 ते 22 तास चालून बैसरन खोऱ्यात पोहोचले; एनआयएच्या तपासात मोठे खुलासे
20 ते 22 तास चालून बैसरन खोऱ्यात पोहोचले; एनआयएच्या तपासात मोठे खुलासे.
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.