तुला पगार कोण देतो? लग्नाला आला आहेस की, ड्युटीवर? मंत्र्याच्या पत्नीने पोलीस अधिकाऱ्याला झापलं

एका मंत्र्याच्या पत्नीमुळे वाद निर्माण झालाय. तिने एका पोलीस इंस्पेक्टरला झापलं. मूळात तिला तो अधिकारच नाहीय. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होतोय. या पोलीस इंस्पेक्टरला मंत्र्याची पत्नी वाट्टेल ते बोलली.

तुला पगार कोण देतो? लग्नाला आला आहेस की, ड्युटीवर? मंत्र्याच्या पत्नीने पोलीस अधिकाऱ्याला झापलं
haritha reddyImage Credit source: Screengrab
Follow us
| Updated on: Jul 02, 2024 | 10:30 AM

मागच्या महिन्यात देशात लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार स्थापन झालय. त्याचवेळी काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकालही लागले. केंद्रात मोदी सरकारने सत्ता टिकवली पण आंध्र प्रदेशात मात्र सत्ता बदल झाला. तिथे जगनमोहन रेड्डी यांचं सरकार जाऊन चंद्राबाबू नायडू पुन्हा सत्तेवर आले. आता चंद्राबाबू नायडू सरकारमधील एका मंत्र्याच्या पत्नीमुळे वाद निर्माण झाला आहे. मंत्री मंडीपाल्ली रामाप्रसाद यांच्या पत्नीच्या कृतीमुळे हा वाद निर्माण झालाय. सोशल मीडियावर या प्रसंगाचा व्हिडिओ व्हायरल होतोय. एका कार्यक्रमाला जाताना पोलीस अधिकाऱ्यामुळे थांबून रहाव लागल्याने या मंत्र्याच्या पत्नीने त्या अधिकाऱ्याला झापलं. मूळात तिला तो अधिकारच नाहीय.

अन्नामय्या जिल्ह्यात ही घटना घडली. हरीता रेड्डी एका स्थानिक कार्यक्रमासाठी चालल्या होत्या. कारच्या पुढच्या सीटवर त्या बसल्या होत्या. रमेश नावाच्या पोलीस इंस्पेक्टरला त्या झापत असल्याच व्हिडिओमध्ये दिसतय. या पोलीस इंस्पेक्टरमुळे अर्धातास थांबून रहाव लागलं, असं हरीता रेड्डी यांचा दावा आहे. तिने त्या इंस्पेक्टरला अनेक प्रश्न विचारले. त्याच्या वर्तनावर संताप, असमाधान व्यक्त केलं.

तो इंस्पेक्टर सॅल्यूट करतो, आणि….

“सकाळ झाली नाही का? कुठली परिषद होती तुझी? लग्नाला आलायस की, ड्युटीवर? तुझ्यासाठी अर्धातास थांबून रहाव लागलं. तुला पगार कोण देतो? सरकार की, YSRCP?” अशा शब्दात मंत्र्यांच्या पत्नीने त्या पोलीस इंस्पेक्टरला झापलं. तो शांतपणे तिथे उभ राहून हे सर्व ऐकत होता. व्हिडिओच्या शेवटी तो इंस्पेक्टर हरीता रेड्डीला सॅल्यूट करतो. तिच्या निर्देशानुसार ताफ्याच नेतृत्व करण्यासाठी पुढे निघून जातो.

'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला.
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल.
बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 आरोपींवर मकोका, पण मकोका म्हणजे नेमकं काय?
बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 आरोपींवर मकोका, पण मकोका म्हणजे नेमकं काय?.
वायदा अन् सत्ता आल्यानंतर युटर्न, फडणवीसांचा 'तो' वादा दादा विसरले?
वायदा अन् सत्ता आल्यानंतर युटर्न, फडणवीसांचा 'तो' वादा दादा विसरले?.
मंत्री धनंजय मुंडेंवर गुन्हा का नाही? खंडणीप्रकरणात सुरेश धसांचा सवाल
मंत्री धनंजय मुंडेंवर गुन्हा का नाही? खंडणीप्रकरणात सुरेश धसांचा सवाल.
एका गुन्ह्यात अटक अन् कराडचे अनेक गुन्हे उघड, 140 शेतकऱ्यांना चुना?
एका गुन्ह्यात अटक अन् कराडचे अनेक गुन्हे उघड, 140 शेतकऱ्यांना चुना?.
बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 जणांवर मकोको पण वाल्मिक कराडच सुटला!
बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 जणांवर मकोको पण वाल्मिक कराडच सुटला!.
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड.
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले.
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे.