रा पासून राहुल, राम आणि रावणही, भाजप खासदारची खोचक टीका काय?
काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेवर आहेत. दक्षिण भारतातून उत्तर भारताकडे असा त्यांचा प्रवास आहे. हाच धागा पकडत अनिल बोंडे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
सुरेंद्रकुमार आकोडे, अमरावतीः भाजपचे खासदार अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर खोचक टीका केली आहे. रा म्हणजे राहुल, रा म्हणे रावण आणि रा म्हणजे रामदेखील होतो. राहुल गांधी आणि रावणात जास्त साम्य आहे. कारण आताही राहुल गांधी दक्षिणेकडून उत्तरेकडे यात्रा (Bharat Jodo) करतायत. म्हणजे रावणाचं काम करतायत, असं वक्तव्य अनिल बोंडे यांनी केलंय..
काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेवर आहेत. दक्षिण भारतातून उत्तर भारताकडे असा त्यांचा प्रवास आहे. हाच धागा पकडत अनिल बोंडे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. रामाने उत्तरेकडून येत दक्षिणेकडे प्रवास केला. मात्र राहुल गांधी दक्षिणेकडून उत्तरेकडे निघालेत. श्रीरामाचं जीवन अजून अनेकांना समजलंच नाही.
विशेष म्हणजे या यात्रेत ज्या लोकांनी भारत तोडण्याची शपथ घेतली होती, त्यांच्या गळ्यात गळे घालण्याच काम राहुल गांधी करताहेत. अशी टीका भाजप खासदार अनिल बोंडे यांनी केली आहे.
काँग्रेसचा भारतातून प्रभाव कमी होतोय, तसेच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचं संघटन वाढवण्याच्या उद्देशाने राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेवर आहेत.
देशाचे, राज्यांचे तुकडे तुकडे करण्याचा भाजपाचा हेतू आहे, अशी टीका काँग्रेसच्या वतीने करण्यात येते. मात्र काँग्रेसला भारत जोडायचा आहे, असा संदेश घेऊन राहुल गांधी निघालेत.
काँग्रेसच्या इतिहासात यापूर्वीही महत्त्वाच्या नेत्यांनी भारतभर यात्रा केली. आता आगामी लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांच्या या यात्रेचा परिणाम कसा दिसून येतोय, हे पाहणं औत्सुक्याचं आहे.