शिवसेनेच्या पायाखालची वाळू घसरली, अनिल परबांनी चौकशीला जायला हवं होतं; चंद्रकांत पाटलांचा टोला

ईडी चौकशीवरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अनिल परब आणि शिवसेनेवर जोरदार निशाणा साधलाय. शिवसेनेच्या पायाखालची वाळू घसरली आहे. अनिल परब यांनी ईडी चौकशीसाठी हजर राहायला हवं होतं, असा टोला चंद्रकांत पाटील यांना लगावलाय.

शिवसेनेच्या पायाखालची वाळू घसरली, अनिल परबांनी चौकशीला जायला हवं होतं; चंद्रकांत पाटलांचा टोला
परिवहन मंत्री अनिल परब, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
Follow us
| Updated on: Aug 31, 2021 | 4:26 PM

नागपूर : परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने चौकशीसाठी उपस्थित राहण्याकरिता नोटीस बजावली होती. त्यानुसार 11 वाजेच्या सुमारास परब यांना ईडी कार्यालयात पोहोचायचे होते. मात्र, परब ईडी कार्यालयाकडे फिरकलेच नाही. त्यांनी ईडीकडे उपस्थित राहण्यासाठी 14 दिवसांचा अवधी मागून घेतलाय. त्यावरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अनिल परब आणि शिवसेनेवर जोरदार निशाणा साधलाय. शिवसेनेच्या पायाखालची वाळू घसरली आहे. अनिल परब यांनी ईडी चौकशीसाठी हजर राहायला हवं होतं, असा टोला चंद्रकांत पाटील यांना लगावलाय. (Chandrakant Patil criticizes Anil Parab and ShivSena over ED inquiry)

सर्वसामान्य माणसांना लगेच अटक होते. मग अनिल परब यांनी कितीही व्यस्त असलं तरी ईडी चौकशीला हजर राहायला हवं होतं. अनिल देशमुखांचंही असंच चाललं आहे. शिवसेनेच्या पायाखालची वाळू घसरली आहे. रांगेनं एक-एक मंत्री आहे. आधी राठोड गेले, मग देशमुख आणि आता अनिल परब. मंत्र्यांची अजून मोठी यादी आहे. काही जण सुपात आहेत, तर काही जण जात्यात, असा इशाराही पाटील यांनी यावेळी दिलाय.

राठोड, देशमुख प्रकरणात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न

ठाण्यात एका फेरिवाल्यानं महिला अधिकाऱ्याची बोटं छाटण्याचा प्रकार घडलाय. त्यावरुन चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केलीय. राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झालाय. राष्ट्रवादीच्या युवा पदाधिकाऱ्यावर गंभीर आरोप झाले, पण त्यांना अजून अटक नाही. संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला. तो खटला चालवायला हवा आणि संपवायला हवा. आता एक फेक केस तयार करुन त्यात क्लीन चीट मिळाली. ती केस पूजा चव्हाण केससोबत जोडून गैरसमज पसवण्याचं काम सुरु असल्याचा आरोपही पाटील यांनी केलाय. अनिल देशमुख यांच्या क्लीनचिट बाबतही असंच झाल्याचं पाटील म्हणाले.

परब यांचं ईडीला पत्रं

परब यांनी ईडीला एक पत्र पाठवून आज चौकशीसाठी उपस्थित राहू शकणार नसल्याचं कळवलं आहे. मंत्री असल्यामुळे आजचे कार्यक्रम अगोदरच ठरले आहेत. ते रद्द करता येणार नाहीत. त्यामुळे मला 14 दिवसांचा अवधी देण्यात यावा, असं परब यांनी पत्रात म्हटलं आहे. ईडीनेही परब यांचे पत्र स्वीकारले आहे. आता परब यांना वेळ द्यायचा की त्यांना दुसरे समन्स काढायचे यावर ईडीचे अधिकारी विचार करत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

अनिल परब यांना तिसरा धक्का

अनिल परब यांना धक्क्यावर धक्के बसत आहेत. कारण आधी अनिल परब यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या 100 कोटी वसुली प्रकरणात परब यांना चौकशीसाठी आज हजर राहायचं आहे. त्याशिवाय परिवहन खात्यातील परब यांच्या मर्जीतील एका अधिकाऱ्याच्या घरावर ईडीने धाडी मारल्या असल्याचे वृत्त आहे. या धाडीत ईडीच्या हाती काय कागदपत्रे लागली याबाबतची माहिती गुलदस्त्यात आहे. त्यानंतर आता अनिल परब यांना आणखी एक धक्का बसला आहे. परिवहन विभागातील पदोन्नतीसाठी लाखो रुपयांची वसुली केल्याची तक्रार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्यपालांकडे केली होती. त्यानुसार आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी लोकायुक्तांना आदेश देऊन या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार 2 सप्टेंबरला या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

इतर बातम्या :

अनिल परब यांना दुसरा धक्का, खास अधिकाऱ्याच्या घरावर ईडीचे छापे; संकट वाढणार?

परिवहन खात्यातील भ्रष्टाचाराची पहिली तक्रार, अनिल परब यांच्या चौकशीवर गजेंद्र पाटलांची पहिली प्रतिक्रिया

Chandrakant Patil criticizes Anil Parab and ShivSena over ED inquiry

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.