विनायक राऊतांपाठोपाठ अनिल परबांच्या बंगल्यावरही अज्ञातांनी सोडा बॉटल फेकल्या, वाद अजून वाढणार?
परिवहन मंत्री अनिल परब यांच्या कणकवलीच्या हरकुळ इथे बंद असलेल्या घरावरही मध्यरात्री सोडा बॉटल फेकण्यात आल्याचा प्रकार उजेडात आलाय. परब यांच्या घरासमोरिल प्रांगणात आणि दरवाजासमोर काचेचा खच पडला होता.
सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना काल झालेल्या अटक आणि जामीनावरील सुटकेचे पडसाद सिंधुदुर्गात उमटताना दिसत आहेत. शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्या बंगल्यावर अज्ञातांनी काल रात्री 10 च्या सुमारास सोडा बॉटल फेकल्या होत्या. त्यानंतर आता परिवहन मंत्री अनिल परब यांच्या कणकवलीच्या हरकुळ इथे बंद असलेल्या घरावरही मध्यरात्री सोडा बॉटल फेकण्यात आल्याचा प्रकार उजेडात आलाय. परब यांच्या घरासमोरिल प्रांगणात आणि दरवाजासमोर काचेचा खच पडला होता. त्यामुळे नारायण राणे यांना काल जामीन मिळाला असला तरी हे प्रकरण एवढ्यावरच थांबेल ही शक्यता धुसर मानली जात आहे. कारण, काल रात्री आमदार नितेश राणे यांनी ही ट्विट करून करारा जवाब मिलेगा असं सूचित केलं आहेच. (Unidentified persons threw soda bottles at Transport Minister Anil Parab’s house)
विनायक राऊतांच्या घरावरही बाटल्या फेकल्या
विनायक राऊत यांच्या सिंधुदुर्गातील घरावर अज्ञातांकडून हल्ला करण्यात आलाय. चार अज्ञात बाईकस्वारांनी विनायक राऊत यांच्या सिंधुदुर्गातील तळगाव इथल्या बंगल्यावर सोडा बॉटल फेकल्याची माहिती मिळतेय. सोडा बॉटल फेकल्यानंतर हे चौघेही पळून जाण्यात यशस्वी ठरल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या हल्ल्यात राऊत यांच्या बंगल्याचं कुठलंही नुकसान झालेलं नाही.
राणेंच्या अटकेसाठी पोलिसांवर अनिल परबांचा दबाव?
नारायण राणे यांच्या अटकेसाठी आलेले रत्नागिरी पोलीस अधीक्षक आपल्यावर एका मंत्र्याचा दबाव असल्याचं सांगत होते, असा दावा रत्नागिरीचे भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी केला माध्यमांशी बोलताना केला होता. त्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांचा फोन संभाषणाचा एक व्हिडीओ समोर आलाय. त्यात ते राणेंच्या अटकेसाठी पोलिस बळाचा वापर करण्याच्या सूचना देत असल्याचं पाहायला मिळत आहे.
अनिल परब नेमकं काय म्हणाले?
अनिल परब यांना पोलिसांचा फोन होता. त्यांचं बोलणं पत्रकार परिषदेतील माईकमध्ये रेकॉर्ड होत होतं. मी सध्या रत्नागिरीत आहे. मी आता विचारुन घेतो सीएम साहेबांना. हो… फक्त मी ठरवतो, मग तसं आपल्याला ताबडतोब ब्रीफ करावं लागेल ना? हो हो हो… मग कोणाला सांगू ब्रीफ करायला? डीजींना सांगतो. मी डीजींना सांगतो. हो… ठिक आहे, मी आता डीजींना सांगतो ताबडतोब… ठिकाय मी आता ताबडतोब बोलतो.
त्या दरम्यान आमदार भास्कर जाधव हे मोबाईलमधील काहीतरी मेसेज अनिल परब यांना दाखवतात. भास्कर जाधव म्हणतात, कोर्टाने पण नकार दिलाय..
त्यानंतर काही वेळाने अनिल परब फोन लावतात.
हॅलो, काय करताय तुम्ही लोकं??
नाय पण ते करावं लागेल तुम्हाला.. तुम्ही.. घेताय की नाही ताब्यामध्ये? हं ऑर्डर कसली मागतायेत ते? ऑर्डर कसली मागतायेत ते?
अहो कोर्टाने जे काय आहे ते हायकोर्ट ते येणार नाही कॉन्फिडन्समध्ये
हायकोर्ट आणि सेशन कोर्ट दोघांनीही त्यांचा जामीन नाकारला आहे.
पण मग घ्या ना,,, पोलीस फोर्स वापरुन करा… अहो वेळ लागणार मग कोर्टबाजी चालूच आहे ना त्याची
ठिकाय.. ओके
फोन बंद झाल्यानंतर भास्कर जाधव अनिल परबांना म्हणतात, नारायण राणेला ताब्यात घेतलाय वाटतं..
मग अनिल परब भास्कर जाधवांना म्हणतात, घरात बसलाय, पोलिसांनी वेढा घातलाय, पोलीस आतमध्ये गेले तेव्हा धक्काबुक्की झाली आता पोलीस ओढून बाहेर काढतायेत..
भास्कर जाधव म्हणतात.. चला आता (पत्रकार परिषद) संपवायला हवं.
त्यादरम्यान पत्रकार अनिल परब यांना विचारतात, नारायण राणे यांना अटक झाली आहे का?
त्यावर अनिल परब म्हणतात.. मला अजून त्याबाबतची माहिती मिळालेली नाही, त्यामुळे मी आता सांगू शकत नाही अटक झाली की नाही. मी इथे तुमच्यासमोर बसून आहे. मी तुम्हाला त्याबाबत काय सांगू.
इतर बातम्या :
शरद पवारांना कानशिलात मारली, तरीही त्यांनी संयम पाळला, राणेंना डिफेंड करण्यासाठी शेलारांकडून दाखला
Unidentified persons threw soda bottles at Transport Minister Anil Parab’s house