अनिल परबांच्या रिसॉर्टवर लवकरच बुलडोझर, पर्यावरण विभागाचे आदेश काय?

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून अनिल परब यांच्या दापोली रिसॉर्टमधील अनियमिततेचं प्रकरण लावून धरलं होतं. अखेर पर्यावरण मंत्रालयाकडून यावर कारवाई होत आहे.

अनिल परबांच्या रिसॉर्टवर लवकरच बुलडोझर, पर्यावरण विभागाचे आदेश काय?
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Sep 12, 2022 | 10:04 AM

मुंबईः शिवसेना नेते अनिल परब (Anil Parab) यांच्या दापोली येथील साई रिसॉर्टवर लवकरच कारवाई होणार असं दिसतंय. पर्यावरण विभागाकडून (Environmental Department) बांधकामातील अनियमितते प्रकरणी रिसॉर्ट पाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच चिपळूणच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (PWD) एक निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. येत्या 22 सप्टेंबरपर्यंत रिसॉर्ट पाडण्यासाठी कंत्राटदारांनी अर्ज करण्याचं आवाहन या निविदेद्वारे करण्यात आलंय. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून अनिल परब यांच्या दापोली रिसॉर्टमधील अनियमिततेचं प्रकरण लावून धरलं होतं. अखेर पर्यावरण मंत्रालयाकडून यावर कारवाई होत आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

अनिल परब यांनी 2017 मध्ये दापोली येथील जमीन विकत घेतली, मात्र त्याचं रजिस्ट्रेशन दोन वर्षानंतर केल्याचा आरोप आहे.

ही शेतजमीन असूनही सरकारी अधिकाऱ्यांच्या मदतीने ती नॉन अग्रीकल्चर करण्यात आल्याचंही म्हटलं जातंय.

हे रिसॉर्ट बांधकाम करताना CRZ नियमांचं उल्लंघन केल्याचाही आरोप आहे. मुरूड ग्रामपंचायतीने ही गोष्ट मान्य केली आहे, असा दावा पर्यावरण मंत्रालयाने केला आहे.

भाजपाला राजकीय फायदा काय?

मागील 20 वर्षांपासून शिवसेनेत असलेले अनिल परब हे पक्षाचे उत्तम नेते आणि विविध विषयांवर पकड असलेले व्यक्ती आहेत.

बीकॉम, एलएलबीचं शिक्षण झालंय. ते पेशाने वकील आहेत. विद्यार्थी दशेपासून त्यांचा विविध आंदोलनात सहभाग आहे. 2015 मध्ये वांद्रे पश्चिम पोटनिवडणुकीत नारायण राणेंचा पराभव करण्यात अनिल परब यांच्या पक्ष संघटनाचा मोठा फायदा शिवसेनेला झाला होता. 2017 मधील मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपसोबत युती तुटल्यानंतर शिवसेनेनं अनिल परबांवर मोठी जबाबदारी सोपवली होती. भाजपच्या विविध आरोपांना त्यांनी कायद्याच्या आधारानुसार उत्तर दिलं.

त्यानंतर 2019 मध्ये महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर भाजपा-शिवसेनेतील वाद विकोपाला गेले. आता शिंदे गटाच्या मदतीने महापालिकेवर सत्ता मिळवण्याचे भाजपचे मनसुबे आहेत. त्यामुळे अनिल परबांच्या रिसॉर्टवर कारवाई होणं, त्यांनी केलेला गैरव्यवहार उघडकीस येणं, यात भाजपाचा मोठा राजकीय फायदा आहे, असं म्हटलं जातंय.

किरीट सोमय्यांचं ट्विट काय?

आज सोमवारी दापोली येथील न्यायालयात यासंबंधी सुनावणी असल्याचं ट्विट किरीट सोमय्या यांनी काल केलं होतं. केंद्रीय पर्यावरण कायद्याखाली अनिल परब यांच्या रिसॉर्टवर फौजदारी खटला दाखल करावा तसेच महाराष्ट्र सरकारच्या खेड न्यायालयात बनावट कागदपतर् दाखवून, फसवणुकीने बिनशेती करून घेतल्याबद्दल कारवाई करावी, या दोन याचिकांवर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.