आनंद शिंदे आणि अनिरुद्ध वनकर यांना विधान परिषदेची संधी?; दलित मतांसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीत रस्सीखेच

महाविकास आघाडीकडून राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सादर केली आहे. काँग्रेसने अनिरुद्ध वनकर आणि राष्ट्रवादीने आनंद शिंदे यांना विधान परिषदेची संधी दिल्याचं वृत्त आहे.

आनंद शिंदे आणि अनिरुद्ध वनकर यांना विधान परिषदेची संधी?; दलित मतांसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीत रस्सीखेच
Follow us
| Updated on: Nov 06, 2020 | 7:29 PM

मुंबई: महाविकास आघाडीकडून राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सादर केली आहे. काँग्रेसने अनिरुद्ध वनकर आणि राष्ट्रवादीने आनंद शिंदे यांना विधान परिषदेची संधी दिल्याचं वृत्त आहे. वनकर आणि शिंदे दोघेही आंबेडकरी समाजातील मोठे गायक असल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीने दलित मतांना आपल्याकडे खेचण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केल्याचं सूत्रांनी सांगितलं. (aniruddha vankar, anand shinde likely to get mlc)

महाविकास आघाडीने आज अखेर राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची नावं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सादर करण्यात आली आहेत. आज संध्याकाळी 6च्या सुमारास अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, परिवहन मंत्री अनिल परब आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी राज्यपालांची भेट घेऊन त्यांना बंद लखोट्यातून 12 सदस्यांची यादी सोपवली. त्यात शिवसेनेकडून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, नितीन बानगुडे-पाटील, विजय करंजकर आणि चंद्रकांत रघुवंशी, राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे, आनंद शिंदे आणि काँग्रेसकडून सचिन सावंत, अनिरुद्ध वनकर मुझफ्फर हुसेन आदी नावांचा समावेश असल्याचं खात्रीलायक वृत्त आहे. मात्र, या यादीला अद्याप दुजोरा मिळालेला नाही. आता ही यादी राज्यपालांकडे आल्यानंतर राज्यपाल त्यावर कधीपर्यंत निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यावेळी परिवहन मंत्री अनिल परब यांनी ही यादी लवकरात लवकर मंजूर होईल असा विश्वास व्यक्त केला. राज्यपाल नियुक्त 12 नावांची यादी राज्यपालांना दिली. मुख्यमंत्र्यांचं पत्र आणि मंत्रिमंडळ ठराव यासह कायदेशीर बाबी नमूद करुन राज्यपालांना विनंती पत्र दिलं आहे सगळ्या कायदेशीर बाबींची पूर्तता करुन यादी सोपवली आहे, त्यामुळे राज्यपाल या यादीवर शिक्कामोर्तब करतील असा विश्वास असल्याचं परब म्हणाले. तर, राज्यपाल यादी मंजूर करतील की नाही हा जर तरचा प्रश्न आहे. त्यावर आताच भाष्य करणं योग्य नाही, असं सांगतानाच आम्ही सर्व बाबींची पूर्तता करून यादी दिली आहे. त्यामुळे राज्यपाल त्यावर शिक्कामोर्तब करतील अशी आशा आहे, असं नवाब मलिक यांनी सांगितलं.

दरम्यान, राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने बहुजन समाजाची मते मोठ्या प्रमाणावर खेचून सर्वच राजकीय पक्षांना धक्का दिला होता. त्यामुळे राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधींना संबोधित करताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दलित समाज आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी कामाला लागा, असे आदेश दिले होते. त्यानंतर अनेक दलित नेते आणि कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीत प्रवेशही देण्यात आला होता. आता आनंद शिंदे यांना उमेदवारी देऊन राष्ट्रवादीने दलित मतांची बेगमी करण्याची राजकीय खेळी आखल्याचं बोललं जात आहे. राष्ट्रवादीने शिंदे यांना संधी दिल्याने काँग्रेसनेही आंबेडकरी चळवळीतील गायक अनिरुद्ध वनकर यांना संधी देऊन दलित समाजाला आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षात दलित मतांसाठी मोठी रस्सीखेच सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलं. (aniruddha vankar, anand shinde likely to get mlc)

संबंधित बातम्या:

Anand Shinde | विधानपरिषदेत ‘शिंदेशाही बाणा’, राष्ट्रवादीकडून आनंद शिंदेंचं तिकीट जवळपास कन्फर्म

राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषदेवर एकनाथ खडसे, राजू शेट्टी, आनंद शिंदे, यशपाल भिंगे यांची नाव जवळपास निश्चित

विधानपरिषद : उर्मिला आणि नितीन बानुगडे विधानपरिषदेवर, शिवसेनेची चार नावं ठरली !

(aniruddha vankar, anand shinde likely to get mlc)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.