आमचा पंतप्रधान, जनतेचा प्रधान नोकर मुका आणि बहिरा : अनुराग कश्यप
नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशभरात आंदोलनाचं सत्र सुरु आहे. या पार्श्वभूमीवर बॉलिवूडमधील चर्चित सिनेनिर्माता अनुराग कश्यपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट हल्लाबोल केला (Anurag Kashyap criticize PM Modi).
मुंबई : नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशभरात आंदोलनाचं सत्र सुरु आहे. कुठे दगडफेक तर कुठे जाळपोळ होत आहे. तर त्याविरोधात अनेक ठिकाणी शांततेतही मोर्चे निघत आहेत. अशा परिस्थितीत बॉलिवूडमधील चर्चित सिनेनिर्माता अनुराग कश्यपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट हल्लाबोल केला (Anurag Kashyap criticize PM Modi).
अनुराग कश्यपने पंतप्रधान मोदींनी मुका आणि बहिरा असं संबोधलं आहे. अनुराग कश्यपने ट्विट करुन मोदींवर तिखट टीका केली. अनुराग कश्यप काय म्हणाला? “आमचा प्रधानसेवक, आमचा पंतप्रधान, जनतेचा प्रधान नोकर नरेंद्र मोदी बहिरे, मुके आणि भावनाशून्य आहेत. ते केवळ एक नाटकी आहेत जे भाषण देऊ शकतात. अन्य काही त्यांच्या आवाक्याबाहेरचं आहे. त्यांना ना दिसतंय, ना ऐकू येतंय. ते आता नव नवा खोटापणा शिकण्यात व्यस्त आहेत” असं ट्विट अनुराग कश्यपने केलं आहे.
हमारा प्रधान सेवक , हमारा प्रधान मंत्री , जनता का प्रधान नौकर @narendramodi बहरा है, गूँगा है , और भावनाओं के परे है । वो सिर्फ़ एक नौटंकी है जो भाषण दे सकता है बाक़ी कुछ उसके बस का नहीं है । उसको ना दिखाई दे रहा है ना सुनाई दे रहा है । वो अभी नए नए झूठ सीखने में व्यस्त है ।
— Anurag Kashyap (@anuragkashyap72) December 20, 2019
यापूर्वीही त्यांनी आरोप केला होता की सरकार समर्थक दंगे सुरु करतात आणि त्यानंतर जनतेवर पोलीस तुटून पडतात. देशातील सद्यस्थितीला भाजप सरकार जबाबदार असून, चिघळलेल्या परिस्थितीमागे भाजपचाच हात आहे, असाही आरोप अनुराग कश्यप यांनी केला.