Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘एक अधिकारी आपली ड्यूटी करतोय, तर सरकारमधील मंत्री त्याला जेलमध्ये टाकण्याची धमकी देतोय’

एक अधिकारी आपलं चुकीचं सर्टिफिकेट आयोगासमोर देणार नाही. कारण, त्याची नोकरी धोक्यात येणार आहे. माझ्या माहितीप्रमाणे काही लोक समीर वानखेडे यांचं जात प्रमाणपत्र खोटं ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आयोगाकडून हे होऊ दिलं जाणार नाही, असं अरुण हलदर म्हणाले.

'एक अधिकारी आपली ड्यूटी करतोय, तर सरकारमधील मंत्री त्याला जेलमध्ये टाकण्याची धमकी देतोय'
अरुण हलदर, समीर वानखेडे
Follow us
| Updated on: Oct 31, 2021 | 5:35 PM

मुंबई : एक अधिकारी आपलं काम करत आहे. मात्र, महाराष्ट्र सरकारचा एक मंत्री त्या अधिकाऱ्यावर व्यक्तिगत आरोप करत आहे. अधिकाऱ्याला जेलमध्ये टाकण्याची धमकी देत आहे. यामागे कारण काय? त्याची चौकशी झाली पाहिजे, असं राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांनी म्हटलंय. समीर वानखेडे यांनी काल अरुण हलदर यांची भेट घेतली होती. त्यावेळी वानखेडे यांनी आपल्याकडील कागदपत्रे हलदर यांना दाखवली होती. त्यानंतर आज हलदर यांनी माध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे. (Arun Haldar’s reaction to Nawab Malik’s allegations against Sameer Wankhede)

संबंधित अधिकारी मदतीसाठी आयोगासमोर आला होता. त्यांनी आपली व्यथा मांडली आहे. आम्ही त्याची चौकशी करत आहोत. मात्र, अनुभवाने मी सांगतो की, त्यांचं जात प्रमाणपत्र योग्य आहे. मात्र, अजून आम्ही आयोगामार्फत समीर वानखेडेंच्या जात प्रमाणपत्राची चौकशी करत आहोत. एक अधिकारी आपलं चुकीचं सर्टिफिकेट आयोगासमोर देणार नाही. कारण, त्याची नोकरी धोक्यात येणार आहे. माझ्या माहितीप्रमाणे काही लोक समीर वानखेडे यांचं जात प्रमाणपत्र खोटं ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आयोगाकडून हे होऊ दिलं जाणार नाही, असं अरुण हलदर म्हणाले.

मलिकांच्या आरोपांना उत्तर

आयोगामार्फत योग्यरित्या चौकशी केली जाणार आहे. ते म्हणतात की मी भाजपचा माणूस आहे. मात्र, या क्षेत्रात मी 34 वर्षापासून काम करतोय. म्हणून आयोगाला अधिकार आहे आणि त्या अधिकाराचा वापर करुनच मी बोलत आहे, असंही हलदर म्हणाले.

एकतर्फी निर्णय देणार नाही

वानखेडे हे शिक्षित आहेत. ते कायदा जाणतात. त्यांच्याकडे कागदपत्रे आहेत, असं सांगतानाच आमच्याकडे त्यांच्या जातीबाबत कोणी तक्रार केल्यास आम्ही त्याची चौकशी करू. पण कोणताही निर्णय एकतर्फी होणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. याप्रकरणात महाराष्ट्र सरकार काय करतं ते पाहू. त्यानंतर राष्ट्रीय मागासवर्ग आयोग आपलं काम करेल, असंही हलदर यांनी काल स्पष्ट केलं होतं.

समीर वानखेडे जन्माने मुस्लिमच- नवाब मलिक

दुसरीकडे नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्याविरोधातील आरोपांची मालिका सुरुच ठेवली आहे. समीर वानखेडे हे जन्माने मुस्लिम आहेत. त्यांचं संपूर्ण कुटुंबच मुस्लिम आहे. त्यांचे नातेवाईकही मुस्लिमच आहे, असं सांगतानाच बोगस दाखल्यावरूनच वानखेडे यांनी नोकरी मिळवली असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. नवाब मलिक यांनी मीडियाशी बोलताना हा दावा केला. समीर वानखेडेंचा मेव्हणा आहे. तो आता व्हेनिसला राहतो. तो त्यांचा नातेवाईक आहे. तो मुस्लिम आहे. काल राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांनी मीडियाशी संवाद साधताना एक विधान केलं. वानखेडेंनी धर्मांतर केलं नाही असं ते म्हणाले. मी पुन्हा सांगतो वानखेडे जन्माने मुस्लिम आहेत. त्यांचे कुटुंब मुस्लिम होते, असं मलिक म्हणाले.

इतर बातम्या :

परमबीर सिंह कुठे गायब झाले? पोलिस आणि सरकारला पडलेल्या प्रश्नांचं संजय निरुपमांनी दिलं उत्तर!

‘पुण्यात पुढचा महापौर राष्ट्रवादीचा’, अजितदादांच्या नेतृत्वात कामाला लागण्याचे सुप्रिया सुळेंचे आदेश

Arun Haldar’s reaction to Nawab Malik’s allegations against Sameer Wankhede

'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.
'कृपा करून...', अजितदादांनी संभाजी भिडे यांना सुनावले खडेबोल
'कृपा करून...', अजितदादांनी संभाजी भिडे यांना सुनावले खडेबोल.
रायगडावरील त्या समाधीसंदर्भात एक सवाल अन् उदयनराजे भडकले, कोण वाघ्या?
रायगडावरील त्या समाधीसंदर्भात एक सवाल अन् उदयनराजे भडकले, कोण वाघ्या?.
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, 31 तारखेला मुंबईत थर्ड डिग्री?
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, 31 तारखेला मुंबईत थर्ड डिग्री?.
वडिलांचं अफेअर अन्.., दिशाच्या मृत्यूचं कारण समोर; क्लोजर रिपोर्ट काय?
वडिलांचं अफेअर अन्.., दिशाच्या मृत्यूचं कारण समोर; क्लोजर रिपोर्ट काय?.
देशमुख हत्या प्रकरणात नव्या कराडची एन्ट्री, कोण आहे सुग्रीव कराड?
देशमुख हत्या प्रकरणात नव्या कराडची एन्ट्री, कोण आहे सुग्रीव कराड?.
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.