तपास अधिकाऱ्याची जात, धर्म काढणं दुर्दैवी; NCB चा वापर राजकीय दबावासाठी का होईल? फडणवीसांचा सवाल

अधिकारी तपास करतो म्हणून त्याची जात, धर्म काढणे आणि त्यावर आधारित आरोप करणं हे दुर्दैवी आहे. शेवटी वानखेडे यांच्या पत्नीला खुलासा करावा लागला. वानखेडे यांनीही आपल्या प्रमाणपत्राबाबत खुलासा केलाटय. त्यामुळे विशिष्ट हेतूने आरोप करणं योग्य नाही, अशा शब्दात फडणवीस यांनी मलिकांच्या आरोपांवर टीका केलीय.

तपास अधिकाऱ्याची जात, धर्म काढणं दुर्दैवी; NCB चा वापर राजकीय दबावासाठी का होईल? फडणवीसांचा सवाल
समीर वानखेडे, देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: Oct 26, 2021 | 4:35 PM

दादरा नगर-हवेली : मुंबई क्रुझ ड्रग्स आणि आर्यन खान प्रकरणात अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. खंडणी, लाचखोरी आणि बनावट कागदपत्राद्वारे नोकरी मिळवल्याच्या आरोपाचा त्यात समावेश आहे. याबाबत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकार आणि नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधलाय. अधिकारी तपास करतो म्हणून त्याची जात, धर्म काढणे आणि त्यावर आधारित आरोप करणं हे दुर्दैवी आहे. शेवटी वानखेडे यांच्या पत्नीला खुलासा करावा लागला. वानखेडे यांनीही आपल्या प्रमाणपत्राबाबत खुलासा केलाटय. त्यामुळे विशिष्ट हेतूने आरोप करणं योग्य नाही, अशा शब्दात फडणवीस यांनी मलिकांच्या आरोपांवर टीका केलीय. (Devendra Fadnavis criticizes Nawab Malik and Thackeray government)

नवाब मलिक यांचे दुःख वेगळे आहे. ते स्पष्टपणे समोर येत आहे आहे. तपास अधिकाऱ्यांना टार्गेट करणे हे योग्य नाही. कारण, ते घटनात्मक पदावर आहेत. घटनात्मक पदावरचा माणूस सांगेल की मी याला जेलमध्ये टाकणार, कारवाई करणार, सर्टिफिकेट खोटे आहे. परत आपल्या सरकारवर दबाव टाकून साक्षीदारांना वादाच्या भोवऱ्यात आणायचे. हे जे सुरू आहे ते बरोबर नाही. माझे म्हणणे एवढेच आहे की साक्षीदारांची विश्वासार्हता न्यायालयाबाहेर समाप्त करण्याची पद्धत सुरु झाली तर कुठलीच केस टिकणार नाही. त्यासाठी शासकीय यंत्रणांचा वापर झाला तर तेही चूक असेल. पण एक गोष्ट निश्चित की या प्रकरणात काही आरोप निश्चित झालेत. एनसीबीतील वरिष्ठांनी त्या आरोपांची चौकशी केली पाहिजे. पण त्याच वेळी तपास अधिकाऱ्यांना धमकावणे हे योग्य नाही, असंही फडणवीस म्हणाले.

ड्रग्स माफियांसाठी तुमची बॅटिंग सुरु आहे का?

NCB चा वापर राजकीय दबाब आणण्यासाठी का होईल? NCB कारवाई कोणावर करते? त्यांची सर्व कारवाई ड्रग्सच्या प्रकरणात होते! मग असे म्हणायचे का, सगळ्या ड्रग्जवाल्यांसाठी तुम्ही बॅटिंग करीत आहात ? असे नाही ना म्हणता येत! मुळात त्यांचं दुःख आहे की जे छापे पडत आहेत आणि त्यातून जी माहिती बाहेर येत आहे, यातून हे खरोखर महावसुली सरकार आहे असा एक संदेश लोकांमध्ये जात आहे आणि त्यावर लोकांचा विश्वास बसतोय, असा खोचक टोला फडणवीसांनी लगावला आहे.

फडणवीसांकडून ठाकरे सरकारवर प्रश्नांची सरबत्ती

आजही ही केस कोर्टात आहे त्यामुळे मी बोलणार नाही. पण अधिकारी आणि साक्षीदार टार्गेट करणे योग्य नाही. असं होत राहिलं तर यापुढे कुठलीच केस टिकणार नाही. अशा प्रकारच्या प्रकरणार प्रसिद्धी मिळते म्हणून महाविकास आघाडीचे नेते बोलत आहेत. महाराष्ट्रात 1 हजार कोटींची दलाली होते त्यावर हे नेते गप्प का? 190 कोटींची कमाई सापडली त्यावर हे नेते गप्प का आहेत? सॉफ्टवेअरने वसुली होते त्यावर हे नेते का बोलत नाहीत? गृहमंत्री फरार आहेत त्यावर हे गप्प का आहेत? महाविकास आघाडीच्या नेत्यांची इतकी प्रकरणे सुरू आहेत, त्यावरून लक्ष दुसरीकडे हटवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. संजय राऊत नवाब मलिक एकदा तरी शेतकऱ्यावर बोलले का? अशी प्रश्नांची सरबत्तीच फडणवीस यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना केलीय.

इतर बातम्या :

महाराष्ट्रातील खंडणीखोर, वसुली सरकार तुम्हाला इथं हवं आहे का? दादरा नगर-हवेलीतून फडणवीसांचा घणाघात

‘इंटरव्हलनंतर राऊत बोलणार असतील तर क्लायमेक्स मी करणार’, नितेश राणेंचा शिवसेनेला थेट इशारा

Devendra Fadnavis criticizes Nawab Malik and Thackeray government

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.