ओवेसींच्या ‘कॉन्ट्रॅक्ट मॅरेज’ला उत्तर, पूनम महाजन यांचं धडाकेबाज भाषण

विधेयकावर चर्चेदरम्यान खासदारांनी आपली मतं व्यक्त केली. पण भाजप खासदार पूनम महाजन (Poonam Mahajan) आणि एमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या भाषणांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. ओवेसींनी त्यांच्या भाषणात मांडलेल्या मुद्द्यांनाही पूनम महाजन (Poonam Mahajan) यांनी उत्तर दिलं.

ओवेसींच्या 'कॉन्ट्रॅक्ट मॅरेज'ला उत्तर, पूनम महाजन यांचं धडाकेबाज भाषण
Follow us
| Updated on: Jul 25, 2019 | 7:55 PM

नवी दिल्ली : तिहेरी तलाक विधेयकावर लोकसभेत दिवसभर चर्चा झाली आणि सायंकाळी हे विधेयक मंजूर करण्यात आलं. या विधेयकाला 303 खासदारांनी पाठिंबा दिला, तर 82 खासदारांनी विरोधात मतदान केलं. जेडीयू, काँग्रेस आणि टीएमसीने या विधेयकाला विरोध करत कामकाजातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. विधेयकावर चर्चेदरम्यान खासदारांनी आपली मतं व्यक्त केली. पण भाजप खासदार पूनम महाजन (Poonam Mahajan) आणि एमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या भाषणांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. ओवेसींनी त्यांच्या भाषणात मांडलेल्या मुद्द्यांनाही पूनम महाजन (Poonam Mahajan) यांनी उत्तर दिलं.

तिहेरी तलाकवर बोलताना पूनम महाजन म्हणाल्या, “मी एका मुलीची आई आहे, तुमच्या मुलीला व्हॉट्सअपवर ‘तलाक, तलाक, तलाक’ पाठवलं तर तुम्हाला कसं वाटेल? आम्ही इंग्रजी शिकताना HE आणि SHE चा फरक शिकत होतो. वडिलांना याचा अर्थ विचारला. त्यांनी सांगितलं, पुरुषाला HE म्हणतात आणि महिलेला SHE म्हणतात, पण HE च्या अगोदर S लावलंय, कारण S ला वरचा दर्जा आहे. हीच विचारधारा आम्ही घेऊन चालतो आणि त्याचसाठी हे विधेयक आणण्यात आलंय.”

दरम्यान, असदुद्दीन ओवेसी यांनी मुस्लीम लग्न हे कॉन्ट्रॅक्ट असल्याचं म्हटलं होतं. यालाही पूनम महाजन यांनी उत्तर दिलं. “विवाह आमच्यात एक पवित्र संस्कार मानला जातो. मग तो कोणताही धर्म असो, पत्नी आणि पती सोबत असतात. हाच विचार घेऊन आम्ही चालतो. या पद्धतीला एक ताकद म्हणून पुढे चालवलं पाहिजे. प्रत्येकाची धर्माची स्वतःची परिभाषा आहे. पण आपण ज्या समाजात राहतो त्या धर्माची परिभाषाही धर्मासोबत पुढे नेली पाहिजे,” असं उत्तर पूनम महाजन यांनी दिलं.

समाज आज बदलतोय. जग आणि भारत आज ज्या पद्धतीने पुढे जात आहे, त्याच पद्धतीने आपल्याला विचारही बदलायला हवेत. आम्ही ज्या धर्मात आहोत, त्यातही सुधारणा झाल्या. समाजसुधारकांनी बदल घडवून आणले. ही ताकद आपल्याला कायद्याने दिली आहे, असंही पूनम महाजन म्हणाल्या.

पाहा संपूर्ण भाषण :

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.