राज्यपाल कोश्यारींवर आधी मुख्यमंत्री कडाडले, आता ओवेसीही भडकले!

मुंबई: महाराष्ट्रात मंदिर सुरु करण्याच्या मुद्द्यावरुन भाजप विरुद्ध महाविकास आघाडी सरकारमध्ये जोरदार धुमश्चक्री पाहायला मिळतेय. याच मुद्द्यावर राज्यपाल कोश्यारी यांनी लिहिलेल्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. या वादात आता एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनीही उडी घेतली आहे. ज्या राज्यपालांनी संविधानाची शपथ घेतली. त्यांनी असं वक्तव्य करणं दुर्दैवी असल्याची टीका ओवैसी यांनी केलीय. […]

राज्यपाल कोश्यारींवर आधी मुख्यमंत्री कडाडले, आता ओवेसीही भडकले!
Follow us
| Updated on: Oct 13, 2020 | 5:58 PM

मुंबई: महाराष्ट्रात मंदिर सुरु करण्याच्या मुद्द्यावरुन भाजप विरुद्ध महाविकास आघाडी सरकारमध्ये जोरदार धुमश्चक्री पाहायला मिळतेय. याच मुद्द्यावर राज्यपाल कोश्यारी यांनी लिहिलेल्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. या वादात आता एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनीही उडी घेतली आहे. ज्या राज्यपालांनी संविधानाची शपथ घेतली. त्यांनी असं वक्तव्य करणं दुर्दैवी असल्याची टीका ओवैसी यांनी केलीय. संविधानाची शपथ घेताना हिंदुत्ववादी असल्याची कोणती परीक्षा नसते. मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वनिष्ठतेबद्दल बोलणं अत्यंत चुकीचं असल्याचंही ओवैसी यांनी म्हटलंय. (Asaduddin Owaisi on Maharashtra Temple Controversy )

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील मंदिरं सुरु करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं. त्या पत्रात कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाची आठवण करुन दिली. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खरमरीत शब्दात राज्यपाल कोश्यारी यांना पत्र लिहिलं. माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची गरज नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही गरज नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रात म्हटलंय.

‘त्या’ पत्रावरुन भाजप नेत्यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर प्रहार

मुख्यमंत्र्यांनी राज्यपाल कोश्यारी यांनी लिहिलेल्या पत्रावरुन आता भाजप आणि शिवसेना आमनेसामने आलीय. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांचं हे पत्र अत्यंत खेदजनक असल्याचं म्हटलंय. तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवला. ‘बाळासाहेबांनाही हिंदूहृदयस्रमाट म्हणणं बंद केलं, त्यामुळं उद्धव ठाकरे यांना हिंदुत्व शिकवण्याचीच गरज असल्याची खोचक टीका पाटील यांनी केलीय.

भाजपच्या टीकेला शिवसेना नेत्यांचं प्रत्युत्तर

एकीकडे भाजप नेते मुख्यमंत्र्यांवर टीका करत असताना, शिवसेना खासदार संजय राऊत आणि शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी भाजपवर शरसंधान साधलं. उद्धव ठाकरे हिंदूहृदयसम्राटांचे पुत्र आहेत, त्यांना हिदुत्व शिकवण्याची गरज नसल्याचं राऊत म्हणाले.  ठाकरे सरकार लोकनियुक्त आहे आणि राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. त्यामुळं सरकार घटनेनुसार चालत आहे की नाही तेवढंच पाहा, असा सल्लाही राऊतांनी राज्यपालांना दिलाय.  तर राज्यपालांनी असं पत्र पाठवणं योग्य नसल्याचं नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

शिवसेना-भाजप वाादावर आंबेडकरांचा टोला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रावरुन राज्यपालांची अदब राखली गेली नसल्याची टिप्पणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलीय. शिवसेनेनं हिंदुत्व सोडलेलं नाही. सेना आजही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर कायम आहे. मात्र राज्यात सध्या शिवसेना आणि भाजपमध्ये सॉफ्ट आणि हार्ड हिंदुत्वाची लढाई सुरु असल्याचा टोला आंबेडकरांनी लगावला.

संबंधित बातम्या:

मुख्यमंत्र्यांचं राज्यपालांना पत्र खेदजनक, फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

उद्धव ठाकरे हिंदूहृदयसम्राटांचे पुत्र, त्यांना हिंदुत्वाचे धडे गिरवण्याची गरज नाही : राऊत

‘राज्य सांभाळता येत नसल्याने उद्धव ठाकरेंचा तोल सुटतोय; राज्यपालांशी अहंकाराने बोलणे शोभते का?’

Asaduddin Owaisi on Maharashtra Temple Controversy

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.