Maharashtra politics : सत्ता येऊनही भाजपाच्या गोटात शांतता; कार्यकर्त्यांनी जल्लोष का केला नाही?, शेलारांनी सांगितलं नेमकं कारण

उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची संधी देऊन भाजपाने सर्वांना धक्का दिला. यामुळे देवेंद्र फडणवीस हे नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Maharashtra politics : सत्ता येऊनही भाजपाच्या गोटात शांतता; कार्यकर्त्यांनी जल्लोष का केला नाही?, शेलारांनी सांगितलं नेमकं कारण
आशिष शेलार, आमदारImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Jul 01, 2022 | 1:17 PM

मुंबई :  गेल्या काही दिवसांमध्ये राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी पहायला मिळाल्या, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकार अल्पमतात आले. त्यानंतर बहुमत सिद्ध करण्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि सरकार कोसळले. त्यानंतर भाजपाकडून राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करण्यात आला. गुरुवारी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र यामुळे फडणवीस हे नाराज असल्याची चर्चा आहे. तसेच या शपथविधी सोहळ्यानंतर भाजप कार्याकर्त्यांनी जल्लोष देखील केला नसल्याचे पहायला मिळत आहे. यावर आता भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर कार्यकर्त्यांचे खूप प्रेम आहे. साहाजिकच आपला नेता मुख्यमंत्री न झाल्याने त्यांनी जल्लोष केला नसल्याचे शेलार यांनी म्हटले आहे.

शेलारांचा शिवसेनेवर निशाणा

यावेळी बोलताना  आशिष शेलार यांनी शिवसेनेवर देखील निशाणा साधाला आहे. आमदार शिवसेनेतून का फुटले याचे शिवसेनेने आत्मपरीक्षण आणि आत्मचिंतन करायची गरज असल्याचे शेलाय यांनी म्हटले आहे. संजय राऊत यांनी आतातरी बडबड बंद करावी असे म्हणत त्यांनी संजय राऊत यांना देखील टोला लगावला आहे. शिवसेनेतून फुटलेल्या आमदारांनी त्यांचे काम चोख केले. भाजपाच्या आमदारांनी त्यांचे काम चोख केले आणि राज्यात हिंदुत्त्वाला पुढे घेऊन जाणारे सरकार स्थापन झाले, बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारा मुख्यमंत्री राज्याला मिळाल्याचे शेलार यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

फडणवीस नाराज असल्याची चर्चा

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस हेच पुढचे मुख्यमंत्री असतील असा अंदाज बांधला जात होता. या सर्व पार्श्वभूमीवर भाजपच्या गोटात जल्लोषाला सुरुवात झाली होती. मात्र एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याच्या अवघ्या काही तास आधी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे हे नवे मुख्यमंत्री असतील असे फडणवीस यांनी जाहीर केले. तर आपण या मंत्रीमंडळात सहभागी होणार नसल्याचे देखील त्यांनी जाहीर केले होते. मात्र त्यानंतर पक्षश्रेष्ठींच्या आदेशानंतर त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावरून फडणवीस हे नाराज असल्याचा अंदाज बाधला जात आहे.

दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.