पब आणि पार्टी गँगची तुरुंगवारी निश्चित, यात कुणी सत्ताधारी आहेत का? : आशिष शेलार
"लॉकडाऊन काळात 15 हजार पेक्षा जास्त जणांनी जीव गमवला असताना बेकायदेशीरपणे पार्ट्यांचं आयोजन करणारी पब आणि पार्टी गँग जेलमध्ये जाईल", असं आशिष शेलार म्हणाले (Ashish Shelar on Sushant singh Rajput case).
मुंबई : “सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात पोलिसांच्या तपासात दिशाभूल करणारे अदृश्य हात आता समोर येतील. लॉकडाऊन काळात 15 हजार पेक्षा जास्त जणांचा जीव गमवला असताना बेकायदेशीरपणे पार्ट्यांचं आयोजन करणारी पब आणि पार्टी गँग जेलमध्ये जाईल”, असा घणाघात भाजप नेते आशिष शेलार यांनी केला (Ashish Shelar on Sushant singh Rajput case).
#Sushantsinghrajput Thanks Hon SC ! CBI enquiry = #Justice4ssr ! “Hidden hands” misguidinh police investigation will be exposed ! Jail time for “Pub & party gang” who enjoyed illegally, while 15,000+ Mumbaikars died in lockdown ! Note- Justice wil b done
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) August 19, 2020
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला. या निर्णयानंतर भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली. त्याचबरोबर लॉकडाऊन काळात मुंबईत पार्ट्याचं आयोजन करणाऱ्यांमध्ये कुणी सत्ताधारी पक्षातील होते का? असा सवाल आशिष शेलार यांनी ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बोलताना उपस्थित केला आहे.
“लॉकडाऊन काळात लोक घरातून बाहेर पडू शकत नव्हते. दुर्देवाने मित्रपरिवार किंवा कुणी नातेवाईकाचा मृत्यू झाला तर त्यांचं अत्यंदर्शनही घ्यायला जाता येत नव्हतं. अशावेळी मुंबईत पार्ट्या झाल्या हे स्पष्ट होत आहे. या पार्ट्यांना समर्थन देण्याची भूमिका असलेले पब आणि पार्टी गँगचे कुणी सत्ताधारी आहेत का? याचंही उत्तर राज्य सरकारला द्यावं लागेल”, असं भाजप नेते आशिष शेलार म्हणाले.
“आम्ही सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत करतो. पहिल्या दिवसापासून आम्ही प्रश्न हाच विचारत होतो की, मुंबई पोलिसांच्या चौकशीची दिशा ही अयोग्य दिशेने का सुरु आहे? जे याप्रकरणातील साक्षीदार आहेत, त्यांचे जबाब का घेतले जात नाहीत? या प्रकरणातील जे मानसोपचार तज्ज्ञ आहेत, ज्यांनी सुशांतला नैराश्यात असल्याची घोषणा केली त्यांना भारतात प्रॅक्टिस करण्याची परवानगी नव्हती. तरीदेखील अशा लोकांचा जबाब मुंबई पोलीस का घेतला?”, असे प्रश्न आशिष शेलार यांनी उपस्थित केले.
“खरंतर प्रश्न मुंबई पोलिसांच्या क्षमतेचा नव्हता. मुंबई पोलिसांना योग्य दिशेने काम करु दिलं जात नव्हतं. राज्य सरकारमधील कोण मुंबई पोलिसांना योग्य दिशेने काम करु देत नव्हतं? त्यांना आता उत्तर द्यावं लागेल”, असं आशिष शेलार म्हणाले.
“या प्रकरणाचा योग्य तपास झाला पाहिजे. मुंबई पोलिसांना लपवाछपवी कुणी करायला लावली? मुंबई पोलिसांना अयोग्य दिशेने तपास करण्याची भूमिका का घ्यावी लागली? याचं उत्तर सरकारमध्ये बसलेल्या पक्षांना द्यावं लागेल”, असं आशिष शेलार म्हणाले.
“या प्रकरणात कोण दोषी आहे, दोष कुणाचा आहे, गुन्हा कसा घडला? याची इंत्यंभूत चौकशी घडण्याआधी भाजपने कुणाचंही नाव घेतलेले नाही. पण शिवसेनेला खुलासा का द्यावा लागला, याचं उत्तर त्यांनीच द्यावं”, असं आशिष शेलार यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या :
सत्यमेव जयते ! सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयावर, पार्थ पवार यांची प्रतिक्रिया
ठाकरे सरकारची दादागिरी संपेल, सोमय्यांचा हल्लाबोल, राणे ते शेलार, विरोधकांचा घणाघात
मुंबई पोलिसांविरोधात षडयंत्र, सीबीआय तपासाच्या निकालानंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया
पार्थ पवारांची मागणी आजोबांना आवडली का, यावर बोलणार नाही, पण… : देवेंद्र फडणवीस
तपास कुणीही केला, तरी सत्य हे सत्यच; रिया सीबीआय चौकशीस तयार, वकिलांची प्रतिक्रिया