‘बिल्डर, दारूवाले, टाटांना सवलतीची खैरात, मग समान्य मुंबईकरांना काय?’, आशिष शेलारांचा शिवेसेनेवर निशाणा
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना संपर्क अभियान राबवणार असल्याची माहिती समोर आली आहे. याच मुद्द्यावरुन भाजप आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला (Ashish Shelar slams ShivSena over sampark abhiyan).
मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना संपर्क अभियान राबवणार असल्याची माहिती समोर आली आहे. याच मुद्द्यावरुन भाजप आमदार आशिष शेलार यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधला. “बिल्डर, दारूवाले, टाटांना सवलतीची खैरात, मग समान्य मुंबईकरांना काय दिलेत? समुद्राचे पाणी गोडे करायला निघालात पावसाचे पाणी घरात घुसते त्याचे काय? आता उपनगरात एनए टँक्स वसूली करुन पाकिटमारी का करताय? असे बरेच हिशेब मुंबईकरांचे बाकी आहेत. त्यामुळे तुम्ही घराघरात जाच”, असा टोला भाजपा नेते आशिष शेलार यांनी लगावला (Ashish Shelar slams ShivSena over sampark abhiyan).
“घराघरात जाताय? जा जा, मुंबईकर तुमची वाटच पाहत आहेत. त्यांना विचारायचे आहे. कोरोनाला घाबरून घराघरात लपून का बसला होतात? मुख्यमंत्र्यांसह सगळे तुम्ही तेव्हा कुठे होतात? एकही रुपयांची मदत का दिली नाहीत? अवाजवी वाढीव वीज बिले पाठवून का छळताय?”, असे प्रश्न शेलार यांनी उपस्थितीत केले आहेत.
“लस उपलब्ध असतानाही लसीकरणात महाराष्ट्र मागे पडला. कोरोना लसीबाबत मंत्र्यांनीच गैरसमज पसरवले. राज्यातील साडेचार लाख आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरणच झाले नाही. सरकार अपयशी ठरले. महाराष्ट्रात रडव्यांचे रडगाणे सुरुच राहिले आणि पुन्हा कोरोनाने डोकेवर काढले आहे. लसीबाबत प्रश्न उपस्थितीत करणाऱ्या मंत्री नवाब मलिक यांच्यावर आरोग्य मंत्री काय कारवाई करणार?”, असा सवाल ही त्यांनी केला (Ashish Shelar slams ShivSena over sampark abhiyan).
आशिष शेलार नेमकं काय म्हणाले? बघा व्हिडीओ:
घरोघरी जाताय? चांगले आहे, मुंबईकर जनता अनेक प्रश्नांचा जाब विचारणारच आहे!@BJP4Maharashtra @ChDadaPatil @Dev_Fadnavis pic.twitter.com/97cJZKNFR8
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) February 17, 2021
हेही वाचा : ‘तू बोलतो किती? तुझी औकात किती? तू आहेस केवढा?’, अमोल मिटकरींचा पडळकरांवर नाव न घेता निशाणा