पप्पांना विजयी करा, अशोक चव्हाणांची कन्या प्रचारात!
नांदेड: दिवंगत माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांची तिसरी पीढी आता राजकारणात आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची कन्या सुजया चव्हाणही पहिल्यांदाच निवडणूक प्रचारात उतरली आहे. पप्पा निवडून यावेत यासाठी सुजया लोकसभा मतदारसंघात जाऊन प्रचार करत आहे. काँग्रेसच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन, सुजया प्रचार करत आहे. विशेष म्हणजे अशोक चव्हाण यांच्या दोन्ही मुली आणि […]

नांदेड: दिवंगत माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांची तिसरी पीढी आता राजकारणात आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची कन्या सुजया चव्हाणही पहिल्यांदाच निवडणूक प्रचारात उतरली आहे.
पप्पा निवडून यावेत यासाठी सुजया लोकसभा मतदारसंघात जाऊन प्रचार करत आहे. काँग्रेसच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन, सुजया प्रचार करत आहे. विशेष म्हणजे अशोक चव्हाण यांच्या दोन्ही मुली आणि पत्नी आमदार अमिता चव्हाणही निवडणूक प्रचारात आहेत.
वाचा – अशोक चव्हाण यांची संपत्ती किती?
आपल्याला समाजकार्यात रस असल्याने आपण प्रचार करत असल्याचे सुजयाने सांगितलं. यावेळेला नांदेड लोकसभा निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध भाजप अशी काँटे की टक्कर पहायला मिळत आहे. त्यामुळे पहिल्यांदाच चव्हाण यांच्या कन्या प्रचारात उतरलेल्या दिसत आहेत.
नांदेडमधील लढत
नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेस खासदार अशोक चव्हाण विरुद्ध शिवसेनेतून भाजपमध्ये गेलेले आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यात लढत होत आहे. नांदेड जिल्ह्यातील लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी राजीनामा दिला. त्यांना भाजपने तिकीट दिलं असून, ते अशोक चव्हाणांविरोधात मैदानात उतरले आहेत.
संबंधित बातम्या
अशोक चव्हाण यांची संपत्ती किती?
विधानसभेत शिवसेना आमदारांची संख्या घटली!
युती आणि आघाडी, कोणत्या मतदारसंघात कोणता उमेदवार लढणार?
5 मिनिटांत फैसला! पंकजा मुंडे विरुद्ध अशोक चव्हाण
पक्षात माझं कोणी ऐकत नाही, अशोक चव्हाण यांची वादग्रस्त ऑडिओ क्लिप व्हायरल