गुवाहटीला आमदारांची फौज पळवली, बदल्यात भीमाशंकर ज्योतिर्लिंग दिलंत? राष्ट्रवादी काँग्रेसचा संतप्त सवाल

आधी राज्याच्या वाट्याचे उद्योग पळवले, रोजगार पळवले आणि आता चक्क सांस्कृतिक व आध्यात्मिक वारसा पळवण्याचा घाट घातलाय, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.

गुवाहटीला आमदारांची फौज पळवली, बदल्यात भीमाशंकर ज्योतिर्लिंग दिलंत? राष्ट्रवादी काँग्रेसचा संतप्त सवाल
cm eknath shindeImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 15, 2023 | 9:01 AM

पुणेः महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर राज्यात भीमाशंकर (Bhimashankar) ज्योतिर्लिंगाचा (Jyotirling) वाद पेटलाय. भाजपच्या (BJP) नेत्यांनी महाराष्ट्राच्या वाट्याला काहीही ठेवायचं नाही, असंच ठरवलंय का? आधी राज्याच्या वाट्याचे उद्योग पळवले, रोजगार पळवले आणि आता चक्क सांस्कृतिक व आध्यात्मिक वारसा पळवण्याचा घाट घातलाय, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. ईडी सरकारने गुवाहटीला आमदारांची फौज पळवून नेली. तिथे अदृश्य शक्तीच्या स्वरुपात आसाम सरकारने मदत केली. आणि त्याच्या बदल्यात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी भीमाशंकर ज्योतिर्लिंग आसाममध्ये देऊन तर आला नाहीत ना, असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारला आहे. आसाम सरकारच्या एका जाहिरातीत पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग आसाममध्ये असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यावरून सुप्रिया सुळे यांनी सरकारला धारेवर धरलंय.

काय आहे नेमकं प्रकरण?

आसाम सरकारने आगामी महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ६ वं ज्योतिर्लिंग कामरुप डाकिनी पर्वत आसाममध्ये आपलं स्वागत आहे, अशा आशयाची ही जाहिरात आहे.याच यादीत विविध ज्योतिर्लिंगांची याद देण्यात आली आहे. त्यात भीमाशंक

ज्योतिर्लिंगाच्या नावापुढे डाकिनीमधील भीमाशंकर असा उल्लेख आहे. मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांचे फोटोही जाहिरातीत आहेत.

सुप्रिया सुळे यांचं ट्विट काय?

भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातच असल्याचे अनेक पुरावे आहेत. हे सांगताना सुप्रिया सुळे यांनी लिहिलंय ,  श्रीमद् आद्य शंकराचार्य आपल्या बृहद रत्नाकर स्तोत्रामध्ये स्पष्टपणे म्हणतात की, भीमा नदीचा उगम आणि डाकिनीचे जंगल हेच भीमाशंकर ज्योतिर्लिंग. त्यामुळे महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर हेच १२ ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक आहे.अन्य कोणतेही नाही.

भीमाशंकरही देऊन आला की काय?

सुप्रिया सुळे यांनी सरकारला खोचक सवाल विचारलाय, ‘ घटनाबाह्य ED सरकार-आपण गुवाहाटीला आमदारांची फौज पळवून नेली होती.तिथं तुमची सर्व सोय अदृश्य शक्तीच्या वतीने आसामच्या मुख्यमंत्र्यांनी केली होती.त्याचवेळी तुम्ही बदल्यात हे भीमाशंकर ज्योतिर्लिंग तर देऊन आला नाहीत ना?अर्थात अशी शक्यता नाकारता येत नाही.. अशा शब्दात त्यांनी बोचरी टीका केली आहे.

मुख्यमंत्र्यांना काय विनंती?

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना नम्र विनंती आहे की, कृपया महाराष्ट्राचा सांस्कृतिक व अध्यात्मिक वारसा जपण्यासाठी याची तातडीने दखल घ्यावी.या विषयाबाबत आसामच्या मुख्यमंत्र्यांना वस्तुस्थिती कळवून आपली हरकत नोंदवावी.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.