Assembly Election 2022 : 5 राज्यांसाठी क्रांतीकारी घोषणा- ना रोडशो, ना रॅली, ना पदयात्रा! आणखी कोणते नियम?

रोड शो, रॅली, पदयात्रा, कुठल्याही प्रकारच्या रॅलीला परवानगी नसेल. इतकंच काय तर रात्री 8 ते सकाळी 8 पर्यंत रॅली, सभांना परवानगी असणार नाही, असंही मुख्य निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे.

Assembly Election 2022 : 5 राज्यांसाठी क्रांतीकारी घोषणा- ना रोडशो, ना रॅली, ना पदयात्रा! आणखी कोणते नियम?
प्रचारसभांवर बंदी
Follow us
| Updated on: Jan 08, 2022 | 4:38 PM

नवी दिल्ली : पाच राज्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम घोषित करताना मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी प्रचाराबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे. इच्छुक उमेदवारांना वाढत्या कोरोनाचा फटका बसण्याची दाट शक्यता त्यांच्या घोषणेनं बसण्याची शक्यता आहे. ऑफलाईन अनेक महत्त्वाच्या गोष्टीवर निवडणूक आयोगानं बंधनं घातली आहे. 15 जानेवारीपर्यंत महत्त्वाच्या बाबींवर बंदी घातली असून ही बंदी कायम राहणार की नाही, याबाबतची माहितीही 15 जानेवारीनंतर जारी केली जाणार आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, गोव्यासह मणिपूर आणि उत्तरांखंडमध्ये होणाऱ्या प्रचारावर आता निवडणूक आयोगाची बारीक नजर असणार आहे.

काय म्हणाले मुख्य निवडणूक आयुक्त?

इच्छुक उमेदवारांना जो काही प्रचार करायचा आहे, तो त्यांनी शक्यतो जास्तीत जास्त ऑनलाईन पद्धतीनं करावा, असं आवाहन करण्यात आलं आहे. इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार करण्यावर भर द्यावा, असं मुख्य निवडणूक आयुक्तांनी म्हटलं. महत्त्वाचं म्हणजे यासोबत त्यांनी ऑफलाईन प्रचारावर मोठ्या प्रमाणात बंदी घातली आहे.

‘डिजिटल प्रचार करा!’

प्रचारसभा, रॅली, बाईक रॅली, व्हेईकल रॅली, अशा कोणत्याही प्रकारच्या ऑफलाईन प्रचारावर बंदी घालण्यात आली आहे. येत्या 15 जानेवारीपर्यंत ही बंदी लागू असणार आहे. दरम्यान, या बंदीबाबतचा पुढील निर्णय 15 जानेवारीची कोरोना परिस्थिती पाहून घेतला जाणार आहे.

‘नियम न पाळल्यास कारवाई’

रोड शो, रॅली, पदयात्रा, कुठल्याही प्रकारच्या रॅलीला परवानगी नसेल. इतकंच काय तर रात्री 8 ते सकाळी 8 पर्यंत रॅली, सभांना परवानगी असणार नाही, असंही मुख्य निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे कॉर्नर सभा, गावागावात होणारा प्रचार याबाबतही जर नियम पाळले गेले नाही, तर कडक कारवाई केली जाईल, असाही इशारा देण्यात आला आहे.

या संपूर्ण बंदीवर 15 जानेवारीनंतर काय नेमका निर्णय होतो, हेही पाहणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे यंदाची पाचही राज्यातली निवडणूक ही सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठीही अत्यंत अटीतटीची आणि डिजिटल निवडणूक होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे व्हर्च्युअल रॅली नेमकी कशी असेल, हेही पाहणं आता महत्त्वाचं आहे.

इतर बातम्या –

5 State Elections Date 2022 LIVE : उत्तर प्रदेश, गोव्यासह 5 राज्यांच्या निवडणुकांची घोषणा, मुख्य निवडणूक आयुक्त लाईव्ह

Assembly Election 2022 Full Schedule : 5 राज्य, 7 टप्पे, कधी मतदान? कधी निकाल? पाहा संपूर्ण वेळापत्रक

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.