निवडणूक 4 राज्यांची पण जबाबदारी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांवर; ‘हे’ चार नेते आखणार सत्तास्थापनेचा मार्ग?

Maharashtra Congress Leaders on Assembly Election Result 2023 : काँग्रेसला बहुमत मिळाल्यास 'हे' काँग्रेस नेते सत्तास्थापन करण्यात आघाडीवर असणार? महाराष्ट्रातील काँग्रेस नेतृत्वावर मोठी जबाबदारी असणार आहे. राज्यातील कोणत्या नेत्यांच्या खांद्यावर आहे धुरा...? पाहा...

निवडणूक 4 राज्यांची पण जबाबदारी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांवर; 'हे' चार नेते आखणार सत्तास्थापनेचा मार्ग?
Follow us
| Updated on: Dec 03, 2023 | 11:53 AM

मुंबई | 03 डिसेंबर 2023 : आज चार राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागतोय. मतमोजणी केंद्रांवर सकाळपासूनच मतमोजणी सुरु आहे. सुरुवातींच्या कलांनुसार काही राज्यांमध्ये काँग्रेस आघाडीवर दिसत आहे. अशात जर काँग्रेसला बहुमत मिळालं. महाराष्ट्रातील चार नेत्यांकडे सत्ता स्थापनेची धुरा असणार आहे. काँग्रेसच्या पाच राज्यांची निरीक्षक समिती जाहीर झाली आहे.  राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, काँग्रेस नेते चंद्रकांत हंडोरे, मुकुल वासनिक यांच्यावर सत्तास्थापन करण्याची जबाबदारी असेल.

पाच राज्यांची निरीक्षक समिती जाहीर

देशातील पार राज्यात सध्या निवणूक प्रक्रिया पार पडत आहे. अशात तेलंगणा, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड या राज्यांमध्ये आज मतमोजणी होत आहे. अशात जर या राज्यात काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला तर सत्ता स्थापनेसाठी महाराष्ट्रातील चार नेत्यांवर जबाबदारी असेल.

तेलंगणाची जबाबदारी कुणावर?

तेलंगणामध्ये केसीआर सरकारच्या विरोधात जनतेच्या मना रोष असल्याचं सध्याच्या कलांवरून दिसत आहे. अँन्टी इन्कंबन्सीचा फटका केसीआर यांना बसताना दिसतो आहे. कारण सुरुवातीच्या दोन कलांमध्ये काँग्रेस आघाडीवर दिसत आहे. अशात इथं जर काँग्रेसला यश मिळालं. तर सरकार स्थापन करण्यासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर आहे.

मध्यप्रदेशची जबाबदारी ‘या’ दोन नेत्यांवर

मध्यप्रदेशमध्ये जर काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला तर सरकार स्थापन करण्याची जबाबदारी महाराष्ट्रातील दोन दिग्गज नेत्यांवर असेल. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि चंद्रकांत हंडोरे यांच्यावर सत्तास्थापनेची जबाबदारी असेल.

राजस्थानमध्ये या नेत्यावर जबाबदारी

राजस्थानमध्ये सध्या अटीतटीची लढाई पाहायला मिळत आहे. अशोक गहलोत यांचं सरकार पुन्हा सत्तेत येणार की नाही? याबाबत सध्या संभ्रम आहे. निकालानंतर हे स्पष्ट होईल. मात्र जर गहलोत सरकार पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता निर्माण झाली तर महाराष्ट्रातील नेत्यावर सत्तास्थापनेची जबाबदारी असेल. मुकुल वासनिक यांच्यावर राजस्थानच्या सत्तास्थापनेची जबाबदारी असेल. त्यामुळे आता कोणत्या राज्यात कोण जिंकतं हे पाहणं महत्वाचं आहे.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.