Aurangabad : समन्वय बैठकीत वातावरण चिघळले, सत्कारावरुन संजय शिरसाट नाराज झाले

गणेश उत्सवाच्या अनुशंगाने पोलिस प्रशासनाकडून शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने सर्वपक्षीय नेते हे व्यासपीठावर उपस्थित होते. लक्ष वेधले ते शिवसेनेचे चंद्रकांत खैरे आणि शिंदे गटाचे संजय शिरसाट यांच्या उपस्थितीने. कार्यक्रमाला सुरवात होताच, आयोजकांकडून उपस्थित मान्यवरांच्या सत्कार समारंभाला सुरवात झाली. पोलिस प्रशासनातील एका अधिकाऱ्याने थेट चंद्रकांत खैरे यांचाच पहिल्यांदा सत्कार केला. पण हे प्रोटोकॉलनुसार नाही असे म्हणत शिरसाट हे चांगलेच नाराज झाले.

Aurangabad : समन्वय बैठकीत वातावरण चिघळले, सत्कारावरुन संजय शिरसाट नाराज झाले
सार्वजनिक उत्सव समितीच्या बैठकीत प्रोटोकॉलनुसार सत्कार न झाल्याने आ. संजय शिरसाट हे चांगलेच चिडले होते.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 28, 2022 | 11:18 PM

औरंगाबाद : (Political differences) राजकीय मतभेद हे किती टोकाचे असून शकतात याचा प्रत्यय (Aurangabad) औरंगाबादेतील एका कार्यक्रमातून समोर आले आहे. गणरायाचे आगमन अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपले आहे. त्यामुळे जागोजागी पोलिस प्रशासनाकडून समन्वय बैठकीचे आयोजन केले जाते. मात्र, शांतता राहण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीतच वातावरण कसे चिघळले याचे दर्शन घडले आहे. बैठकीच्या सुरवातीला आयोजकांकडून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. मात्र, पहिला मान शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांनाच का यावरुन शिंदे गटाचे  (Sanjay Sirsath) आमदार संजय शिरसाट हे थेट व्यासपीठ सोडून मार्गस्थ होऊ लागले होते. परंतू, त्यांची समजूत खा. जलील यांनी काढली आणि शिरसाट हे शांत झाले. मात्र, कधीकाळी एका पक्षात असलेल्या खैरे आणि शिरसाट यांच्यात मध्यस्ती म्हणून जलील सहभाग नोंदवत असतील तर राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही..! अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

नेमके व्यासपीठावर झाले काय?

गणेश उत्सवाच्या अनुशंगाने पोलिस प्रशासनाकडून समन्वय समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने सर्वपक्षीय नेते हे व्यासपीठावर उपस्थित होते. लक्ष वेधले ते शिवसेनेचे चंद्रकांत खैरे आणि शिंदे गटाचे संजय शिरसाट यांच्या उपस्थितीने. कार्यक्रमाला सुरवात होताच, आयोजकांकडून उपस्थित मान्यवरांच्या सत्कार समारंभाला सुरवात झाली. पोलिस प्रशासनातील एका अधिकाऱ्याने थेट चंद्रकांत खैरे यांचाच पहिल्यांदा सत्कार केला. पण हे प्रोटोकॉलनुसार नाही असे म्हणत शिरसाट हे चांगलेच नाराज झाले. एवढेच नाहीतर ते व्यासपीठ सोडून निघाले होते. तेवढ्यात त्यांच्यादवळ बसलेले जलील यांनी त्यांना रोखले व स्थानपन्न होण्यास सांगितले.

भर कार्यक्रमात मतभेद चव्हाट्यावर

शिंदे गट आणि शिवसेनेतील आरोप-प्रत्यारोप हे काही आता नवे राहिलेले नाही. पण दोन्ही गटाचे नेते एकाच व्यासपीठावर आल्यावरही काय होऊ शकते याचा प्रत्यय आला आहे. आतापर्यंत शिवसेनेचे नेत चंद्रकांत खैरे यांनी बंडखोर आमदारांवर टोकाची टीका केली आहे. तर दुसरीकडे शिंदे गटही कायम आक्रमक राहिलेला आहे. असे असताना दोन राजकीय विरोधक नेते एकत्र आले तरी त्यांच्यामध्ये राजकरण विरहीत संवाद महाराष्ट्राने अनेकवेळा पाहिलेला आहे. पण शिवसेना आणि शिंदे गटातील मतभेद किती ताणले गेले आहेत हेच यामधून समोर आले आहे. केवळ प्रोटोकॉलनुसार सत्कार न केल्याने शिरसाट हे चक्क कार्यक्रम सोडून निघाले होते.

हे सुद्धा वाचा

व्यासपीठावर सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती

औरंगाबाद येथे सार्वजनिक गणेश उत्सव समितीच्या माध्यमातून शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळे एमआयएमचे खा. जलील, केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड, शिवसेनेचे चंद्रकांत खैरे आणि शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट हे उपस्थित होते. सत्कारावरुन शिरसाट चिडले असल्याचे फोटोतून स्पष्ट तर होत आहे. पण त्यांच्या या वागण्याची चर्चा प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्येही रंगली होती. अखेर शिंदे आणि शिवसेना वातावरण शांत रहावे म्हणून एमआयएमला मध्यस्ती करावी लागली हे विशेष.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.