Uday Samant Attack : हल्ला पूर्वनियोजित आणि सुपारी देऊन, उदय सामंतांचा गंभीर आरोप; सहनशिलतेचा अंत पाहू नका, सामंतांचा इशारा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्याच्या मागे सामंत यांची गाडी होती. सिग्नल लागल्यामुळे त्यांची गाडी सिग्नलवर थांबली असता, अचानकपणे त्यांच्या गाडीवर हल्ला झाला. हा संपूर्ण प्रकार मोबाईल आणि माध्यमांच्या कॅमेरात कैद झालाय. मात्र, हा हल्ला पूर्वनियोजित आणि सुपारी देऊन करण्यात आल्याचा गंभीर आरोप उदय सामंत यांनी केलाय.

Uday Samant Attack : हल्ला पूर्वनियोजित आणि सुपारी देऊन, उदय सामंतांचा गंभीर आरोप; सहनशिलतेचा अंत पाहू नका, सामंतांचा इशारा
उदय सामंत यांच्या गाडीवर पुण्यात हल्लाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 02, 2022 | 10:54 PM

पुणे : एकनाथ शिंदे गटात सहभागी झालेले आमदार उदय सामंत (Uday Samant) यांच्या गाडीवर मंगळवारी हल्ला करण्यात आला. पुण्यातील कात्रज परिसरात हा हल्ला झाला आहे. यात सामंत यांच्या गाडीची मागची काच फुटलीय. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची कात्रजमध्ये सभा होती. त्यावेळी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक सभेसाठी गोळा झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्याच्या मागे सामंत यांची गाडी होती. सिग्नल लागल्यामुळे त्यांची गाडी सिग्नलवर थांबली असता, अचानकपणे त्यांच्या गाडीवर हल्ला झाला. हा संपूर्ण प्रकार मोबाईल आणि माध्यमांच्या कॅमेरात कैद झालाय. मात्र, हा हल्ला पूर्वनियोजित (Pre-planed Attack) आणि सुपारी देऊन करण्यात आल्याचा गंभीर आरोप उदय सामंत यांनी केलाय. हल्ल्या प्रकरणात कोथरुड पोलीस ठाण्यात सामंत यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांत तक्रार दिल्यानंतर सामंत म्हणाले की, पहिली गोष्ट म्हणजे काहीजण सांगत आहेत की त्यांनी माझा ताफा अडवला. ते धादांत खोटं आहे. माझी गाडी सिग्नलला थांबली होती. मी कुठेही घाई न करता मी तिथे थांबलो होतो. माझ्या बाजूला दोन गाड्या येऊन थांबल्या. त्या गाड्यातून दोन पांढरे शर्ट घातलेले युवक उतरले. एकाच्या हाता. बेस बॉलची स्टिक होती, एकाच्या हातात दगड बांधलेला होता. मला ते समोर येऊन शिव्या घालत होते आणि दुसऱ्या बाजूला एक 50 – 60 जणांचा मॉब होता. डाव्या बाजूला एसपीओ माझं रक्षण करण्याचा प्रयत्न करतो होते. त्याबाजूला दुसरे दोन पांढरे शर्ट घातलेले युवक होत, त्यांच्या हातात सळईसारखं काही होतं, अशी माहिती सामंत यांनी दिली आहे.

‘गाडीवर चढून मला मारण्याचा प्रयत्न केला’

दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांनी हा प्रकार केला ते दुसऱ्या लोकांना शुटिंग करा म्हणून सांगत होते. त्यांनी शिवीगाळ करुन, गाडीवर चढून मला मारण्याचा प्रयत्न केला. मला आताच कळालं की काही चॅनेलवर बोलताना शिवसेनेचे काही नेते म्हणाले की मला याचा अभिमान आहे. जर अशी हत्यारं घेऊन मुलं एका लोकप्रतिनिधीवर हल्ला करत असतील आणि त्याचा काहींना अभिमान वाटत असेल तर महाराष्ट्रातील राजकारण कुठच्या थराला जातंय, हे आज जनतेला दिसत आहे, अशी खंतही सामंत यांनी बोलून दाखवली.

‘आमच्या सहनशिलतेचा अंत कुणी पाहू नये’

असा भ्याड हल्ला करुन कुणाला वाटत असेल की मी शिंदे साहेबांची साथ सोडेन, आमचे 45 लोक शिंदे साहेबांची साथ सोडतील, तर आज या हल्ल्यानं आम्ही होतो त्यापेक्षा जवळ आलो आहोत. असे भ्याड हल्ले करुन उदय सामंत थांबणारा नाही. कुठल्याही प्रसंगाला समोरा जाणारा आहे. कुणावर टीका करत नाही, त्याचा अर्थ मी हतबल नाही. आमच्या सहनशिलतेचा अंत कुणी पाहू नये, असा इशाराच सामंत यांनी हल्लेखोरांना दिलाय.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.