‘धनंजय मुंडेची हकालपट्टी ते आमदारकी रद्द करा’, भाजप आक्रमक

बलात्कारासारखा आरोप असलेल्या धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरुन काढा, त्यांची हकालपट्टी करा, अशी मागणी भाजपने केली आहे.

'धनंजय मुंडेची हकालपट्टी ते आमदारकी रद्द करा', भाजप आक्रमक
Follow us
| Updated on: Jan 14, 2021 | 3:12 PM

मुंबई: सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कारासारखा गंभीर आरोप झाल्यानंतर त्यांच्या अडचणी वाढण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. शरद पवार यांनी अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडे यांना इशारा दिल्यानंतर भाजप नेते किरिट सोमय्या आणि आमदार अतुल भातखळकर यांनी धनंजय मुंडेंची हकालपट्टी करण्यापासून ते आमदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे.(Kirit Somaiya and Atul Bhatkhalkar’s aggressive role against Dhananjay Munde)

धनंजय मुंडेंची हकालपट्टी करा- सोमय्या

धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर आहेत. बलात्कारासारखा आरोप असलेल्या धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरुन काढा, त्यांची हकालपट्टी करा, अशी मागणी भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे. सोमय्या यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडेही तक्रार केली आहे. मुंडे यांनी निवडणूक अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दुसरी पत्नी आणि मुलींची माहिती लपवली होती, असा आरोप सोमय्या यांनी केलाय. त्याचबरोबर एक महिलेनं तक्रार केल्यानंतरही त्याबाबत गुन्हा दाखल होत नाही, हाच का सामाजिक न्याय? असा सवालही सोमय्या यांनी केलाय.

मुंडेंची आमदारकी रद्द करा- भातखळकर

किरिट सोमय्या यांच्यासह भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनीही निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे. धनंजय मुंडे यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दुसरी पत्नी आणि मुलांची माहिती लपवली आहे. हा एकप्रकारे निवडणूक प्रक्रिया आणि नियमांची पायमल्ली असल्यामुळे त्यांची आमदारकी रद्द करा, अशी मागणी भातखळकर यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. तसं पत्रच त्यांनी निवडणूक आयोगाला लिहिलं आहे.

तातडीने निर्णय घेऊ : शरद पवार

पक्ष म्हणून आम्हाला निर्णय घ्यावे लागतील, कुणावर अन्याय होणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे. तसंच या प्रकरणावर तातडीने निर्णय घेऊ, असंही पवार म्हणाले. “माझ्या मते धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपाचं स्वरुप गंभीर स्वरुपाचं आहे. साहजिकच याबाबत पक्ष म्हणून विचारविनिमय करावा लागेल. मुंडे यांनी त्यांची भूमिका वैयक्तिक माझ्यापुढे मांडली आहे. मात्र, अशा प्रकरणात निर्णय सर्वानुमते घ्यावे लागतात. त्यामुळे पक्षाच्या प्रमुख सहकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय घेऊ,” असं शरद पवार यांनी म्हटलंय.

संबंधित बातम्या :

धनंजय मुंडेंवरील आरोपाचं स्वरुप गंभीर, पक्ष म्हणून विचारा करावा लागेल : शरद पवार रोखठोक

‘मुंडे, मलिकांच्या प्रतापावर सामनामध्ये अग्रलेख पाडा की’, अतुल भातखळकरांचा राऊतांना जोरदार टोला

Kirit Somaiya and Atul Bhatkhalkar’s aggressive role against Dhananjay Munde

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.