पक्षात आता फक्त नातेवाईत उरले, नातेवाईक सेना…; वरुण सरदेसाईंच्या ‘त्या’ वक्तव्याची भातखळकरांकडून खिल्ली

वरुण सरदेसाई यांच्या वक्तव्याचा भाजपा नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी जोरदार समाचार घेतला आहे. भातखळकर यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला.

पक्षात आता फक्त नातेवाईत उरले, नातेवाईक सेना...; वरुण सरदेसाईंच्या 'त्या' वक्तव्याची भातखळकरांकडून खिल्ली
Follow us
| Updated on: Sep 16, 2022 | 10:09 AM

मुंबई :  मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदे गट आणि मनसेची (MNS) युती होणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. तेव्हापासून युतीच्या चर्चेला उधाण आलं आहे. याबाबत शिवसेना (Shiv Sena) नेते वरुण सरदेसाई यांना विचारले असता, तीन पक्ष काय तीस जरी एकत्र आले तरी मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवाच फडकणार अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. वरुण सरदेसाई यांच्या या वक्तव्याचा भाजपा नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी जोरदार समाचार घेतला आहे. भातखळकर यांनी वरुण सरदेसाई यांच्या बातमीचा एक फोटो ट्विट करत ‘पक्षात आता फक्त नातेवाईक उरले. नातेवाईक सेना… असं म्हटलं आहे.

काय म्हटलं होत सरदेसाई यांनी?

सरदेसाई यांना मनसे, शिंदे गट युतीबाबत विचारण्यात आले होते. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं होतं की, तीनच काय तीस जरी एकत्र आले तरी मुंबई महापालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकेल.  निवडणूक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वखाली लढवली जाईल. मुंबईकर उद्धव ठाकरेंच्या पाठिमागे उभे असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.  वरुण सरदेसाई यांच्या या टीकेला आता भातखळकरांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘पक्षात आता फक्त नातेवाईक उरले. नातेवाईक सेना… असं ट्विट भातखळकर यांनी केलं आहे.

हे सुद्धा वाचा

शिंदे गट मनसे युती होणार?

गेल्या काही दिवसांपासून शिंदे गट आणि मनसे नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदे गट आणि मनसेत युती होऊ शकते असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांचे पुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यात आली होती. यावेळी बोलताना युतीबाबतचा निर्णय राज ठाकरे हेच घेतील असं त्यांनी म्हटलं होतं.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.