औरंगाबादला आता लोकसभेचे वेध, चंद्रकांत खैरेंच्या नावाची चर्चा, कन्नडच्या माजी आमदाराचा Video का होतोय व्हायरल?

आपल्या पराभवाला हर्षवर्धन जाधव जबाबदार असल्याचा आरोप खैरे यांनी अनेक वेळा केला आहे. मात्र आता हर्षवर्धन जाधव यांनी खैरे यांना पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केलंय.

औरंगाबादला आता लोकसभेचे वेध, चंद्रकांत खैरेंच्या नावाची चर्चा, कन्नडच्या माजी आमदाराचा Video का होतोय व्हायरल?
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Feb 04, 2023 | 2:07 PM

दत्ता कनवटे, औरंगाबादः राज्यात विधान परिषद निवडणुकीचा (MLC Election) धुरळा खाली बसतो तोच पुण्यातील पोट निवडणुकीच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे. इकडे औरंगाबादच्या (Aurangabad) राजकीय वर्तुळाला मात्र आताच 2024 च्या लोकसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे 2019 मध्ये बंडखोरी केलेले कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. 2024 मध्ये चंद्रकांत खैरेच निवडून येणार कारण त्यांना मी पाठिंबा देणार आहे, असं जाधव यांनी व्हिडिओत ठामपणे सांगितलंय.

काय आहे नेमकं व्हिडिओत?

2019 निवडणुकीत बंडखोरी करणारे कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी 2024 ला चंद्रकांत खैरे यांना पाठींबा देणार असे आश्वासन दिले आहे.माजी आमदार जाधव यांनी 2019 च्या विधानसभेला निवडणूकीदरम्यान चुकलो, पण आता नाही चूकणार. कारण मी माझे घरघुती वैयक्तिक मतभेद जेही असतील ते बाजूला ठेऊन तालुक्याच्या जनतेसाठी, शेतकऱ्यांसाठी, सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी तटस्थ राहील.

‘मी विधानसभा लढवणार.. ‘

स्व. रायभानजी जाधव यांचे अधुरं स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय मी आज घेतो आणि विधानसभेच्या तयारीला लागतो असं वक्तव्य हर्षवर्धन जाधव यांनी केलंय. त्यामुळे पुढील वेळी ते विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

2019 मध्ये कोण खासदार?

औरंगाबादमध्ये ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी 1999 पासून चार वेळा खासदारकीची निवडणूक जिंकली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मात्र एमआयएमचे इम्तियाज जलील यांच्यासमोर खैरेंचा पराभव झाला. याच निवडणुकीत कन्नडचे हर्षवर्धन जाधव यांनी बंडखोरी केली होती. मराठा आरक्षणावरून राजीनामा देणाऱ्या हर्षवर्धन जाधव यांना भरभरून मतदान झालं. त्यामुळे खैरे यांची मतं फुटली आणि इम्तियाज जलील यांना फायदा झाला. आपल्या पराभवाला हर्षवर्धन जाधव जबाबदार असल्याचा आरोप खैरे यांनी अनेक वेळा केला आहे. मात्र आता हर्षवर्धन जाधव यांनी खैरे यांना पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केलंय.

शिंदे गटाकडून संदिपान भूमरे?

तर इकडे शिंदे-भाजप युतीमध्येसुद्धा लोकसभा खासदारकीवरून चर्चा सुरु झाल्याचं दिसून येतंय. औरंगाबादची जागा शिंदे गट लढवणार असल्याचं वक्तव्य पैठणचे आमदार संदिपान भूमरे यांनी केलंय. तर पक्षाने आदेश दिला तर लोकसभेची निवडणूक मीच लढवणार, अशी शक्यताही त्यांनी बोलून दाखवली आहे. पंढरपूरमध्ये संदिपान भूमरे यांनी यासंदर्भातील वक्तव्य केलंय

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.