VIDEO : या जिल्ह्यात ग्रामपंचायतीचा लिलाव, पैश्यांची बोली लावून, सरपंच, उपसरपंच, सदस्यांची पदे विकली, लाखात लिलाव झाल्याचा व्हिडीओ व्हायरल
या जिल्ह्यात ग्रामसभेत ग्रामपंचायतीचा लिलाव, सरपंच, उपसरपंच, सदस्य पदासाठी लाखांची बोली, पाहा व्हिडीओ
शेलुद : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत (Grampanchayat Election) जोरदार चुरस पाहायला मिळते, अधिकाधिक भांडणं होतात. त्याचबरोबर निवडून येण्यासाठी दोन्ही पॅनेलकडून जोरदार प्रयत्न केले जातात. औरंगाबादमध्ये (Aurangabad) एक अशी घटना घडली आहे. त्यामुळे संपुर्ण जिल्ह्यात त्याची चर्चा आहे. ग्रामपंचायतील लिलाव झाल्याची गोष्ट उघडकीस आली आहे. पैश्यांची बोली लावून, सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांची पदे विकल्याचा प्रकार व्हिडीओच्या माध्यमातून उघडकीस आला आहे. व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाल्यामुळे आता काय कारवाई होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील शेलुद गावात ग्रामपंचायतीचा लिलाव झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड आला आहे. पैश्यांची बोली लावून, सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांची पदे विकली आहेत. सरपंचपद 14 लाख 50 हजार, तर उपसरपंच पद 4 लाखात विकले, त्याचबरोबर सदस्य पदासाठी 70 हजारांपासून 2 लाखापर्यंत बोली लागली होती.
गावाच्या मंदिरासमोर ग्रामसभा बोलवून ग्रामपंचायत पदांचा लिलाव केला होता. सरकार दरबारी मात्र ग्रामपंचायत बिनविरोध निवडल्याचा केला बनाव रचण्यात आल्याचे उजेडात आले आहे. सरपंचपदी निवडून आलेल्या सरपंच पतीने मात्र लिलावाचा झाला नसल्याचं सांगितलं आहे. विशेष म्हणजे गावातील नागरिकांकडून लिलावाची जाहीर कबुली देण्यात आली आहे.
शकुंतला योगेश ससेमहल असं साडे चौदा लाख रुपये देऊन सरपंच पदी निवडून आलेल्या महिलेचे नाव आहे. राजू म्हस्के असं 4 लाख रुपये भरून उपसरपंच झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मात्र लिलाव न पटल्यामुळे राजीनामा देऊन राजू म्हस्के या उपसरपंचांनी हा प्रकार उजेडात आणला आहे.