इजा बिजा तिजा! औरंगाबाद महापालिका निवडणूक पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता
जनगणना घोषित झाली तर पुनर्रचनेसाठी औरंगाबाद महापालिका निवडणुकीला पुन्हा स्थगिती मिळू शकते.
औरंगाबाद : औरंगाबाद महापालिका निवडणूक (Aurangabad Municipal Election) पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. कोरोना, सुप्रीम कोर्टाची स्थगिती यानंतर आता जनगणना घोषित झाली, तर पुनर्रचनेसाठी महापालिका निवडणुकीला स्थगिती मिळण्याची शक्यता आहे. (Aurangabad Municipal Corporation Election may postpone again)
औरंगाबाद महापालिकेचा कार्यकाळ संपून सहा महिने उलटले आहेत. मात्र जनगणना घोषित झाली तर औरंगाबाद महापालिका निवडणूक पुन्हा स्थगित होण्याची भीती आहे. आधी मार्च महिन्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील सर्वच निवडणुका स्थगित झाल्यामुळे औरंगाबाद महापालिका इलेक्शनलाही ब्रेक लागला होता. नंतर औरंगाबादमधील प्रभाग रचनेवरील आक्षेप याचिकेमुळे सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली होती.
आता जनगणना घोषित झाली तर पुनर्रचनेसाठी महापालिका निवडणुकीला पुन्हा स्थगिती मिळू शकते. औरंगाबाद महापालिका निवडणूक वाद आणि स्थगिती यांचं समीकरण होताना दिसत आहे.
प्रभाग रचना काय आहे?
महाविकास आघाडी सरकारने प्रभाग पद्धतीने नव्हे, तर वॉर्डरचनेनुसारच निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे निवडणूक आयोगाने बहुसदस्यीय प्रभाग रचनेच्या आरक्षण सोडतीला स्थगिती दिली
गेल्या वेळी औरंगाबाद महापालिकेची निवडणूक झाली, तेव्हा 113 वॉर्ड होते. त्यावेळी वॉर्डांची लोकसंख्या सरासरी 10 हजार एवढी होती. त्यानंतर सातारा-देवळाई परिसर महापालिकेत समाविष्ट झाला. या भागाची लोकसंख्या 50 हजारांहून अधिक होती. मात्र, महापालिकेने 115 वॉर्डांचे बंधन असल्याने फक्त दोनच वॉर्ड तयार केले. संपूर्ण रचना नव्याने होणार असताना आक्षेप याचिकेमुळे सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली होती.
औरंगाबाद महापालिकेची निवडणूक यंदा बहुरंगी होणार आहे. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असली, तरी औरंगाबादेतील सत्ताधारी शिवसेना स्वबळावर रिंगणात उतरु शकते. त्यांच्यासमोर भाजप, एमआयएम या पक्षांचं आव्हान असेलच. मात्र मनसेही पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहे.
औरंगाबाद महापालिका पक्षीय बलाबल
शिवसेना – 29 भाजप – 22 एमआयएम – 25 कॉंग्रेस – 10 राष्ट्रवादी – 03 बसप – 05 रिपब्लिकन पक्ष – 01 अपक्ष – 18
(संदर्भ : विकीपीडिया)
भाजप-शिवसेना युतीची सत्ता गेली 30 वर्ष औरंगाबाद महापालिकेवर आहे. मात्र राज्यातील युती तुटल्यापासून औरंगाबाद महापालिकेतही याचे पडसाद जाणवू लागले. भाजपच्या विजय औताडे यांनी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात उपमहापौरपदाचा राजीनामा दिला. मात्र महाविकास आघाडीमुळे औरंगाबाद महापालिकेत उपमहापौरपद खेचून आणण्यात शिवसेनेला यश आलं. औरंगाबादच्या उपमहापौरपदी शिवसेनेच्या राजेंद्र जंजाळ यांची निवड झाली आहे.
एलईडी लाईटसमुळे औरंगाबाद महागरपालिकेला मोठा फायदा; 3 कोटी 36 लाख रुपयांची बचत https://t.co/NZkhH5Nc1a #AurgabadMahanagarpalika #LED #Electrictiy #Maharahtra
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 18, 2020
संबंधित बातम्या :
औरंगाबाद महापालिकेत युतीचा काडीमोड, भाजपच्या उपमहापौराचा राजीनामा
38 वर्षांनी शिवसेनेची साथ सोडणार, चंद्रकांत खैरेंचा विश्वासू सहकारी मनसेत
(Aurangabad Municipal Corporation Election may postpone again)