“मुख्यमंत्री दिल्लीच्या पातशाहच्या आदेशावरून निर्णय घेतात”, अंबादास दानवेंची शिंदेंवर टीका
आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आहे. यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबादमध्ये आहेत. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदे यांच्यावर टीका केली.
औरंगाबाद : आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आहे. यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) औरंगाबादमध्ये आहेत. सकाळी 7 वाजता ध्वजारोहण समारोह पार पडला. यावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी शिंदे यांच्यावर टीका केली. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी मुख्यमंत्र्यांकडे वेळ नाही, एकनाथ शिंदे दिल्लीच्या पातशाहच्या आदेशावरून निर्णय घेतात. ते दिल्लीच्या पातशाह यांच्या आदेशावरून हैदराबादला जात आहेत, असं त्यांनी म्हटलं. शिवाय दरवर्षी सकाळी 9 वाजता मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा कार्यक्रम होतो. पण यंदा मुख्यमंत्री सकाळी सात वाजता आले आणि कार्यक्रम झाला. पण दरवर्षीप्रमाणे आम्ही सकाळी 9 वाजता शासकीय ध्वजारोहण करणार आहोत. हा कार्यक्रम शिवसेनेच्या वतीने घेण्यात येईल, असंही ते म्हणाले.
Non Stop LIVE Update