औरंगाबादचं प्रत्येक घर बदलवणारी ‘पाणी पुरवठा योजना’ कशी आहे?
औरंगाबादेतील पाण्याची समस्या सोडवणारी ही योजना नेमकी कशी असेल
औरंगाबाद : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे (CM Uddhav Thackeray) आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत (Aurangabad Water Supply Scheme). यादरम्यान त्यांनी औरंगाबादचं प्रत्येक घर बदलणारवाऱ्या ‘पाणी पुरवठा योजने;चं उद्घाटन केलं. गरवारे स्टेडियम वरील भव्य शामियान्यात हा उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. या योजनेअंतर्गत औरंगाबादकरांना 24 तास पाणी उपलब्ध होणार आहे. या योजनेने औरंगाबादेतील प्रत्येक घरात पुरेसं पाणी पोहोचेल असं आश्वासन देण्यात आलं आहे (Aurangabad Water Supply Scheme).
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आज संभाजीनगर (औरंगाबाद) येथे १६८० कोटींची शहर पाणी पुरवठा योजना, स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान, सफारी पार्क, शहरातील १५२ कोटींच्या रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. pic.twitter.com/JQiTpUeHoa
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 12, 2020
औरंगाबादेतील पाण्याची समस्या सोडवणारी ही योजना नेमकी कशी असेल ते जाणून घेऊ –
औरंगाबादेत सध्या पाणी पुरवठ्याची स्थिती काय?
* औरंगाबाद शहराला जुन्या योजनेतून पाणीपुरवठा केला जातो.
* अवाढव्य वाढलेल्या या शहराला जुन्या योजनेचा पाणीपुरवठा अपुरा पडत आहे.
* सध्या औरंगाबाद शहराला सहा ते आठ दिवसातून एकदा पाणीपुरवठा होत आहे.
नवी पाणी पुरवठा योजना कशी असेल?
* मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज 1680 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचं उद्घाटन केलं.
* जायकवाडी धरणातून औरंगाबाद शहराला या योजनेअंतर्गत पाणीपुरवठा केला जाणार आहे.
* नवी योजना कार्यन्वित झाल्यानंतर औरंगाबादकरांना 24 तास पाणीपुरवठा केला जाणार आहे.
* या योजनेसाठी महाराष्ट्र सरकारने 1680 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यातला 30 टक्के वाट अर्थात 630 कोटी रुपये औरंगाबाद महापालिकेला भरावा लागणार आहे. तर 1 हजार 80 कोटी रुपये राज्य सरकार भरणार आहे.
* महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या राज्य सरकारच्या विभागाकडून या योजनेचं काम पूर्ण केले जाणार आहे.
Aurangabad Water Supply Scheme
पाणी पुरवठा योजनेवर भाजपचा आक्षेप
या योजनेवर भारतीय जनता पार्टीने आक्षेप घेतला आहे. 1680 कोटीतले 630 कोटी रुपये औरंगाबाद महापालिका भरु शकणार नाही. त्यामुळे ही योजना पूर्णत्त्वाला जाऊ शकणार नाही, अशी भीती भाजपने व्यक्त केली आहे. महापालिकेच्या वाट्याचे 630 कोटी राज्य सरकारने भरावेत अशी मागणी भाजपने केली आहे.
शिवसेनेची महापालिका निवडणुकांची तयारी?
औरंगाबाद महापालिका निवडणुकांच्या तोंडावर उद्धव ठाकरे जम्बो कामाचं उद्घाटन करत आहेत. त्यामुळे शिवसेना महापालिका निवडणुकांची रंगीत तालीम सुरु करत अल्यासाची चर्चा सध्या रंगू लागली आहे.
औरंगाबादचा विकास वेगाने होणार; मला विकास कामे करण्याची घाई: उद्धव ठाकरेhttps://t.co/fLIvtvCG91#UddhavThackeray #MahaVikasAghadi #aurangabad #ShivSena
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 12, 2020
Aurangabad Water Supply Scheme
संबंधित बातम्या :
Aurangabad | औरंगाबादमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पाणीपुरवठा योजनेचं भूमिपूजन
1680 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेसह चार योजनांचे उद्घाटन; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबादेत