अविनाश, आम्ही ठाण्याला येतोय, कोण अडवतंय बघूया, मनसेचा आक्रमक पवित्रा
अविनाश जाधव यांना ठाणे प्रशासनाने तडीपारीची नोटीस दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. (Avinash Jadhav tadipar notice)
ठाणे : “अविनाश आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, ठाण्याला येतोय कोण अडवतंय बघूया”, असं आव्हान मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिलंय. मनसेचे ठाणे-पालघरचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना ठाणे प्रशासनाने तडीपारीची नोटीस देऊन गुन्हा दाखल केला आहे. त्या पार्श्वभूमीवर मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. (Avinash Jadhav tadipar notice)
याबाबत सरचिटणीस संदीप देशपांडे म्हणाले, “अविनाश जाधव यांना काल तडीपारीची नोटीस तर दिलीच, पण त्यांच्यावर 353 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ज्या नर्सेसची कोव्हिडच्या कामासाठी नेमणूक सहा महिन्यांसाठी केली होती, त्यांना अचानक कामावरुन काढून टाकल्याने, अविनाश जाधव यांनी आंदोलन केलं, हा त्यांचा गुन्हा आहे का? सरकारची हुकूमशाही वाढत आहे”.
सरकार आणि पालकमंत्र्यांना असे गुन्हे दाखल करुन आम्हाला गप्प बसवता येईल असं वाटत असेल तर तो तुमचा भ्रम आहे. जेव्हा सरकार आलं तेव्हा हे शिवशाहीचं सरकार असं म्हणालात, पण हे सरकार शिवशाहीचं नाही तर मोघलाईचं आहे. ही हुकूमशाही आम्हाला थांबवू शकत नाही. जिथे चुकाल तिथे प्रश्न विचारु, जिथे अन्याय दिसेल, तिथे मनसैनिकांची लाथ पडणार” असं देशपांडे म्हणाले.
अविनाश आम्ही तुझ्या पाठीशी आहोत ! ठाण्याला येतोय कोण अडवतयं बघूया ! – मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे@SandeepDadarMNS @mnsadhikrut #ISupportAvinashJadhav pic.twitter.com/AeMfmfiP1O
— टीम संदिप देशपांडे, #मनसे (@TeamSandeepMNS) August 1, 2020
आज आम्ही सर्वजण अविनाश जाधवच्या समर्थनार्थ ठाण्याला जातोय. आम्ही सर्वजण अविनाशच्या पाठिशी आहोत, आम्हाला कोण अडवतंय ते बघायचं आहे, असं आव्हान संदीप देशपांडे यांनी दिलं.
नितीन सरदेसाईंची प्रतिक्रिया
ठाण्यातील मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी केलेल्या आंदोलनामुळे त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हेगारी स्वरूपाचा खटला नाही.कोव्हिडसाठी काम करणाऱ्या लोकांसाठी त्यांनी आंदोलन केले. आकासापोटी ही कारवाई करण्यात आलेली आहे, असं मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी सांगितलं. आज गणेश उत्सवासाठी सोडण्यात येणाऱ्या गाड्यांची बुकिंग मनसेच्यावतीने सुरु करण्यात आली आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना तडीपारीची नोटीस बजावण्यात आली आहे. ठाण्याच्या खंडणीविरोधी विभागाने जाधव यांना ताब्यात घेतले. महापालिकेच्या कोव्हिड रुग्णालयात नर्स म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरुन काढल्या प्रकरणी अविनाश जाधव हे आंदोलन करत होते. वसई पालिका आयुक्त दालनात आंदोलन केल्याप्रकरणी त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
अविनाश जाधव यांना पुढील दोन वर्षांसाठी तडीपार होण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे. पाच जिल्ह्यांतून तडीपार होण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत.
(Avinash Jadhav tadipar notice)
संबंधित बातम्या
MNS Avinash Jadhav | मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना तडीपारीची नोटीस