Babanrao Lonikar Audio Clip : शिवीगाळ प्रकरणात बबनराव लोणीकरांच्या अडचणी वाढल्या, ऊर्जामंत्र्यांचे कारवाईचे आदेश

ऊर्जा विभागाने याची तातडीने दखल घेतली आहे. शासकीय अधिकाऱ्याला धमकी देणे आणि अभद्र भाषा वापरणे आम्ही खपवून घेणार नाही, असा स्पष्ट इशारा राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिला आहे.

Babanrao Lonikar Audio Clip : शिवीगाळ प्रकरणात बबनराव लोणीकरांच्या अडचणी वाढल्या, ऊर्जामंत्र्यांचे कारवाईचे आदेश
नितीन राऊतांचे लोणीकरांवर कारवाई करण्याचे आदेशImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Mar 30, 2022 | 9:17 PM

मुंबई : बंगल्याचा मीटर काढून नेल्याप्रकरणी भाजप आमदार बबनराव लोणीकर (Babanrao lonikar Audio Clip) यांनी कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याची कथित ऑडिओ क्लिप समोर आली. त्यानंतर सगळीकडे खळबळ माजली. यात फक्त शिवीगाळच नव्हती तर इनकम टॅक्सच्या रेडचीही (Income Tax Raid) धमकी होती. बनबनराव लोणीकरांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले. मात्र आता ऊर्जा विभागाने याची तातडीने दखल घेतली आहे. शासकीय अधिकाऱ्याला धमकी देणे आणि अभद्र भाषा वापरणे आम्ही खपवून घेणार नाही, असा स्पष्ट इशारा राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी दिला आहे. माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिलेली धमकी व वापरलेल्या आक्षेपार्ह भाषेबद्दल राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून लोणीकर यांच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. “ज्या अधिकाऱ्याला अशी धमकी मिळाली त्यांना गरज भासल्यास पोलीस संरक्षण देण्यात येईल. या विषयाबद्दल सखोल माहिती घेऊन पोलिसांकडे तक्रार करण्याचे आदेश मी औरंगाबाद येथील महावितरणचे सह व्यवस्थापकीय संचालक यांना दिले आहेत,” असेही राऊत म्हणाले.

राऊत यांचा लोणीकरांना टोला

“माननीय आमदार व माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या ध्वनीफितीबद्दलच्या बातम्यांची मी दखल घेतली आहे. औरंगाबाद शहरातील सातारा परिसरात अभियंत्यांसोबत केलेला संवाद हा धक्कादायक आहे. या ध्वनिफितीतील संवाद व भाषा अतिशय आक्षेपार्ह आहे. राज्य सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री पद भुषविलेल्या एका ज्येष्ठ राजकीय नेत्याला ही भाषा नक्कीच शोभणारी नाही. स्वतःला संस्कारी म्हणवणा-या एका पक्षाचे 30 वर्षांहून अधिक काळ आमदार राहिलेल्या नेत्याच्या भाषेने या पक्षाच्या संस्काराचाही बुरखा या निमित्ताने फाटला आहे,”असा टोलाही त्यांनी लगावला.

ऊर्जा विभागाने दिला कारवाईचा तपशील

दोन मीटरचे वर्षभरात 10 लाख बिल भरले असे लोणीकर म्हणत असले तरी गेल्या सव्वा वर्षांपासून त्यांनी विजेचे बिल भरले नाही.

1. ग्राहक क्रमांक – 490014889105

श्री. राहूल बबनराव यादव हाऊस नं.52, गट नंबर146, आलोक नगर, औरंगाबाद पीन कोड- 430001

वीज बिल भरल्याची अखेरची तारीख- 18 जानेवारी 2021

मार्च 22 अखेर एकूण थकबाकी- 3 लाख 21 हजार 470

सद्यस्थिती- वीज जोडणी खंडित केलेली नसून वीज पुरवठा अद्यापही सुरू आहे.

2. ग्राहक क्रमांक- 490011009236

नाव- आय.एस. पाटील पत्ता- प्लॉट नं.55 गट नं.146 अशोकनगर जवळ, सातारा, औरंगाबाद पिन कोड- 431001

वीज बिल भरल्याची अखेरची तारीख-27 मार्च 2019

मार्च २२ अखेर एकूण थकबाकी- 76 हजार 200.

सद्यस्थिती- वीज बिल थकल्याने वीज पुरवठा तात्पूरता खंडित केला आहे.

लोणीकर खोटी माहिती देत आहेत

लोणीकर हे 10 लाख वीज बिल भरल्याचे सांगत असले तरी त्यांच्या दोन्ही घरांची थकबाकी जवळपास 4 लाख आहे. लोणीकर यांनी महावितरणच्या अधिका-यांना निलंबित करण्याची धमकी देणे हा शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याचा व शासकीय अधिका-यांवर चुकीच्या कामांसाठी दबाव टाकण्याचा प्रकार आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांना सातत्याने इनकम टॅक्स आणि ईडी यांच्या धाडी टाकण्याची धमकी भाजप नेते देत असतात. आता ही धमकी अधिका-यांनाही देण्यापर्यंतची पातळी या नेत्यांनी गाठली हे अतिशय धक्कादायक व वेदनादायी आहे. महाराष्ट्राच्या सुसंस्कृत परंपरेला हे शोभणारे नाही. त्याबद्दल लोणीकर यांनी महाराष्ट्राची व महावितरणच्या अधिका-यांची माफी मागायला हवी. दलित वस्त्यांबाबत त्यांनी केलेले वक्तव्यही आक्षेपार्ह आहे. यावरून त्यांची दलित समाजाबद्दलची मानसिकता दिसून येते,अशी टीका ही डॉ. राऊत यांनी केली.

Amit Shaha In LS: मी असं विधेयक महाराष्ट्रासाठी आणू शकत नाही, केजरीवालांना उत्तर देताना शहांचा तीन राज्यांचा दाखला

Babanrao Lonikar Audio Clip : इन्कम टॅक्सच्या धाडी टाकीन, बबनराव लोणीकरांची इंजिनिअरला धमकी, भाजपची अडचण?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.