‘एक रुपया जरी खाल्ला असेल तर धैर्यवर्धन पुंडकरांच्या घरासमोर हात कलम करेन!’ आरोप फेटाळत बच्चू कडूंचा पलटवार

राज्यपाल कोश्यारी यांनी सर्व कागदपत्रांची तपासणी करत बच्चू कडू यांच्याविरोधात खटला चालवण्याचे आदेश शनिवारी दिले. त्याबाबतची माहिती वंचितचे धैर्यवर्धन पुंडकर यांनी दिलीय. या पार्श्वभूमीवर बच्चू कडू आज तातडीने अकोला जिल्हा दौऱ्यावर गेले. त्यावेळी त्यांनी पुंडकरांचे आरोप फेटाळून लावत त्यांना त्यांना वेगळ्या चष्म्याची गरज असल्याचा पलटवार केलाय.

'एक रुपया जरी खाल्ला असेल तर धैर्यवर्धन पुंडकरांच्या घरासमोर हात कलम करेन!' आरोप फेटाळत बच्चू कडूंचा पलटवार
बच्चू कडू, शालेय शिक्षण राज्यमंत्रीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Feb 27, 2022 | 7:44 PM

अकोला : बनावट दस्ताऐवज बनवून शासकीय निधीचा अपहार केल्याचा गंभीर आरोप शालेय शिक्षणमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्याविरोधात करण्यात आलाय. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांची काही दिवसांपूर्वी भेट घेत तक्रार केली होती. त्यानंतर कोश्यारी यांनी सर्व कागदपत्रांची तपासणी करत बच्चू कडू यांच्याविरोधात खटला चालवण्याचे आदेश शनिवारी दिले. त्याबाबतची माहिती वंचितचे धैर्यवर्धन पुंडकर यांनी दिलीय. या पार्श्वभूमीवर बच्चू कडू आज तातडीने अकोला जिल्हा दौऱ्यावर गेले. त्यावेळी त्यांनी पुंडकरांचे आरोप फेटाळून लावत त्यांना त्यांना वेगळ्या चष्म्याची गरज असल्याचा पलटवार केलाय.

पुंडकर यांना वेगळ्या चष्म्याची गरज- कडू

वंचित बहुजन आघाडीकडून तक्रार करण्यात आलेल्या रस्त्याची बच्चू कडू यांनी आज पाहणी केलीय. अकोट तालुक्यातील कुटासा ते कावसा असा हा रस्ता आहे. यावेळी बोलताना बच्चू कडू यांनी धैर्यवर्धन पुंडकर यांच्यावर जोरदार टीका केलीय. पुंडकर यांना वेगळ्या चष्म्याची गरज आहे. पुंडकरांनी बाळापूर येथील पंचशिल संस्था हडप केलीय. ते वंचित सोबत राहून दलितांवर अन्याय करतात. वंचितच्या गृहमंत्र्याला बाहेर काढा, असा खोचक सल्लाही बच्चू कडू यांनी प्रकाश आंबेडकरांना दिलाय. तसंच मी एक रुपया जरी खाल्ला असेल तर धैर्यवर्धन पुंडकर यांच्या घरासमोर हात कलम करेल, असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलंय.

बच्चू कडू यांच्यावर नेमका आरोप काय?

शालेय शिक्षण राज्यमंत्री आणि अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्यावर रस्ते निधीबाबत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आलाय. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. बच्चू कडू यानी बनावट दस्ताऐवज बनवून अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांवर शासकीय निधी वळता करुन घेत अपहार केला, असा आरोप वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आलाय. याबाबतची सविस्तर माहिती राज्यपाल कोश्यारी यांना देण्यात आलीय. संबंधित कागदपत्रे तपासल्यानंतर आता राज्यपालांनी बच्चू कडू यांच्याविरोधात खटला चालवण्याचे आदेश दिले आहेत.

या प्रकरणात तत्कालीन जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांचंही नाव समोर आलं आहे. काही इतर जिल्हा मार्ग आणि ग्राम मार्ग हे शासन क्रमांक नसलेल्या रस्त्यांच्या कामाची यादी जिल्हा परिषदेला पाठवून बच्चू कडू यांनी सरकारी निधीचा अपहार केल्याचं समोर आलं. याबाबतचे पुरावे वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर यांनी समोर आणले. त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत राज्यपालांची भेट घेत योग्य कारवाईची मागणी केली होती.

इतर बातम्या :

‘मातोश्री’चं नाव दिल्ली ठेवण्याचा विचार दिसतो! सदाभाऊ खोतांचा आदित्य ठाकरेंना जोरदार टोला

Video : आधी अलिशान “महिंद्रा थार”, मग बैलगाड्याचा कासरा, भरणे मामांच्या डबल ड्राईव्हिंगची हवा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.