शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बच्चू कडूंनी पोलीस अधिकाऱ्याला झापलं! ऑडिओ क्लिप व्हायरल

बच्चू कडू यांचा आक्रमक आणि सामान्यांच्या मदतीला धावून जाण्याचा स्वभाव कायम आहे. कधी ते पेहराव बदलून सरकारी कार्यालयातील गैरव्यवहार चव्हाट्यावर आणतात. तर कधी अधिकाऱ्याला ते जनतेचे सेवक असल्याची जाणीव करुन देत असतात. असाच एक प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. एका शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल पोलीस अधिकाऱ्यांकडून घेतली जात नसल्याचं कळताच कडू यांनी थेट त्या अधिकाऱ्याला फोन लावला आणि त्याला चांगलंच झापलं. बच्चू कडू आणि त्या पोलिस अधिकाऱ्यातील हा संवाद सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बच्चू कडूंनी पोलीस अधिकाऱ्याला झापलं! ऑडिओ क्लिप व्हायरल
बच्चू कडू, राज्यमंत्री, शालेय शिक्षण विभाग
Follow us
| Updated on: Feb 03, 2022 | 4:50 PM

अमरावती : शेतकरी, कष्टकरी, दिव्यांग, गरीबांच्या प्रश्नावर प्रहार संघटनेचे नेते आणि शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) कायमच आक्रमक असतात. सत्तेत सहभागी होण्यापूर्वी बच्चू कडू यांची आंदोलनं हा राज्यातील चर्चेचा विषय असायचा. तसंच सत्ताधाऱ्यांना त्यांच्या आंदोलनाची दखल घेणं भाग असायचं. आता सत्तेत सहभागी झाल्यानंतरही बच्चू कडू यांचा आक्रमक आणि सामान्यांच्या मदतीला धावून जाण्याचा स्वभाव कायम आहे. कधी ते पेहराव बदलून सरकारी कार्यालयातील (Government Offices) गैरव्यवहार चव्हाट्यावर आणतात. तर कधी अधिकाऱ्याला ते जनतेचे सेवक असल्याची जाणीव करुन देत असतात. असाच एक प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. एका शेतकऱ्यांच्या (Farmer) तक्रारीची दखल पोलीस अधिकाऱ्यांकडून घेतली जात नसल्याचं कळताच कडू यांनी थेट त्या अधिकाऱ्याला फोन लावला आणि त्याला चांगलंच झापलं. बच्चू कडू आणि त्या पोलिस अधिकाऱ्यातील हा संवाद सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

बच्चू कडू आणि पोलिस अधिकाऱ्याचा फोनवरील संवाद

बच्चू कडू – इन्फो कंपनीनं परवानगी न घेता शेतकऱ्याच्या शेतात खोदकाम केलं.

पोलीस अधिकारी – शेतकऱ्याचं नाव सर?

बच्चू कडू – आंधळे.. आंधळे… अजून गुन्हा दाखल केला नाही.

पोलीस अधिकारी – सर, तहसीलदार साहेबांनी त्यांना दंड ठोठावला आहे.

बच्चू कडू – तो अलग विषय आहे.

पोलीस अधिकारी – खरं तर सर त्यात दोन शेतकऱ्यांचा वाद आहे.

बच्चू कडू – ते नका सांगू, वाद हा नंतरचा भाग आहे. तुम्ही ठाणेदारसाहेब कुणी गुन्हा दाखल करत नसाल तर मला तुमच्या विरोधात तक्रार करावी लागेल, क्रमांक एक.

पोलीस अधिकारी – बरोबर सर

बच्चू कडू – तुम्ही गुन्हा दाखल करा, नंतर चौकशी करा. पण रिपोर्ट दिल्यानंतर तुम्ही गुन्हा दाखल करत नाही. साधी एन्ट्रीपण करत नाही, चौकशी करत नाही, हे बरोबर नाही.

पोलीस अधिकारी – सर MSRDC चा, तहसीलदार साहेबांचा अहवाल घेऊ आणि गुन्हा दाखल करु

बच्चू कडू – तो ठेकेदार MSRDC चा असूदे की PWD छा असूदे, का तो ….. तिकडे काही असूदे. त्याचा काय संबंध?

पोलीस अधिकारी – करतो सर कारवाई करतो.

बच्चू कडू – तसा मोठा माणूस.. लहान माणूस असता तर ये बस इथे, उभा राहा… कशी …… तुमची.

पोलीस अधिकारी – नाही तर तसं नाही. आंधळेंना पण माहिती सर सगळ्या बाबी त्यांना माहिती.

बच्चू कडू – मला माहित पडलं तुम्ही माझ्यासारख्याला पण घुमवून राहिले. अहवाल पाठवला, ते पाठवला… मी करु का साहेब तक्रार तुमची?

पोलीस अधिकारी – ठीक सर मी लवकर कारवाई करतो.

बच्चू कडू – लवकर नाही… मी तुमची दोन दिवस वाट पाहतो. जर तुम्ही कारवाई केली नाही तर त्याला उपोषणालाही बसवतो. अंगावर रॉकेल घ्यायला सांगतो. तुमची….

इतर बातम्या :

जयकुमार गोरे, सदाभाऊ खोत, रणजितसिंह नाईक-निंबाळकर मोदींच्या भेटीला, मोदींकडे काय मागितलं?

राजपथावरील चित्ररथाच्या ऑनलाईन मतदानात महाराष्ट्र नंबर वन; निकाल जाहीर होण्याचं घोंगडं अडलं कुठं?

Wardha Abortion | आर्वी गर्भपात प्रकरणानंतर आता सरकारचे मोठे पाऊल, एमटीपी कायद्यासाठी जिल्हास्तरीय मंडळाची नियुक्ती करण्याची सूचना

Non Stop LIVE Update
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.