मावळमधून तिकिटासाठी राज्यमंत्री बाळा भेगडे मुलाखतीला हजर, तिघांमध्ये शर्यत!

भाजप नेते आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मावळ विधानसभा मतदारसंघासाठी मुलाखती घेतल्या. यावेळी 20 जणांनी या मतदारसंघातून इच्छुक असल्याचं सांगत मुलाखती दिल्या.

मावळमधून तिकिटासाठी राज्यमंत्री बाळा भेगडे मुलाखतीला हजर, तिघांमध्ये शर्यत!
Follow us
| Updated on: Aug 26, 2019 | 5:24 PM

पुणे: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीयांनी इच्छुकांच्या मुलाखती सुरु केल्या आहेत. भाजपनेही नावं निश्चित करण्यासाठी मुलाखती घेतल्या. भाजप नेते आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मावळ विधानसभा मतदारसंघासाठी मुलाखती घेतल्या. यावेळी 20 जणांनी या मतदारसंघातून इच्छुक असल्याचं सांगत मुलाखती दिल्या. यामध्ये कामगार राज्यमंत्री बाळा भेगडे यांचाही समावेश होता. राज्यमंत्री बाळा भेगडेंनी तिकिटासाठी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे मुलाखत दिली.

मावळ विधानसभा मतदारसंघात आरएसएसची ताकद मोठी आहे. भाजपाचा मोठा मतदार इथे आहे. त्यामुळे ज्याला तिकीट मिळेल तो विजयी होईल असा समज इच्छुकांमध्ये आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मावळमध्ये युतीला भरघोस मतदार झालं.  इथे अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी पराभव केला.

आता विधानसभेला या मतदारसंघात बाळा भेगडे यांनाच तिकीट मिळणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. मात्र तरीही भाजपची संसदीय समितीच उमेदवार ठरवेल, असं रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं.

बाळा भेगडे हे सलग दुसऱ्यांदा या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करत आहेत. दोन टर्म आमदार असलेल्या भेगडे यांची नुकतीच राज्यमंत्रीपदी वर्णी लागली. त्यांनी पुन्हा एकदा इथे दावेदारी सांगितली आहे. मात्र सुनील शेळके आणि रवी भेगडे या दोघांनीही या मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छा व्यक्त केली आहे.

'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.
'देवाभाऊ अभिनंदन...',सामनातून फडणवीसांवर स्तुतीसुमनं, बघा काय म्हटलंय?
'देवाभाऊ अभिनंदन...',सामनातून फडणवीसांवर स्तुतीसुमनं, बघा काय म्हटलंय?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 28 दिवस उलटले, अद्याप 3 आरोपी फरार
संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 28 दिवस उलटले, अद्याप 3 आरोपी फरार.
सरपंच हत्या प्रकरणावरून टीका होत असताना धनंजय मुंडे स्पष्टच म्हणाले...
सरपंच हत्या प्रकरणावरून टीका होत असताना धनंजय मुंडे स्पष्टच म्हणाले....
भुजबळांच्या मंत्रिपदाचं काय? मंत्री करतो असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत?
भुजबळांच्या मंत्रिपदाचं काय? मंत्री करतो असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत?.
CID पथकाला गुंगारा? कराडला कोणाचा सहारा?आरोपीची कार दादांच्या ताफ्यात?
CID पथकाला गुंगारा? कराडला कोणाचा सहारा?आरोपीची कार दादांच्या ताफ्यात?.