ऊसतोड मजुरांना यंदा 14 टक्के वाढ, सर्व संघटनांचे एकमत, पुण्यातील बैठकीत निर्णय

ऊसतोड मजुरांना यंदा 14 टक्के वाढ मिळणार असल्याची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. तसंच या निर्णयाबाबत सर्वांच एकमत झाल्याने सर्व ऊसतोड संघटनांनी आपला संप मागे घेतला आहे. (Balasaheb Patil said sugarcane workers will get fourteen percentage increment)

ऊसतोड मजुरांना यंदा 14 टक्के वाढ, सर्व संघटनांचे एकमत, पुण्यातील बैठकीत निर्णय
Follow us
| Updated on: Oct 27, 2020 | 6:19 PM

पुणे : ऊसतोड कामगारांच्या मजुरीच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आज पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये बैठक पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्त्वात पार पडलेल्या या बैठकीत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, भाजप नेत्या पंकजा मुंडे, भाजप आमदार सुरेश धस असे दिग्गज नेते उपस्थित होते. (Balasaheb Patil said sugarcane workers will get fourteen percentage increment)

ऊसतोड मजुरांना यंदा 14 टक्के वाढ मिळणार असल्याची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. तसंच या निर्णयाबाबत सर्वांच एकमत झाल्याने सर्व ऊसतोड संघटनांनी आपला संप मागे घेतला आहे.

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांची नोंदणी करून विविध योजना राबविण्याबरोबरच महामंडळाचे लवकरच बळकटीकरण करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

पंकजा मुंडे यांनी मी कुठलाच आकडा जाहीर केला नव्हता. यंदा जी काही वाढ मिळालीय त्यावर आम्ही समाधानी आहोत. गोपीनाथ मुंडे ऊसतोड महामंडळ लवकरच कार्यान्वित होणार आहे. नोव्हेंबरमध्ये नोंदणी सुरू होईल त्यातून त्यांचे अनेक प्रश्न मिटणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

कामगारांनी कामासाठी जावं : सहकार मंत्री

दरम्यान, बाळासाहेब पाटील म्हणाले,  “ऊस तोड कामगार आणि संघटनांची बैठक पुणे येथे पार पडली. 2020 – 21 ते 2022 ते 2023 असा करार झाला आहे. यावर्षी 14 टक्के वाढ मिळणार आहे. सर्व संघटनांनी संप मागे घेतला आहे. कामगारांनी आपल्याला आपल्या ठरलेल्या कारखान्यांवर कामासाठी जावं”, असं आवाहन सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली.

शेतकरी आणि ऊसतोड मजूर हे साखर संघाचेच घटक आहेत, असं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ऊसतोड मजुरांनी अधिक न ताणता 21 रुपयांची दरवाढ मिळाली तर ऊसतोडणीसाठी निघावे, अशी भूमिका घेतली होती. यामुळे ऊसतोड आंदोलनात पंकजा मुंडे आणि सुरेश धस आमनेसामने आले होते. काही संघटनांच्या हट्टामुळे हा तिढा निर्माण झाला आहे. अन्यथा हा प्रश्न दोन महिन्यांपूर्वीच निकाली निघाला असता, असा टोला पंकजा मुंडे यांनी सुरेश धस यांना लगावला होता.

ऊसतोड मजूर आणि मुकादमांचे नुकसान होऊ नये म्हणून मी माझ्या संघटनेचा संप स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी अधिवेशनात राज्य सरकारने यासाठी कायदा मंजूर करावा. ऊसतोड मजूर आणि मुकादमांच्या मजुरीत 85 टक्के वाढ झाली पाहिजे. अन्यथा दोन महिन्यांनी पुन्हा संप करण्याचा इशारा सुरेश धस यांनी दिला.

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी देखील दसऱ्याला ऊसतोड कामगारांचा मेळावा घेतला होता.

संबंधित बातम्या :

पंकजा मुंडेंनी दुसऱ्या कोणाची तरी भाषा बोलू नये; ऊसतोड कामगारांची अवस्था पाहा- प्रकाश आंबेडकर

सुरेश धस ऊसतोड कामगारांना धमकी देताय काय?; पंकजा मुंडेंचा थेट इशारा

(Balasaheb Patil said sugarcane workers will get fourteen percentage increment)

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.