आधी विखेंची बाळासाहेब थोरातांवर टीका, नंतर एकमेकांशेजारी बसून मनसोक्त गप्पा
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील एकाच मंचावर (Balasaheb Thorat Radhakrishna Vikhe patil sitting together) दिसून आले.
अहमदनगर : राजकारणात एकमेकांवर आरोप प्रत्यारोपानंतर नुकतंच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील एकाच मंचावर (Balasaheb Thorat Radhakrishna Vikhe patil sitting together) दिसून आले. विशेष म्हणजे थोरात आणि विखे पाटील एकाच सोफ्यावरही एकमेकांशेजारी बसलेले पाहायला मिळाले. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले (Balasaheb Thorat Radhakrishna Vikhe patil sitting together) आहे.
संगमनेर तालुक्यातील नामदेव गुंजाळ यांच्या मुलीच्या विवाह सभारंभासाठी या दोन्ही नेत्यांनी हजेरी लावली. त्यावेळी बाळासाहेब थोरात आणि विखे चक्क एकमेकांच्या शेजारी एकाच सोफ्यावर बसले. यावेळी या दोघांमध्ये चर्चा ही झाल्याच पाहायला मिळत आहे. मात्र ही चर्चा नक्की कशाची झाली याबाबत उत्सुकता अद्याप कायम आहे.
“बाळासाहेब थोरात काही वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करणार होते. काही भाजप नेत्यांशीही त्यांच्या गाठीभेटी झाल्या.” असा दावा विखेंनी प्रसारमाध्यमांसमोर केला होता. मात्र एका लग्नसभारंभात ते दोघेही एकमेकांशी शेजारी बसल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या (Balasaheb Thorat Radhakrishna Vikhe patil sitting together) आहेत.
राजकारणात वैरी असणारे समोर आले तर मित्रत्वाच्या नात्यानं भेटतात असे म्हटलं जातं. याला साजेसाच हा प्रसंग घडला. मात्र राजकीय वर्तुळात या निमित्ताने अनेक चर्चा रंगलेल्या पाहायला मिळत आहे.
काँग्रेस पक्षात एकत्र काम करताना या दोघांनी कायम एकमेकांवर कुरघोडी करण्याचे राजकारण केलं. बाळासाहेब थोरात आता काँग्रेसमध्ये आहेत. तर राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपमध्ये. एकाच पक्षात असतानाही या दोघांनी एकमेकांवर कुरघोडी केल्या होत्या. विखे काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर एकमेकांवर आरोप करण्याची संधी सोडत नाही. मात्र लग्न सभारंभात एकमेकांशेजारी बसण्याचा प्रसंग घडल्याने चर्चांना चांगलेच उधाण आले (Balasaheb Thorat Radhakrishna Vikhe patil sitting together) आहे.