सुप्रीम कोर्टाचा गिरीश महाजनांच्या याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्यास नकार, बाळासाहेब थोरात नेमकं काय म्हणाले?

महाराष्ट्र काँग्रेसचे (Congress) प्रमुख नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. बाळासाहेब थोरात यांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधला.

सुप्रीम कोर्टाचा गिरीश महाजनांच्या याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्यास नकार, बाळासाहेब थोरात नेमकं काय म्हणाले?
बाळासाहेब थोरातImage Credit source: Tv9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 15, 2022 | 2:40 PM

नवी दिल्ली : महाराष्ट्र काँग्रेसचे (Congress) प्रमुख नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. बाळासाहेब थोरात यांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधला. थोरात यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. महाराष्ट्रातील राजकारण, राज्यपालांची विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीसंदर्भातली भूमिका, भाजपनं (BJP) विधानसभा अध्यक्षपदावरुन न्यायालयात घेतलेली धाव आणि काँग्रेसच्या पक्ष नेतृत्त्वासंदर्भात सुरु असलेल्या चर्चा यावर थोरात यांनी भाष्य केलं. भाजप नेते गिरीश महाजन यांनी सुप्रीम कोर्टात विधानसभा अध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेला आव्हान देत सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यासंदर्भात बाळासाहेब थोरात यांनी भाष्य केलं आहे. बाळासाहेब थोरात यांनी भाजपकडून त्यांसंदर्भात चुकीचं राजकारण सुरु असल्याचं म्हटलंय. तर, सुप्रीम कोर्टानं विधानसभा अध्यक्ष निवड प्रक्रियेसंदर्भातील याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्यास नकार दिल्याची माहिती देखील थोरात यांनी दिली.

बाळासाहेब थोरात नेमकं काय म्हणाले?

विधानसभा अध्यक्ष पद तातडीने भरलं जावं, असं कोर्टाने सांगितले आहे.आम्ही राज्यपालांना विनंती करत आहोत, असं बाळासाहेब थोरात म्हणाले. मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणाऱ्या गिरीश महाजन यांच्या डिपॉझिटची रक्कमही जप्त केली गेली होती. आता, गिरीश महाजन यांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी द्यायला सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे, असं बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत. भाजपकडून सध्या चुकीचं राजकारण सुरु आहे. अध्यक्ष निवडावा हे राज्यघटना सांगते.

राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या नेतृत्त्वाची पक्षाला गरज

आम्ही सर्वजण सोनिया गांधी यांच्या पाठीशी आहोत. राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वाची गरज पक्षाला आणि देशाला आहे, असं देखील बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.

 मुंबई उच्च न्यायालयानं महाजन यांना फटकारलेलं

मुंबई उच्च न्यायालयाच्या महाराष्ट्र सभापती निवडणूक नियमातील बदलाविरोधातील जनहित याचिका फेटाळण्याच्या आदेशाविरोधात भाजप आमदार गिरीश महाजन यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र, यावर काल सुनावणी होवू शकली नव्हती. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणूक प्रक्रियेला (आवाजी मतदानाला) विरोध करणारी याचिका भाजपा आमदार गिरीश महाजन आणि जनक व्यास यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केली होती. मात्र, सदर याचिकेत याचिकेत तथ्य नसल्याचे कारण देत मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी दोन्ही याचिका फेटाळून लावल्या होत्या. एवढेच नव्हे तर दोन्ही याचिकाकर्ते यांची अनामत रक्कम एकूण 12 लाख रुपये सुद्धा न्यायालयाने जप्त केली होती.

इतर बातम्या:

tv9 Special : जे शिवराजसिंह चौहान सरकारनं केलं ते ठाकरे सरकार करणार का? कोरोना काळातलं वीज बिल सरसकट माफ

माथाडी कामगारांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करा, अन्यथा रस्त्यावर उतरू, नरेंद्र पाटलांच्या नेतृत्वात शेकडो माथाडी कामगार आझाद मैदानात

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.