बारामतीत घरातील सर्व माझ्याविरोधात, मला एकटे पाडणार पण…अजित पवार कार्यकर्त्यांसमोर भावनिक

Ajit Pawar ncp | अजित पवारांच्या बरोबर कंत्राटदार असतात, असे आरोप केले जातात. परंतु कंत्राटदार बरोबर असला म्हणजे मी थेट सोक्षमोक्ष लावतो. त्यांना नंतर घरी बोलवत नाही. काम चांगले झाले नाही तर लगेच काळ्या यादीत टाकतो. परंतु काही जाण लागेच घरी बोलवतात आणि फिक्सिंग करतात.

बारामतीत घरातील सर्व माझ्याविरोधात, मला एकटे पाडणार पण...अजित पवार कार्यकर्त्यांसमोर भावनिक
ajit pawar
Follow us
| Updated on: Feb 16, 2024 | 2:34 PM

बारामती, प्रदीप कापसे, दि. 16 फेब्रुवारी 2024 | बारामतीत अजित पवार गटाचा बूथ कमिटी मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात बोलताना अजित पवार भावनिक झाले. परिवारात एकटे पाडण्यात आल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. यावेळी बोलताना त्यांनी नाव न घेता शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार टीका केली. संसदेत भाषण करुन प्रश्न सुटत नाही. उत्तम संसदपटू म्हणून किताब मिळला म्हणजे कामे झाली असे नाही, त्यासाठी तडफ असावी लागते, असा जोरदार टोला त्यांनी सुप्रिया सुळे यांना लगावला.

काय म्हणाले अजित पवार

मेळाव्यात कार्यकर्त्यांसमोर बोलताना अजित पवार भावनावश झाले. ते म्हणाले, ” बारामतीमध्ये आता ते एकमेव वरिष्ठ आहे. दुसरे वरिष्ठ पुणे शहरात आहेत. बारामतीमध्ये मी आणि माझा परिवार सोडला तर सर्व जण माझ्या विरोधात प्रचार करतील. मला एकटे पाडण्याचा प्रयत्न काही जण करतील. घरातील सर्व माझ्या विरोधात गेले. तरी हे तुम्ही सर्व माझ्याबरोबर आहात. तुमची साथ आहे, तुमचा पाठिंबा आहे. तुमची एकजूट आहे. तोपर्यंत माझे काम असेच चालत राहणार आहे. काही जण तुम्हाला भावनिक होऊन तुमच्यासमोर येतील. परंतु भावनेने काम होत नाही. प्रश्न सुटत नाही. रोजगार मिळत नाही. त्यासाठी तडफ लागते.”

घड्याळ तेच वेळ नवी

अवघ्या काही दिवसांत लोकसभेची निवडणूक जाहीर होईल. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. दोन मार्च रोजी पाच जिल्ह्यांचा नमो रोजगार मेळावा होणार आहे. त्यासाठी आपल्या परिसरातील जास्तीत जास्त युवकांना रोजगार मिळाला पाहिजे. आपल्या राष्ट्रवादीसोबत भाजप आणि शिवसेना आहे. आपली घड्याळ तेच आहे फक्त वेळ नवी आहे.

हे सुद्धा वाचा

अजित पवारांच्या बरोबर कंत्राटदार असतात, असे आरोप केले जातात. परंतु कंत्राटदार बरोबर असला म्हणजे मी थेट सोक्षमोक्ष लावतो. त्यांना नंतर घरी बोलवत नाही. काम चांगले झाले नाही तर लगेच काळ्या यादीत टाकतो. परंतु काही जाण लागेच घरी बोलवतात आणि फिक्सिंग करतात, असा आरोप अजित पवार यांनी कोणाचे नाव न घेता केला.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.