शरद पवारांचे कट्टर विरोधक, बारामतीचे माजी खासदार संभाजीराव काकडे यांचं निधन

संभाजीराव काकडे बारामती लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. (Baramati Sambhajirao Kakade Dies)

शरद पवारांचे कट्टर विरोधक, बारामतीचे माजी खासदार संभाजीराव काकडे यांचं निधन
Sambhajirao Kakade
Follow us
| Updated on: May 10, 2021 | 2:20 PM

पुणे : जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, सहकार तज्ज्ञ संभाजीराव काकडे (Sambhajirao Kakade) यांचे निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. बारामती लोकसभा मतदारसंघातून संभाजीराव दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे कट्टर विरोधक म्हणून काकडेंची ओळख होती. लाला या नावाने ते समर्थकांमध्ये ओळखले जात. (Baramati Former MP Janata Party Leader Sambhajirao Kakade Dies of old age in Pune)

संभाजीराव काकडे यांचे सोमवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले असा परिवार आहे. ते बारामती येथील निंबूत गावातील सधन शेतकरी कुटुंबातील होते. पुण्यातील राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. जनता पक्षाची प्रदीर्घ काळ धुरा सांभाळणारे आणि राज्यातील अनेक राजकीय नेत्यांना घडवणारे म्हणून संभाजीरावांची ओळख होती.

आमदार-खासदार म्हणून कारकीर्द

1971 मधील विधान परिषदेच्या माध्यमातून पहिल्यांदा संभाजीराव काकडे आमदार झाले. ते परिषदेवर अपक्ष म्हणून निवडून गेले होते. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार रंगराव पाटील यांचा पराभव केला होता.

संभाजीराव काकडे बारामती लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. 1978 मध्ये भारतीय लोक दलातर्फे, तर 1982 मध्ये जनता दलातर्फे ते बारामतीतून लोकसभेवर निवडून गेले होते. जनता पक्ष आणि समाजवादी चळवळीचे ते बिनीचे शिलेदार होते.

सुरुवातीला सिंडीकेट काँग्रेस, नंतर जनता पक्ष तसेच जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष होते. माजी पंतप्रधान विश्‍वनाथ प्रतापसिंग यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. संभाजीराव काकडे यांनी राज्यस्तरावर आपल्या नेतृत्वाचा ठसा उमटवत अनेक कार्यकर्ते, नेते घडवले.

पुणे जिल्ह्यातील आदिवासींसाठी त्यांनी हिरडा उत्पादक संघाची स्थापना केली होती. साखर कारखाना आणि तत्सम सहकार क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले होते. बारामती तालुक्‍यातील काकडे घराणे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मातब्बर घराणे मानले जाते.

बड्या घराण्यांशी नातेसंबंध

लोकनेते शंकरराव मोहिते पाटील, बाळासाहेब देसाई, चिमणराव कदम, प्रेमला काकी चव्हाण आदी घराण्यात त्यांचे नातेसंबंध होते. कोणे एके काळी पुणे जिल्ह्याच्या राजकारणात दबदबा असलेल्या काकडे कुटुंबातील लाला काळाच्या पडद्याआड गेल्याने समर्थकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. (Baramati Sambhajirao Kakade Dies)

संभाजीराव काकडे हे गेली काही वर्षे राजकीय घडामोडींपासून अलिप्त होते. मात्र त्यांचे राजकीय घटना घडामोडीवर बारकाईने लक्ष असत. सल्लामसलतीसाठी आणि त्यांचे अनुभवाचे बोल ऐकण्यासाठी विविध राजकीय पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते त्याच्याकडे आवर्जून येत असत.

संभाजीराव काकडे यांची कारकीर्द

1978 मध्ये भारतीय लोक दल तर्फे बारामती लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर 1982 मध्ये जनता दल तर्फे बारामती लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर सोमेश्वर साखर कारखाना खरेदी विक्री संघ इत्यादी संस्थाशी पूर्वी संबंधित होते श्रमदान ग्रंथालयाचे 1972 मध्ये उद्घाटन केल्यानंतर 16 वर्षे अध्यक्षपदी

अजित पवारांकडून श्रद्धांजली

“संभाजीराव काकडे सामान्य जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी तळमळीनं कार्य करणारे नेते होते. शेतकरी, कष्टकरी, दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांच्या उन्नतीसाठी त्यांनी जीवनभर काम केले. पुणे जिल्ह्याच्या विकासात मोलाचं योगदान दिलं. राजकारण, समाजकारण, सहकार अशा समाजजीवनाच्या विविध क्षेत्रात कार्य करणारं ध्येयवादी, तत्वनिष्ठ नेतृत्व म्हणून ते कायम स्मरणात राहतील. संभाजीराव काकडे साहेब सार्वजनिक जीवनात ‘लाला’ नावाने परिचित होते. त्यांचं निधन ही पुणे जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी आहे. जिल्ह्यानं ज्येष्ठ, मार्गदर्शक नेतृत्वं गमावलं आहे. मी, पवार कुटुंबिय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काकडे कुटुंबियांच्या आणि कार्यकर्त्यांच्या दु:खात सहभागी आहोत. स्वर्गीय संभाजीराव काकडे साहेबांना सद्गती लाभो” अशी प्रार्थना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकसंदेशात केली आहे.

संबंधित बातम्या :

शिवसेनेची रणरागिणी काळाच्या पडद्याआड, नगरसेविका सत्यभामा गाडेकर यांचं कोरोनाने निधन

(Baramati Former MP Janata Party Leader Sambhajirao Kakade Dies of old age in Pune)

99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.