Solapur : उद्योग-व्यवसायावरुन बार्शीचे राजकारण तापले, काय आहेत आरोप-प्रत्यारोप?
भविष्यात उद्योग- व्यवसाय उभारण्यावरुन स्पर्धा करावी. यामध्ये प्रत्येक शेतीमालाला सोपलांपेक्षा किमान 50 रुपये तरी अधिकचा दर दिला जाणार असल्याचे राऊत यांनी सांगितले आहे. हरभऱ्याला 4 हजार रुपये क्विंटल दर असेल आपण 4 हजार 50 रुपयेच देणार असे अव्हान राऊतांनी दिले आहे.
सोलापूर : व्यापारीदृष्ट्या (Barshi) बार्शीला अनन्यसाधारण महत्व आहे. मराठवाड्याच्या प्रवेशद्वारावर असलेल्या या शहरात कधीकाळी 26 डाळी मिल होत्या. आता त्या कुणामुळे बंद पडल्या आणि बार्शीच्या व्यापारीकरणाला (Dilip Sopal) माजी आ. दिलीप सोपल यांच्याकडून कुरघोड्या होतात याबाबत (Rajendra Raut) आमदार राजेंद्र राऊत यांनी टोकाचे आरोप तर केलेच. पण स्पर्धा करायची तर विकासाची करावी. उद्योग व्यवसाय उभारुन शेतकऱ्यांच्या शेतीमालाला अधिकचा दर देण्याबाबत स्पर्धेमध्ये केव्हाही उतरावे. दिलीप सोपल शेतकऱ्यांच्या शेतीमालाला जो दर देतील त्यापेक्षा किमान 50 रुपये आपला दर असेल असे आव्हानच राऊत यांनी दिलीप सोपल यांना दिले आहे. त्यामुळे बार्शीत राजकारण सुरु आहे ते उद्योग-व्यवसाय उभारणीवरुन.
बार्शीच्या राजकारणात सोपल अन् राऊत गट हे परंपरागत प्रतिस्पर्धक राहिलेले आहेत. राज्याच्या राजकारणात उलथापालथ होईल पण बार्शीत मात्र, या दोघांपैकीच एकाचीच सरशी हे ठरलेले आहे. यावेळी राजकारण तापले आहे ते बाजार समित्यांवरुन. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला येथे दर कमी दिला जात असल्याच्या आरोपावरुन राऊत यांनी दिलीप सोपल यांना उद्योग-व्यवसाय उभारुण आपल्यापेक्षा अधिकचा दर द्यावाच असे अव्हान केले आहे.
बार्शी हे एक बाजारपेठेचे केंद्रबिंदू आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक तालुक्यांसाठी सोईस्कर असलेले शहर आहे. कधीकाळी याच बार्शीत 26 डाळमिल होत्या. त्या दिलीप सोपलांमुळे बंद पडल्याचा आरोप आ. राजेंद्र राऊत यांनी केला आहे. उद्योग उभारणीचे नाहीतर बंद पाडण्याचे काम हे सोपल यांनी केल्याचा आरोप होत आहे.
भविष्यात उद्योग- व्यवसाय उभारण्यावरुन स्पर्धा करावी. यामध्ये प्रत्येक शेतीमालाला सोपलांपेक्षा किमान 50 रुपये तरी अधिकचा दर दिला जाणार असल्याचे राऊत यांनी सांगितले आहे. हरभऱ्याला 4 हजार रुपये क्विंटल दर असेल आपण 4 हजार 50 रुपयेच देणार असे अव्हान राऊतांनी दिले आहे.
त्यामुळे दिलीप सोपल यांनी कुणालाही मध्यस्ती न घालता थेट आरोप कारावेत. त्यांच्या प्रत्येक आरोपाला कृतीमधून उत्तर दिले जाईल असा इशारा राजेंद्र राऊत यांनी दिला आहे. शिवाय आपण दिलेले अव्हान त्यांनी स्विकारावे असेही म्हटले आहे. त्यामुळे राऊतांच्या आरोपांना सोपल आता काय उत्तर देणार हे पहावे लागणार आहे.