Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बीड जिल्हा बँक निवडणूक, परळी मतदान केंद्रावर भाजप-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची हाणामारी, पंकजा मुंडे घटनास्थळी

भाजप कार्यकर्त्यांनी विरोध केल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले.  दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्यानंतर खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली. (BDCC Election Pankaja Munde )

बीड जिल्हा बँक निवडणूक, परळी मतदान केंद्रावर भाजप-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची हाणामारी, पंकजा मुंडे घटनास्थळी
परळी मतदान केंद्रावर भाजप-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा राडा
Follow us
| Updated on: Mar 20, 2021 | 4:29 PM

बीड : बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीदरम्यान परळी मतदान केंद्रावर गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं. राष्ट्रवादी आणि भाजप कार्यकर्ते मतदान केंद्रावरच भिडले. त्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) मतदान केंद्रावर पोहोचल्या. बँकेवर प्रशासन बसवण्याचं सत्ताधारी पक्षाचं कारस्थान आहे, म्हणून आम्ही बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला, असं स्पष्टीकरण पंकजा मुंडे यांनी दिलं. (BDCC Election Pankaja Munde Vs Dhananjay Munde Parali Voting Centre BJP NCP Volunteers Ruckus)

भाजप-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले

दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्यानंतर खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली. चार वाजल्यानंतरही मतदान सुरु असल्याने तणाव निर्माण झाला होता. भाजप कार्यकर्त्यांनी विरोध केल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले.

“प्रशासन बसवण्याचं सत्ताधारी पक्षाचं कारस्थान” 

“काहीही कारण नसताना आमचे उमेदवारी अर्ज रिजेक्ट करण्यात आले. सरकारकडून हा आमच्यावर अन्याय आहे. कोरम पूर्ण होण्यासाठी ही उमेदवार संख्या ठीक नाही, त्यामुळे नैसर्गिक प्रशासक येणे हे ठीक आहे. मात्र बँकेवर प्रशासन बसवण्याचं कारस्थान सत्ताधारी पक्षाचं आहे. म्हणून आम्ही या निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे” असं पंकजा मुंडे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना स्पष्ट केलं.

“सहकार मंत्र्यांकडून दबाव”

“पळपुटेपणा हा सरकारी पक्षाने केला आहे. ही निवडणूक होऊ नये यासाठी सहकार मंत्र्यांकडून दबाव आणण्यात आला. पळपुटेपणा सत्ताधारी करत आहेत. एवढी चांगली चाललेली बँक, हिच्यावर प्रशासक आणण्याची वेळ आणली. सरकारचा गैरवापर त्यांनी केला आहे” असा घणाघाती आरोप पंकजा मुंडेंनी केला.

धनंजय मुंडेंना टोला

“त्यांची सत्ता सीमा ही परळी आहे. त्यांना दोन जागेवर उमेदावर मिळाले नाही. पराभव आणि यश चालत असते. पराभवाला अनेक मोठ-मोठे लोक सामोरे गेले आहेत. पराभवाचा संबंध अब्रूशी लावू नये. ही चुकीची विचारसरणी आहे.” अशा शब्दात पंकजा मुंडेंनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. (BDCC Election Pankaja Munde Vs Dhananjay Munde Parali Voting Centre BJP NCP Volunteers Ruckus)

बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेवर निवडून येता येणार नाही म्हणून प्रशासक आणण्याचा सत्ताधाऱ्यांचा घाट आहे. जीवनामध्ये मी लढाई नेहमी अकॅडमीक लढते. सत्ताधारी पक्ष लढाईला सामोरे जात नाही. मतदान बोगस केलं जातंय, असा आरोपही पंकजांनी केला.

पंकजा मुंडेंची थेट राज्यपालांकडे तक्रार

दरम्यान, पंकजा मुंडे यांनी बीड जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकी संदर्भात थेट राज्यपालांकडे तक्रार केली होती. बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत उमेदवारांचे अर्ज बाद करून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निवडणूक लढण्यास रोख लावला. औरंगाबाद आणि इतर जिल्ह्यांना जो न्याय दिला, तो बीडला नाही हे दुर्दैव आहे, असंही भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या. हे सर्व म्हणजे सत्ताधाऱ्यांनी जिल्हा बँक बरखास्त करण्याचे रचलेले कारस्थान असून, या गैरप्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्यपालांना एका निवेदनाद्वारे केली.

संबंधित बातम्या  

बीड जिल्हा बँक बरखास्त करण्याचे सत्ताधाऱ्यांचे कारस्थान; पंकजा मुंडेंची थेट राज्यपालांकडे तक्रार

पंकजा मुंडेंचा मोठा निर्णय, उद्या होणाऱ्या BDCC निवडणुकीवर बहिष्कार

(BDCC Election Pankaja Munde Vs Dhananjay Munde Parali Voting Centre BJP NCP Volunteers Ruckus)

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.