धक्कादायकः बीडमध्ये भाजप शहराध्यक्षाची आत्महत्या, स्वतःवर गोळी झाडली, खा. प्रीतम मुंडे रुग्णालयात पोहोचल्या PHOTO
भाजपचे शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी आज सकाळी स्वतःवर गोळी झाडून घेतली. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.
महेंद्रकुमार मुधोळकर, बीडः बीडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बीड भाजपचे शहराध्यक्षांनी आत्महत्या केली आहे. आज सकाळी त्यांनी स्वतःवरच गोळी झाडून घेतली. या आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
भाजपचे शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी आज सकाळी स्वतःवर गोळी झाडून घेतली. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर त्यांना तत्काळ शहरातील फिनिक्स रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना ही माहिती कळताच त्या तत्काळ रुग्णालयात पोहोचल्या.
भगीरथ बियाणी यांनी आत्महत्या का केली, यामागे काही राजकीय अथवा कौटुंबिक कारण आहे का, याची चौकशी आता पोलीस करत आहेत.
या घटनेनंतर बीडमध्ये मोठी खळबळ माजली आहे.