Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Smriti Irani : स्मृती इराणींच्या मुलीच्या रेस्टॉरंटमध्ये बीफ? प्रकरण पेटलं, काँग्रेसकडून तात्काळ राजीनाम्याची मागणी

हॉटेलचा एक कथित मेनू सोशल मीडियावर शेअर केला जात आहे, ज्यामध्ये बीफ डिश सर्व्ह करण्याबाबत माहिती देण्यात आली आहे. यावरून राज्यातही काँग्रेसच्या महिला नेत्यांकडून आंदोलनं करण्यात आली आहेत. 

Smriti Irani : स्मृती इराणींच्या मुलीच्या रेस्टॉरंटमध्ये बीफ? प्रकरण पेटलं, काँग्रेसकडून तात्काळ राजीनाम्याची मागणी
स्मृती इराणींच्या मुलीच्या रेस्टॉरंटमध्ये बीफ? प्रकरण पेटलं, काँग्रेसकडून तात्काळ राजीनाम्याची मागणी
Follow us
| Updated on: Jul 27, 2022 | 5:36 PM

पुणे : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांची मुलगी गोव्यात (Goa Restauran Beef) बेकायदेशीरपणे रेस्टॉरंट चालवत असल्याचा दावा काँग्रेस पक्षाने (Congress) केला आहे, त्यानंतर काँग्रेसने असा आरोप केला की जोश इराणींच्या तथाकथित रेस्टॉरंट सिली सोलमध्ये गोमांस आणि डुकराचे मांसही मिळते. स्मृती इराणी म्हणाल्या की त्यांची मुलगी अवघी 18 वर्षांची आहे आणि ती महाविद्यालयीन विद्यार्थिनी आहे, तिचा रेस्टॉरंट आणि बारशी काहीही संबंध नाही. या आरोपांविरोधात इराणी यांनी आरोप करणाऱ्या काँग्रेस नेत्यांना नोटिसाही पाठवल्या आहेत. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या मुलीवर हॉटेलवर झालेल्या कथित आरोपांचा मुद्दा शांत होण्याचे नाव घेत नाहीये. गोव्यात गोमांसावर बंदी नसली तरी काँग्रेसचे नेते हा मुद्दा उपस्थित करत आहेत. हॉटेलचा एक कथित मेनू सोशल मीडियावर शेअर केला जात आहे, ज्यामध्ये बीफ डिश सर्व्ह करण्याबाबत माहिती देण्यात आली आहे. यावरून राज्यातही काँग्रेसच्या महिला नेत्यांकडून आंदोलनं करण्यात आली आहेत.

स्मृती इराणींच्या राजीनाम्याची काँग्रेसकडून मागणी

केंद्रीयमंत्री स्मृती इराणींच्या विरोधात पुण्यात आज काँग्रेसच्या महिला आघाडीच्यावतीने आंदोलन करण्यात आले. स्मृती इराणी यांच्या मुलीचा गोव्यात बार असून त्या बारमध्ये बीफ ठेवण्यात आलंय, मात्र माझी मुलगी 18 वर्षांची आहे आणि ती कॉलेज करतेय असं सांगून स्मृती इराणी या खोटं बोलत आहेत, असा आरोप काँग्रेसच्या महिला आघाडीने केलाय, यामुळे स्मृती इराणी यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आलीय.

केआरकेनेही डिवचलं

अभिनेता आणि चित्रपट समीक्षक केआरकेनेही याबाबत ट्विट केले आणि लिहिले – हे काय आहे? इराणीच्या कॅफेमध्ये डुकराचे मांस आणि गोमांस उपलब्ध? भक्तांना बुडून जीव देण्याचे दिवस आले आहेत, मात्र आत्ता केआरकेच्या ट्विटचा शोध घेतल्यास ते सोशल मीडियावर आढळून येत नाही. तसेच त्याच्या ट्विटर अकाऊंटवरही ते दिसत नाही.

काँग्रेसची सोशल मीडियावरुनही टीका

त्याच वेळी युवक काँग्रेसने लिहिले आहे की गोव्याच्या नॅशनल सिली सोलमध्ये डुकरासह बीफ देखील भक्तांसाठी उपलब्ध आहे. जोश इराणीच्या रेस्टॉरंटचे मेन्यू कार्ड सांगून इंटरनेटवर जे शेअर केले जात आहे ते सिली सोलचे नाही. उलट ते गोव्यातील रॅडिसन ब्लू रिसॉर्टचे आहे. ezydiner.com ला भेट देऊन तुम्ही ते स्वतः तपासू शकता. Radisson Blu ने नवीन मेनू देखील अपडेट केला आहे ज्यामध्ये बीफ काढून टाकण्यात आले आहे.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.