गुजरात निवडणूकीआधी तिकडे उद्याेग दिले, आता कर्नाटकमध्ये जमीन देण्याचा प्रयत्न, सीमावादावर नाना पटाेले यांची भूमिका काय?
गुजरातच्या निवडणूकीच्या वेळीसुध्दा महाराष्ट्राचे उद्याेग ज्याप्रमाणे गुजरातला नेवून महाराष्ट्राला बरबाद करण्याचं कृत्य केले- नाना पटाेले
नागपूर, नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा (Winter Session Nagpur 2022) आजचा तीसरा दिवस आहे. अधिवेशनामध्ये आराेप प्रत्याराेपाच्या फैरी सुरू आहेत. सीमावादाच्या मुद्यावर सभागृहाचे वातावरण चांगलेच तापले आहे. विराेधी पक्ष या मुद्यावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न करित आहेत. अशातच काँग्रेसचे नेते नाना पटाेले यांनीदेखिल या मुद्यावरून सरकारला धारेवर धरले आहे. महाराष्ट्र सरकारनं गुजरात निवडणूकीच्या आधी तिथे उद्याेग दिले, आता कर्नाटकमध्ये जमीन देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आराेप नाना पटाेले यांनी केला आहे.
काय म्हणाले नाना पटाेले?
काेराेना काळात विदर्भ-मराठवाड्याला काय दिलं असा प्रश्न उपस्थित करून आमचा आवाज दाबण्याची चाल आहे, पण आम्ही ते चालू देणार नाही असं यावेळी नाना पटाेले म्हणाले. खाेटारडेणा आणि चेष्टा हा भाजपचा खरा चेहरा आता विदर्भाच्या आणि मराठवाड्याच्या लाेकांना कळू लागला आहे, 2014 ते 2019 या काळामध्ये भाजपने केलेली पापं लपविण्याठी आम्हाला 33 महिन्याचा हिशाेब मागितला जात आहे, आज आम्ही त्यांच पितळ उघडं करू अशा तिव्र शब्दात नाना पटाेले यांनी टिका केली.
कर्नाटक सरकारने नुकताच ठराव पारीत केला आहे. त्यानूसार एक इंचही जमिन ते महाराष्ट्राला देणार नाही, मात्र जे आमचं आहे ते आम्ही मिळवून राहू , तसेच हे सर्व केंद्रातील माेदी सरकारच्या आशीर्वादाने हाेत असल्याचा आराेप नाना पटाेले यांनी केला.
गुजरातच्या निवडणूकीच्या वेळीसुध्दा महाराष्ट्राचे उद्याेग ज्याप्रमाणे गुजरातला नेवून महाराष्ट्राला बरबाद करण्याचं कृत्य केले. तसेच कृत्य माेदी सरकार सातत्यानं करत आहे. महाराष्ट्राची जनता हे काधीच मान्य करणार नाही, असेही नाना पटाेले यावेळी म्हणाले.