‘भगव्याला हात लावाल तर झेंडा खिशात ठेवून दांडा घालू’, संजय राऊतांचा कन्नडिगांना थेट इशारा

संजय राऊत यांनी बेळगावमधील प्रशासनाला आणि कन्नडिगांवर तोड डागली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांच्या प्रचारासाठी राऊत यांनी बेळगावात प्रचारसभा घेतली.

'भगव्याला हात लावाल तर झेंडा खिशात ठेवून दांडा घालू', संजय राऊतांचा कन्नडिगांना थेट इशारा
शिवसेना खासदार संजय राऊत
Follow us
| Updated on: Apr 14, 2021 | 10:18 PM

बेळगाव : बेळगाव लोकसभा पोडनिवडणुकीत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कर्नाटक सरकार आणि सीमाभागात मराठी माणसांवर अन्याय करणाऱ्या कन्नडिगांना इशारा दिलाय. ‘भगव्याला हात लावाल तर झेंडा खिशात छेवून दांडा घालू’, अशा शब्दात संजय राऊत यांनी बेळगावमधील प्रशासनाला आणि कन्नडिगांवर तोड डागली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांच्या प्रचारासाठी राऊत यांनी बेळगावात प्रचारसभा घेतली. (Sanjay Raut Warning to Karnataka BJP government)

संजय राऊतांचा मोदी, शाहांना सवाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पश्चिम बंगालमध्ये परिवर्तन करण्यासाठी फिरत आहे. ममता दीदी तिथे अन्याय करत असल्याचं ते सांगत आहेत. पण तुम्ही बेळगामध्ये काय घडतंय ते इथं येऊन पाहा, इथं खून पडत आहेत. तुम्हाला पश्चिम बंगालमधील अन्याय दिसतो, मग बेळगावातील दिसत नाही का? असा सवाल संजय राऊत यांनी मोदी-शाहांना केलाय. तसंच पंडित नेहरुंनी केलेली चूक दुरुस्त करा, असं आवाहनही राऊतांनी केलंय.

‘दादागिरीची भाषा करण्यात आम्ही हिटलर’

दादागिरीची भाषा करण्यात आम्ही हिटलर आहोत. महाराष्ट्राने मनात आणलं आणि फक्त पाणी बंद केलं तर तडफड होईल. पण आम्ही तसं करत नाही. कारण आम्ही माणुसकी बाळगतो. बेळगावमध्ये खूप वर्षांनी वाघ सिंहाचा खेळ सुरु झाला आहे. त्यामुळे इथं आता माकडांचं काम नाही, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केलीय. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची ज्योत शुभमच्या निमित्तानं पुन्हा पेडल्याचं सांगत महाराष्ट्र एकीकरण समितीचा उमेदवार शुभम शेळकेला विजयी करण्याचं आवाहन राऊतांनी बेळगावातील मतदारांना केलंय.

राऊतांचा कन्नडिगांवर हल्लाबोल

शुभमचं वय लहान असेल पण वजनदार माणूस आहे. सीमाभागाचे वजन घेऊन तुला लोकसभेत यायचं आहे. शिवसेनेचे 21 खासदार आहेत आणि तू 22 वा असशील, अशा शब्दात राऊतांनी शुभम शेळके यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केलाय. ही लढाई फक्त शुभमची नाही तर देशात जिथं जिथं मराठी माणूस आहे त्याच्या अस्मितेची आहे. शिवाजी महाराज नसते तर पाकिस्तानच्या सीमा कर्नाटकापर्यंत आल्या असत्या. तुमची सुंता झाली असती. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जेसीबीने रात्री काढता, लाज वाटली पाहिजे, अशा शब्दात राऊतांनी कन्नडिगांवर जोरदार हल्ला चढवला.

गडकरी मराठी माणसाला पाडण्यासाठी येत आहेत का?

बेईमानाला पुन्हा आवाहन करा, तुम्हाला एकत्र यावेच लागेल. बेळगावला राष्ट्रभक्तीची पंरपरा आहे. आम्हाला वाकडी पावले टाकायला लावू नका. एकत्र या आणि वज्रमुठ दाखवा, असं आवाहन राऊतांनी बेळगावमधील मराठी माणसांना केलंय. आम्ही एक असताना तुम्ही फुटू नका नाहीतर नशीब फुटेल. एकीत भाजपचं नाव घेतलं नाही कारण सुरुंग यांनीच लावला. उद्या नितीन गडकरी येत आहे. मराठी माणसाला पाडण्यासाठी ते येत आहेत का? असा सवालही राऊतांनी विचारलाय. पंतप्रधान मोदी जरी प्रचाराला आले तरी शुभमचा भरधाव घोडा थांबणार नाही. असा दावाही राऊतांनी केलाय. शुभमचा विजय हा हुतात्म्यांना दिलेली श्रद्धांजली असेल. देव्हा साद घालाल तेव्हा महाराष्ट्र पाठीशी राहील, असा विश्वासही राऊतांनी यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीला दिला आहे.

संबंधित बातम्या :

Special Report | बेळगाव पोटनिवडणूक, वर्षोंवर्षांपासून कानड्यांचा अत्याचार, महाराष्ट्रात सामील होण्यासाठी चाचपडणाऱ्या शेकडो गावांची कहाणी

बेळगाव प्रशासनाला संजय राऊतांची धास्ती, स्टेज, साऊंड सिस्टिमची मोडतोड! राऊतांचा कडक शब्दात इशारा

Sanjay Raut Warning to Karnataka BJP government

सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.