राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ‘स्पाईसजेट’ने उत्तराखंडला रवाना

राज्यपाल कोश्यारी विमानात बसल्यानंतर त्यांना परवानगी नसल्याचं कळलं. त्यामुळे राज्यपालांवर विमानातून उतरण्याची नामुष्की ओढावली (Bhagatsingh Koshyari Spicejet Flight)

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी 'स्पाईसजेट'ने उत्तराखंडला रवाना
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
Follow us
| Updated on: Feb 11, 2021 | 12:56 PM

मुंबई : महाराष्ट्र शासनाने सरकारी विमानाने प्रवास करण्याला परवानगी नाकारल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) खासगी विमानाने उत्तराखंडला रवाना झाले. स्पाईसजेट कंपनीच्या विमानाने राज्यपाल कोश्यारी मुंबईहून डेहराडूनला रवाना झाले. राजभवनाच्या पीआरओकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. (Bhagatsingh Koshyari flies by Spicejet Flight after Thackeray Govt denies permission)

राज्यपाल कार्यालयाने आठवड्यापूर्वी मुख्यमंत्री कार्यालयाकडे परवानगी मागितली होती. राज्यपाल सरकारी विमानाने मसुरीला जाणार होते. मात्र शेवटपर्यंत त्यांना परवानगी मिळाली नाही. महत्त्वाचं म्हणजे राज्यपाल कोश्यारी विमानात बसल्यानंतर त्यांना परवानगी नसल्याचं कळलं. त्यामुळे राज्यपालांवर विमानातून उतरण्याची नामुष्की ओढावली. दुपारी सव्वाबारा वाजताच्या खासगी विमानाने राज्यपाल कोश्यारी उत्तराखंडला रवाना झाले. दुपारी सव्वा दोन वाजता ते डेहराडूनला पोहोचतील.

राज्यपाल उत्तराखंडला का निघाले होते?

राज्यपालांना उत्तराखंडमधील मसुरीला आयएएस अकॅडमीच्या सांगता समारोपाला जायचं होतं. परंतु सरकारी विमानाने प्रवासाची परवानगी न मिळाल्याने अखेर राज्यपाल आणि त्यांचा खासगी स्टाफ स्पाईसजेटच्या विमानाने रवाना झाले. मात्र सरकारी विमान नाकारल्याने पुन्हा राजकीय वादंग माजला आहे.

इगो असलेलं सरकार, फडणवीसांचा हल्लाबोल

राज्यपालांना विमान नाकारणं हा प्रकार दुर्दैवी आहे. कुणाच्या मालकीची ही मालमत्ता नाही. माझ्या माहितीप्रमाणे जीएडीला पत्र दिलं होतं. तसंच मुख्यमंत्री कार्यालयाकडे हे पत्र पोहोचलं होतं पण तरीही परवानगी नाकारली. महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या इतिहासात एवढं इगो असलेलं सरकार मी पाहिलं नव्हतं. आपण कुणाचा अपमान करतोय, हे कळालं पाहिजे. राज्यपाल हे संविधानिक पद आहे, अशी घणाघाती टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर केली.

राज्यपालांना हवाई प्रवास नाकारल्याची घटना मला माहिती नाही : अजित पवार

मला याबाबत काहीच माहिती नाही. आता तुमच्याशी बोलल्यानंतर मला ही घटना कळलीय. माहिती घेऊन या घटनेवर बोलेन, असं उपमुख्यमंत्री अजित पवार राज्यपालांच्या विमानप्रवासाबाबत म्हणाले.

परवानगी नसताना तांत्रिकदृष्ट्या प्रवास करणे योग्य नाही : विनायक राऊत

राज्यपालांना अद्यापही महाराष्ट्र सरकारच्या विमान वापरण्याची परवानगी दिली नव्हती. त्यांनी परवानगी मागितली होती. पण ते विमान उड्डाणास सक्षम आहे की नाही यासंदर्भात पुरेपूर माहिती नव्हती. त्यामुळे कदाचित परवानगी दिली नसेल. परवानगी नसताना तांत्रिकदृष्ट्या प्रवास करणे योग्य नाही. मी अधिक माहिती नक्की घेईन. आम्ही महाविकास आघाडी सरकारने राज्यपालांचा नेहमीच आदर केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राज्यपालांचा आदर केला आहे, त्यांचा अवमान कदापिही होणार नाही, असं शिवसेना खासदार विनायक राऊत म्हणाले. (Bhagatsingh Koshyari flies by Spicejet Flight after Thackeray Govt denies permission)

राज्यपालांना हवाई परवानगी नाकारुन सूडभावनेचा अतिरेक : प्रवीण दरेकर

राजकारणातील मतभेद समजू शकतो, राज्यपाल घटनात्मक पद आहे. राज्य सरकारनं अतिरेक केला आहे. सूड भावना त्यांच्यामध्ये किती भरलीय हे स्पष्ट होत आहे. कोणत्याही गोष्टीमध्ये केंद्राकडे बोट दाखवायचं. त्यांचं अपयश लोकांपुढे जाऊ नये यासाठी वाद निर्माण करायचा त्यावर लोकांचं लक्ष वळवायचं असा या सरकारचा कार्यक्रम आहे, अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.

राज्यपालांना विमानातून उतरवलं, जनता तुम्हाला सत्तेतून खाली खेचेल : सुधीर मुनगंटीवार

राज्यपालांना विमानातून उतरवण्यातं आलं, जनता सरकारला सत्तेतून उतरवेल, अशी टीका भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली. इतकंच नाही तर राज्यपालांची सरकारनं क्षमा मागावी, अशी मागणी मुनगंटीवार यांनी केली.

संबंधित बातम्या :

राज्यपालांच्या हवाई प्रवासाला ठाकरे सरकारने परवानगी नाकारली, विमानातून उतरुन कोश्यारी राजभवनात

पहाटेचा शपथविधी ते हवाई प्रवास नाकारला, राज्यपाल आणि ठाकरे सरकारमधील वादांची मालिका

(Bhagatsingh Koshyari flies by Spicejet Flight after Thackeray Govt denies permission)

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.