AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत भालकेंच्या रिक्त जागेसाठी पोटनिवडणुकीची तयारी, राष्ट्रवादीकडून कोणाला उमेदवारी?

फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पंढरपूर विधानसभेसाठी निवडणूक होण्याची शक्यता आहे. (Bharat Bhalke Pandharpur Bypoll )

भारत भालकेंच्या रिक्त जागेसाठी पोटनिवडणुकीची तयारी, राष्ट्रवादीकडून कोणाला उमेदवारी?
दिवंगत आमदार भारत भालके
| Updated on: Feb 11, 2021 | 8:20 AM
Share

सोलापूर : पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे बिगुल लवकरच वाजणार आहे. राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके (Bharat Bhalke) यांच्या निधनामुळे रिक्त राहिलेल्या पंढरपूर विधानसभेच्या जागेसाठी प्रशासकीय तयारी सुरु करण्यात आली आहे. पंढरपूरसाठी राष्ट्रवादीकडून कोणाला तिकीट दिलं जाणार, निवडणूक बिनविरोध होणार की भाजप आपला उमेदवार मैदानात उतरवणार, याची उत्सुकता आहे. (Bharat Bhalke Pandharpur Vidhansabha Bypoll Who will be NCP candidate)

निवडणूक आयोगाने पंढरपूर विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रांची यादी मागवली आहे. विधानसभेचे पद रिक्त झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत पोटनिवडणूक घेण्याचा नियम असल्याने प्रशासकीय स्तरावर तयारी सुरु करण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पंढरपूर विधानसभेसाठी निवडणूक होण्याची शक्यता आहे.

प्रशासकीय यंत्रणा सज्ज, राजकीय नेत्यांचीही तयारी

मतदान यंत्राच्या तपासणीसाठी राजकीय नेत्यांची बैठक घेण्यात येणार आहे. निवडणुकीसाठी किती मतदान यंत्रे लागणार आहेत, याची प्रशासनाकडून माहिती घेण्याची प्रक्रिया सुरु झाली. दुसरीकडे पंढरपुरात राजकीय नेत्यांकडूनही जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे.

निवडणूक बिनविरोध होणार की नाही?

राष्ट्रवादीकडून सर्वेक्षण करुन उमेदवारी दिली जाणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. तर भाजप उमेदवार कोण असणार हे अद्याप स्पष्ट नाही. महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेल्या राष्ट्रवादीला काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांचं पाठबळ असेल. आमदार-खासदारांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे राजकीय संकेत बऱ्याचदा पाळले जातात. त्यामुळे भाजप मैदानात न उतरता ही निवडणूक बिनविरोध करणार, की पंढरपुरात राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा सामना रंगणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.

भारत भालके यांच्या निधनाने राजकीय पोकळी 

भारत भालके यांचे 28 नोव्हेंबर 2020 रोजी वयाच्या 60 व्या वर्षी निधन झाले. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली होती. पुण्यातील रुबी हॉल क्लिनीकमध्ये उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. (Bharat Bhalke Pandharpur Vidhansabha Bypoll Who will be NCP candidate)

कोण होते भारत भालके?

भारत भालके हे पश्चिम महाराष्ट्रातील मातब्बर नेत्यांपैकी एक होते. 1992 साली ते तालुका स्तरावरील राजकारणात सक्रिय झाले. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून त्यांनी कारकिर्दीला सुरुवात केली. 2002 पासून त्यांनी कारखान्याच्या अध्यक्षपदावर कायम वर्चस्व ठेवले. भारत भालके यांनी सलग 18 वर्षे विठ्ठल कारखान्याची धुरा सांभाळली होती.

भालकेंच्या सुपुत्राला वारसा

पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या सुपुत्राची वर्णी लागली. भगीरथ भालके यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली. भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अध्यक्षपदाचा एकमताने फैसला झाला होता.

संबंधित बातम्या :

Parth Pawar | भारत भालकेंच्या जागेवर पार्थ पवारांना संधी मिळणार?

महाराष्ट्र ग्रामपंचायत निकाल 2021 : मंगळवेढ्यात राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके गटाला धक्का

(Bharat Bhalke Pandharpur Vidhansabha Bypoll Who will be NCP candidate)

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.