Maharashtra Politics : महाराष्ट्रात मोठी घडामोड, महाविकास आघाडी सरकार बरखास्तीची शिफारस करणार-सूत्र
महाविकास आघाडी सरकार बरखास्तीची शिफारस करणार असल्याची माहिती आहे.
मुंबई : महाराष्ट्रात (Maharashtra) मोठी घडामोड. महाविकास आघाडी सरकार बरखास्तीची शिफारस राज्यपालांकडे करणार असल्याची मोठी माहिती आहे. एकनाथ शिंदे (Ekanath Shinde) यांनी केलेल्या बंडामुळे आधीच महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं आहे. त्यात सरकार बरखास्तीची शिफारस करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारनं घेतल्याचं दिसतंय. मात्र एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्याच गडाला सुरुंग लावल्यानं राज्यात चर्चेला उधाण आलंय. यामध्ये आता यावर राज्यपाल महोदय काय निर्णय घेणार, हे पहावं लागेल. तर दुसरीकडे भाजपकडून देखील सत्ता स्थापनेची तयारी सुरू अल्याची सुत्रांची माहिती आहे. आज भाजपच्या नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्याचं चित्र आहे. एकीकडे केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे गुवाहाटी विमानतळावर लक्ष ठेवून आहेत. तर दुसरीकडे महाराष्ट्रात भाजपकडून हलचाली सुरू झाल्या असून गिरीश महाजन ‘सागर’ बंगल्यावर दाखल झाले आहेत. यासोबतच गिता जैन देखील ‘सागर’वर आल्या आहेत. तर भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची (Devendra Fadnavis) दिल्लीत पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे.
गुलाबराव पाटील शिंदेंच्या गळाला
शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील देखील एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले असल्याची माहिती आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडीला मोठा धोका निर्माण झालाय.
थोड्याच वेळात ‘मविआ’ची बैठक
राज्यात राजकीय घडामोडी वाढलेल्या असताना महाविकास आघाडीची बैठक थोड्याच वेळात होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे या बैठकीत बरखास्तीच्या प्रस्तावावर चर्चा होऊ शकते. अशी शक्यता व्यक्त केली जातेय.
भाजपकडून हलचालींना वेग
महाराष्ट्रात भाजपकडून हलचाली सुरू झाल्या असून गिरीश महाजन ‘सागर’ बंगल्यावर दाखल झाले आहेत. यासोबतच गिता जैन देखील ‘सागर’वर आल्या आहेत. तर भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची दिल्लीत पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे.
देवेंद्र फडणवीस कुठे आहेत?
भाजपने महाराष्ट्रातील प्रभावी नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस काल दिल्लीला गेल्याची माहिती होती. त्यानंतर ते कुठेही दिसून आले नाही. त्यामुळे फडणवीस नेमके कुठे आहेत, असा प्रश्न सध्या विचारला जात होता. आता एक बातमी आली आहे. भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची दिल्लीत पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे.