मोठी बातमी! पहाटे 4.30 वा. नवाब मलिकांच्या घरी ईडी अधिकाऱ्यांची धडक, चौकशी सुरु

Nawab Malik at ED Office : ईडीचे अधिकारी पहाटे 4.30 वाजण्याच्या सुमारास नवाब मलिक यांच्या घरावर पोहोचले. ईडीनं सकाळ सकाळी केलेल्या कारवाईमुळे चर्चांना उधाण आलं आहे. नवाब मलिक यांच्यावर करण्यात आलेली ही कारवाई सूडाचं राजकारण असल्याचा आरोपा मलिकांच्या समर्थकांनी केला आहे.

मोठी बातमी! पहाटे 4.30 वा. नवाब मलिकांच्या घरी ईडी अधिकाऱ्यांची धडक, चौकशी सुरु
नवाब मलिक
Follow us
| Updated on: Feb 23, 2022 | 10:20 AM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या घरावर ईडीनं पहाटे ईडी (Enforcement Directorate) अधिकाऱ्यांनी हजेरी लावली. एका मालमत्तेच्या गैरव्यवहारावरुन ही कारवाई ईडीकडूनन करण्यात आली असल्याचं समोर आलं आहे. ईडीचे अधिकारी यानंतर नवाब मलिक यांना ईडी कार्यालयात घेऊन गेले असून सकाळी 7.45 वाजल्यापासून त्यांची ईडी कार्यालयात (ED Office Mumbai) चौकशी सुरु आहेत. ईडीचे अधिकारी पहाटे 4.30 वाजण्याच्या सुमारास नवाब मलिक यांच्या घरावर पोहोचले. ईडीनं सकाळ सकाळी केलेल्या कारवाईमुळे चर्चांना उधाण आलं आहे. नवाब मलिक यांच्यावर करण्यात आलेली ही कारवाई सूडाचं राजकारण असल्याचा आरोपा मलिकांच्या समर्थकांनी केला आहे. नवाब मलिकांचे कार्यकर्ते आता मोठ्या संख्येनं ईडी कार्यालयाबाहेर पोहोचून त्यांना समर्थन देणार असल्याचं सांगितलंय. इकबाल कासकरनं नाव घेतल्यानंतर मलिक यांची चौकशी सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. इकबाल कासकर, इकबास मिरची, आणि अस्लम फ्रूट यांना ईडीनं ताब्यात घेतलं होतं. इकबाल कासकरनं ईडी चौकशीत मलिक यांचं नाव घेतल्याचं बोललं जातंय. त्यानंतर ईडीनं कारवाई करत मलिकांची चौकशी सुरु केली आहे.

दुसरीकडे भाजप नेत्यांनी टीव्ही 9 मराठीसोबत बोलताना ईडीच्या कारवाईमागे कोणत्याही प्रकारचं सूडाचं राजकारण नसल्याचं म्हटलं आहे. या संपूर्ण घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ईडी कार्यालयाच्या बाहेर पोलिस फौजफाटाही वाढवण्यात आलेला आहे.

नेमकं कधीचं प्रकरण?

दरम्यान नवाब मलिकांनी 1993च्या बॉम्बस्फोटातील गुन्हेगार सरदार शहावली खान आणि सलीम पटेल यांच्याकडून जमीन खरेदीचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला होता..हे आरोप काय आहेत पाहुयात.

  1. – 1993च्या बॉम्बस्फोटातील आरोपीकडून मलिकांचे पुत्र फराज मलिकांकडून जमीन खरेदीचा आरोप
  2. – कुर्ल्यातील मोक्याची 3 एकर जागा मलिकांचे पुत्र फराज मलिकांनी खरेदी केल्या
  3. – 30 लाखांतील जमीन खरेदीपैकी 20 लाखांचं पेमेंट केल्याचा मलिकांवर आरोप
  4. – मलिक कुटुंबीयांच्या सॉलिडस कंपनीनं 2005 मध्ये शहावली आणि सलीम पटेलांकडून व्यवहार केल्याचा आरोप आहे
  5. – 2005 मध्ये कुर्ल्यातील जमिनीचा भाव 2053 रु. स्क्वेअर फूट होता मात्र खरेदी 25रु. स्वेअर फुटांनी केली.
  6. – जमिनीची पॉवर ऑफ अटर्नी सलीम पटेलच्या नावावर, विक्री सरदार शहा वलीच्या नावावर तर कागदपत्रावरील सही फराज मलिक यांची आहे.

ईडी पुन्हा चर्चेत!

कॅबिनेट मंत्री असलेल्या नवाब मलिकां वर करण्यात आलेली कारवाई सूडाच्या भावनेनं केली जात असल्याचा आरोप महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी दिली आहे. तर दुसरीकडे भाजपनं मात्र निरपेक्षपणे ईडी कारवाई करत असल्याचं म्हटलंय. एकूण पुन्हा एकदा केंद्रीय तपास यंत्रणा, महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार असा वाद पुन्हा चिघळण्याची दाट शक्यता आहे.

मलिकांवर निशाणा का?

नवाब मलिक यांनी सातत्यानं एनसीबीचे तत्कालीन झोनल डायरेक्टर असलेल्या समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला होता. आर्यन खान प्रकरणावरुन नवाब मलिकांनी आक्रमक भूमिका घेतली होती. यानंतर समीर वानखेडे आणि एनसीबी संशयाच्या भोवऱ्यात अडकले होते. त्यानंतर आता बुधवारी पहाटेच करण्यात आलेल्या ईडीच्या कारवाई पार्श्वभूमीवर राजकारण पेटण्याची शक्यता आहे.

भाजपच्या नेत्यांनी मलिकांवरील कारवाईवर काय म्हटलं?

सुधीर मुनगंटीवार यांची पहिली प्रतिक्रिया – पाहा व्हिडीओ –

प्रवीण दरेकरांची मलिकांवर पहिली प्रतिक्रिया –

भाजप नेते अतुल भातखळकर यांची पहिली प्रतिक्रिया –

गिरीश महाजन यांची मलिकांवर पहिली प्रतिक्रिया –

काँग्रेस नेते सचिन सावंत यांची पहिली प्रतिक्रिया –

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.