“गडकरी पक्षासाठी नाही तर विकासासाठी काम करतात, केंद्रात त्यांच्यासारखे आणखी मंत्री हवेत”
नितीन गडकरी यांचं तोंडभरून कौतुक...
मुंबई : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या कामाचं तोंड भरून कौतुक करण्यात आलं आहे. नितीन गडकरी पक्षासाठी काम करत नाहीत, तर विकासासाठी करतात. नितीन गडकरी हे देशाचा विकास आणि प्रगती याकडे विशेष लक्ष ठेवून असतात. त्यांच्यामुळे देशात रस्त्यांची अवस्था सुधारली. केंद्र सरकारमध्ये नितीन गडकरींसारखे आणखी मंत्री असायला पाहिजेत. जेणे करून अशीच विकास कामं होतील, असं बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनी म्हटलं आहे.
नितीन गडकरी विकासकामाच्या बाबतीत हा आपल्या पक्षाचा, तो दुसऱ्या पक्षाचा असा भेद करत नाहीत. तर ते देशाचा विकास पाहतात. ज्यातून देश प्रगती पथावर जाणाचर असेल अशा प्रकल्पांना ते प्राधान्य देतात, असं तेजस्वी म्हणाले.
मी पहिल्यांदा बिहारचा उपमुख्यमंत्री झालो. तेव्हापासून गडकरींचा हात माझ्या पाठीवर आहे. ते कायम चांगल्या कामासाठी प्रोत्साहित करतात. कुठल्याही कामासाठी आम्ही त्याच्याकडे गेलो तर त्यांनी नाही म्हटलं नाही. लगोलग आदेश देऊन त्यांनी ही कामं पूर्ण करून घेतली. आम्हा तरूणांमध्ये काम करण्याची प्रबळ इच्छाशक्ती असते. त्याला गडकरी यांचं कायम पाठबळ असतं, असं म्हणत तेजस्वी यांनी गडकरींच्या कामाचं कौतुक केलं आहे.
आज रोहतास में सोन नदी पर 210 करोड़ रुपए की लागत से पण्डुका के पास 1.5 किमी लंबाई के 2-लेन उच्चस्तरीय आर.सी.सी. पुल के निर्माण कार्य का मा० केंद्रीय मंत्री श्री @nitin_gadkari जी ने बिहार सरकार के माननीय मंत्रियों तथा स्थानीय विधायकों और सांसदो की उपस्थिति में शिलान्यास किया। pic.twitter.com/cNrZzyq8JL
— Tejashwi Yadav (@yadavtejashwi) November 14, 2022
बिहारच्या रोहतासमधील सोननदीवरीर पुलाच्या कामाची पायाभरणी झाली. तेव्हा नितीन गडकरी उपस्थित होते. यावेळी तेजस्वी यादव यांनी त्यांचं तोंडभरून कौतुक केलं.