Bihar Election Result Live Update: तेजस्वी यादव यांना मोकळीक मिळण्यासाठी निवडणूक लढवली नाही : शरद पवार

बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मतमोजणीमध्ये एनडीएनं जोरदार मुसंडी मारली आहे. (Bihar Election 2020 LIVE News and Updates and Political leaders reaction)

Bihar Election Result Live Update: तेजस्वी यादव यांना मोकळीक मिळण्यासाठी निवडणूक लढवली नाही : शरद पवार
Follow us
| Updated on: Nov 10, 2020 | 5:34 PM

पाटणा : बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणी सुरु आहे. मतमोजणीमध्ये एनडीएनं जोरदार मुसंडी मारली आहे. राजदचे नेते तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात  महाआघाडीने 103 जागांवर आघाडी मिळवली आहे. एनडीए 130 जागांवर आघाडीवर आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये राजदनं 63, काँग्रेस 20, इतर 19 आणि एनडीएकडून भाजप 75 आणि जेडीयू 49  जागांवर आघाडीवर आहे.  बिहार निवडणुकीच्या निकालावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. (Bihar Election 2020 LIVE News and Updates and Political leaders reaction)

[svt-event title=”तेजस्वी यादव यांना मोकळीक मिळण्यासाठी निवडणूक लढवली नाही : शरद पवार” date=”10/11/2020,5:33PM” class=”svt-cd-green” ] निवडणूक दोन घटकांमध्ये झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीशकुमार यांच्यांकडे यंत्रणा होती. बदलाला हळूहळू वाट दिसत आहे. तेजस्वी यादव लढले ते इतरांसाठी प्रेरणादायी ठरतील, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले. [/svt-event]

[svt-event title=”पंतप्रधान मोदींच्या विकासाच्या धोरणावर बिहारचे शिक्कामोर्तब: सुधीर मुनगंटीवार” date=”10/11/2020,5:22PM” class=”svt-cd-green” ] पंतप्रधान मोदींच्या विकासशील धोरणांवर बिहारच्या जनेतेने शिक्कामोर्तब केले आहे, असं भाजप नेते सुधीर मुनंगटीवार यांनी म्हटले आहे. बिहारमधील एनडीएचा विजय विकासाभिमुख धोरणांचा परिपाक आहे, असंही ते म्हणाले. [/svt-event]

[svt-event title=”आकड्यांनुसार मुख्यमंत्री भाजपचा व्हावा: अजित चौधरी” date=”10/11/2020,4:03PM” class=”svt-cd-green” ] बिहार निवडणुकीच्या निकालामधील आकड्यांनुसार भाजप आघाडीवर राहिलं तर मुख्यमंत्री भाजपाचा व्हावा, असं भाजपच्या अनुसूचित आघाडीचे अध्यक्ष अजित चौधरी यांनी म्हटलं आहे. [/svt-event]

[svt-event title=”आकड्यांनुसार मुख्यमंत्री भाजपचा व्हावा: अजित चौधरी” date=”10/11/2020,3:51PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”निवडणुकीचा निकाल काही लागो, इव्हीएमला दोष देऊ नका, काँग्रेस नेत्याचं मोठं वक्तव्य” date=”10/11/2020,3:36PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”तेजस्वी यादव बिहारच्या निवडणुकीचे मॅन ऑफ द मॅच: संजय राऊत” date=”10/11/2020,3:28PM” class=”svt-cd-green” ] बिहार निवडणुकीचे मॅन ऑफ द मॅच तेजस्वी यादव आहेत. पूर्ण निकाल आल्यावर बोलू, तेजस्वी नावाचा तरुण राष्ट्रीय राजकारणात चर्चेचा विषय आहे, असं खासदार संजय राऊत म्हणाले. साधन नसताना तेजस्वीनं संघर्ष केला.15 वर्ष सत्तेत असणारे नितीशकुमार तिसऱ्या स्थानावर गेले आहेत. त्यांनी आत्मचिंतन केले पाहिजे. भाजपची सर्व यंत्रणा बिहारमध्ये कामाला लागली होती. नरेंद्र मोदींनीही सभा घेतल्या, असं संजय राऊत म्हणाले आहेत. [/svt-event]

[svt-event title=” नितीशकुमार यांचं महत्व कमी करण्याचा भाजपचा डाव यशस्वी : पृथ्वीराज चव्हाण” date=”10/11/2020,2:12PM” class=”svt-cd-green” ] नितीशकुमार यांचं महत्व कमी करण्याचा भाजपची रणनिती यशस्वी होताना दिसत आहे, असं मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे. [/svt-event]

[svt-event title=”भाजपचे 5 वर्षांचे काम निकालांमध्ये दिसतेय: चंद्रशेखर बावनकुळे” date=”10/11/2020,2:04PM” class=”svt-cd-green” ] बिहार निवडणुकीत ज्या पद्धतीने भाजपनं संघटन उभारलं आणि पाच वर्षात जे काम झालं याचा परिणाम निकालावर झालेला दिसतो आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेश मंत्री आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलीय. एनडीएला लोकांनी भरभरून मते दिली. त्यामुळंच एनडीएची सत्ता पुन्हा बिहारमध्ये आलीय. देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीनं बिहारमध्ये प्रचाराची धुरा सांभाळली आणि त्याचेच यश बिहार निवडणुकीत दिसून आल्याचेही बावनकुळे यांनी सांगितलं. [/svt-event]

[svt-event title=”काँग्रेसच्या जागा वाढतील: माणिकराव ठाकरे” date=”10/11/2020,12:07PM” class=”svt-cd-green” ] सुरुवातीचा टप्पा आहे. काँग्रेसच्या जागा वाढतील. महागठबंधन मागे राहणार नाही. तेजस्वी यादव नेतृत्व करण्यास सज्ज आहेत. निकाल काय येतील याची वाट पाहिली पाहिजे, असं काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी म्हटलं. [/svt-event]

[svt-event title=””बिहारच्या जनतेने लालूप्रसाद यादव व काँग्रेसचे गुंडाराज नाकारले”,: अनिल बोंडे” date=”10/11/2020,11:57AM” class=”svt-cd-green” ] “कालपर्यंत निवडणुकीचे एक्झिट पोल हे एनडीएच्या विरोधात होते. मात्र, आज सकाळपासूनच जे ट्रेंड समोर येत आहे त्यामध्ये एनडीए पुढे दिसत आहे.त्यामुळे बिहारच्या जनतेने लालूप्रसाद यादव व काँग्रेसचे गुंडाराज नाकारले,” अशी प्रतिक्रिया राज्याचे माजी कृषी मंत्री भाजप नेते अनिल बोंडे यांनी दिली आहे. [/svt-event]

[svt-event title=”बिहारमध्ये भाजपच्या पाठीशी मतदार राहिला: राम शिंदे” date=”10/11/2020,11:42AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”नागरिकांना लोकशाही मार्गानं परिवर्तन हवे असंत: निलमताई गोऱ्हे” date=”10/11/2020,11:33AM” class=”svt-cd-green” ] लालू प्रसाद यादव तुरुंगात असताना तेजस्वी यादव यांनी निवडणूक लढवली. कोरोनाच्या काळात लोक उतरतात आणि मतदान करतात. लोकांना लोकशाही मार्गानं परिवर्तन हवे असते, हे दिसतं. स्त्री मतदार जागरुक होत आहेत, त्या मतदार म्हणून आक्रमक होत आहेत, असं शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गोऱ्हे म्हणाल्या. [/svt-event]

[svt-event title=”पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिष्मा राहिला नाही: छगन भुजबळ” date=”10/11/2020,11:11AM” class=”svt-cd-green” ] नितीशकुमार यांच्या जागा कमी येतील आणि भाजपच्या जागा वाढतील. मात्र, काटें की टक्कर सुरु असून विरोधी पक्ष सत्तेत येतील, अशी आशा सार्वजिनक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी केली. तेजस्वी यादव यांचे कौतुक करावे तितके कमी आहे. तेजस्वी यादव यांनी एकट्याच्या जोरावर प्रचार अभियान राबवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा कमी झाला आहे, असं भुजबळ म्हणाले. [/svt-event]

[svt-event title=”बिहारमध्ये सबसे तेज तेजस्वी : संजय राऊत” date=”10/11/2020,10:02AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बिहारमध्ये तेजस्वी पर्व सुरु व्हायला हरकत नाही: संजय राऊत” date=”10/11/2020,9:54AM” class=”svt-cd-green” ] तेजस्वी यादव ज्या प्रकारची टक्कर देतोय ती काटे की टक्कर देतोय. बिहारमध्ये तेजस्वी पर्व सुरु व्हायला हरकत नाही. भाजपचा प्रचार जंगलराज भोवती फिरत राहिला. निकाल आल्यानंतर लोक जंगलराज विसरले असतील आणि मंगलराज सुरु होईल. भाजप आणि नितीशकुमार यांना तिशीतल्या युवकानं आव्हान दिलं. देशाच्या भविष्यासाठी हा चांगला संकेत आहे. 15 वर्षांपासून नितीशकुमार यांची सत्ता होती. तेजस्वीच्या नेतृत्वात मंगलराज सुरु होईल, असं संजय राऊत म्हणाले. [/svt-event]

[svt-event title=”महाराष्ट्रातून बिहारमध्ये परिवर्तनाची लाट गेली: धैर्यशील माने” date=”10/11/2020,9:42AM” class=”svt-cd-green” ] महाराष्ट्रातून बिहारमध्ये परिवर्तनाची लाट गेली आहे. तेजस्वी यादव च्या रूपाने बिहार मध्ये परिवर्तन आलाय, असं वक्तव्य शिवसेना खासदार धैर्यशील माने यांनी केले आहे. बिहारमधील पराभव नितीश कुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आहे. पराभवाचे वाटेकरी नितीशकुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत.बिहार निवडणूकीमध्ये सुशांतसिंग राजपूत हा मुद्दाच नव्हता. परंतु, भाजप ने हा मुद्दा बनविला. महाराष्ट्र मध्ये कोणत्याही व्यक्ती वर अन्याय नाही तर न्याय मिळवून दिला जातो. बिहारमध्ये परिवर्तन आलंय आता संपूर्ण देशात परिवर्तन येईल, अशी आशा धैर्यशील माने यांनी व्यक्त केली. [/svt-event]

[svt-event title=”नितीशकुमार यांच्याबद्दलच्या अँटी इन्कम्बन्सीचा फटका बसतोय: प्रवीण दरेकर” date=”10/11/2020,9:22AM” class=”svt-cd-green” ] शंभर टक्के आकडे बदलतील, वाट पाहायला पाहिजे. काँग्रेसचे आकडे वाढत नाहीत. त्यामुळे अजून वाट पाहायला पाहिजे. अंतिम निकाल येईपर्यंत वाट पाहावी लागेल. नितीशकुमार यांच्या अँटी इन्कम्बन्सीचा फटका बसतोय. तेजस्वी यादव यांनी बिहारचा फार विकास केलेला नाही, असं महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. [/svt-event]

[svt-event title=”बिहार निवडणुकीवर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया, बादशाह तो वक्त होता है….. इन्सान तो युं ही गुरूर करता है!” date=”10/11/2020,9:05AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

[svt-event title=”जीतेगा एनडीए ।जीतेगा बिहार । भाजप नेते शहानवाझ हुसेन यांचे बिहारच्या निकालावर पहिले ट्विट” date=”10/11/2020,8:36AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”समय बडा बलवान है……: राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरींचे बिहार निवडणुकीवर ट्वीट” date=”10/11/2020,8:33AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”तेज प्रताप यादव यांचे बिहारच्या निकालावर पहिले ट्विट” date=”10/11/2020,8:27AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बिहार निवडणुकीवर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया, बादशाह तो वक्त होता है….. इन्सान तो युं ही गुरूर करता है!” date=”10/11/2020,8:12AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

सामनामधून तेजस्वी यादव यांचे कौतुक

“बिहारातही तसेच सत्तांतर होत असल्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. बिहारात पुन्हा जंगलराज येईल अशी भीती दाखविण्यात आली. पण लोकांनी बहुधा स्पष्टच सांगितले, आधी तुम्ही जा, जंगलराज आलेच तर आम्ही निपटून टाकू”, “अमेरिका व बिहारातील जनतेचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. जनता हीच श्रेष्ठ व सर्वशक्तिमान आहे. जो बायडन आणि तेजस्वी यादव यांचा संघर्ष अन्याय, असत्य, ढोंगशाहीविरूद्ध होता. तो यशस्वी होताना दिसत आहे,” अशा शब्दात बिहार निवडणुकीबाबत सामनामध्ये भाष्य करण्यात आले आहे.

एक्झिट पोलमध्ये बहुतेक वाहिन्यांनी महाआघाडीचा विजय होईल, असा अंदाज वर्तविला आहे. या महाआघाडीत राष्ट्रीय जनता दल (RJD), काँग्रेस आणि डाव्या पक्षांचा समावेश आहे. महाआघाडीला आपलाच विजय होणार, असा विश्वास आहे, तर दुसरीकडे नितीशकुमारांनाही बिहारमध्ये पुन्हा त्यांचंच सरकार येईल, अशी आशा आहे. मतमोजणीसाठी स्ट्राँग रुमपासून मतमोजणी केंद्रांपर्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आलीय. मतमोजणी केंद्राच्या आजूबाजूला फटाके फोडण्यास आणि रंग-गुलाल उधळण्यास निर्बंध लादण्यात आले आहेत.

असे असेल निकालाचे संपूर्ण वेळापत्रक

>  सकाळी 8 वाजता मतमोजणीस प्रारंभ होईल. राज्यातील 55 केंद्रांवर मतमोजणी केली जाणार आहे. कोरोना पाहता मागील वेळेपेक्षा या वेळी अधिक मतमोजणी केंद्रे तयार केली गेली आहेत. बिहारमधील 38 जिल्ह्यांतील 55 मतमोजणी केंद्रे आणि 414 हॉलमध्ये मतमोजणी केली जाणार आहे.

>> बिहारमधील प्रत्येक जिल्ह्यात तीन मतमोजणी केंद्रे तयार केली गेली आहेत. तीन मतमोजणी केंद्रे ही तुलनेने जास्त असून, काही विशेष जिल्ह्यांमध्येच त्यांची निर्मिती करण्यात आली आहे. पूर्व जिल्हा चंपारण (12 विधानसभा मतदारसंघ), गया (10 विधानसभा मतदारसंघ), सिवान (8 विधानसभा मतदारसंघ) आणि बेगूसराय (7 विधानसभा मतदारसंघ) अशी या जिल्ह्यांची नावे आहेत. बिहारच्या इतर जिल्ह्यांत एक-दोन मतमोजणी केंद्रे सुरू केली आहेत.

>> विजय आणि पराभवाचा कल सकाळी 10 वाजताच्या आसपास मिळू शकतो. मागील निवडणुकीतही असेच घडले आहे. कोणता उमेदवार पुढे आहे आणि कोण मागे आहे याचा कल सकाळी 10 नंतरच समोर येईल.

>> कोणता पक्ष जिंकतोय की पराभूत होतोय हे सर्व जागांचे ट्रेंड सकाळी उघड होतील. कोणता पक्ष कोणत्या ठिकाणी आघाडी घेत आहे आणि कोण मागे आहे, याबद्दल निवडणूक आयोग अधिकृत माहिती देईल.

> बिहारमध्ये कोणाचे सरकार स्थापन होईल हे मंगळवारी संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल. कधी कधी दुसर्‍या दिवसापर्यंत मतमोजणी सुरूच राहिली आहे. त्यामुळे निवडणुकीचा निकाल दिवसभरात जाहीर होणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

2014 साली बिहारमध्ये कुणाला किती जागा मिळाल्या होत्या?

  • राजद – 80
  • काँग्रेस – 27
  • जदयू – 71
  • भाजप – 53
  • लोजप – 2
  • रालोसप – 2
  • हिंदुस्थान आवाम मोर्चा (सेक्युलर)- 1
  • एकूण जागा – 243

मतदानाची टक्केवारी 

  • पहिला टप्पा – 53.54 टक्के
  • दुसरा टप्पा – 53 टक्के
  • तिसरा टप्पा – 55.22 टक्के

कोणाच्या किती रॅली?

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी- 12
  • मुख्यमंत्री नितीश कुमार- 100
  • तेजस्वी यादव- 251
  • चिराग पासवान- 103
  • राहुल गांधी- 8
  • असदुद्दीन ओवैसी- 100

संबंधित बातम्या :

Bihar Election Result 2020 LIVE | बिहार निवडणुकीच्या मतमोजणीला 8 वाजता सुरुवात, पहिला कल कोणाच्या बाजूने?

Tejashwi Yadav LIVE News and Updates: तेजस्वी यादव बिहारचे नवे ‘बाहुबली’ होणार का?

Bihar Election 2020 LIVE News and Updates and Political leaders reaction

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.